Site icon InMarathi

कॉफीचे “हे” फायदे कदाचित तुम्हाला माहितही नसतील…!!!

coffee-featured-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कॉफी… हे आपल्यापैकी अनेकांचे आवडते पेय.

काही लोक तर या कॉफी शिवाय राहूच शकत नाही, तर काही लोकांच्या दिवसाची सुरवातच या कॉफीने होते.

 

 

वाफाळती गरमागरम कॉफी समोर आली की आपल्याला मोह आवरत नाही हेचं खरं.

चहा आवडणा-यांची संख्या मोठी असली तरी कॉफीची मजा काही औरचं.

जगभरात कुठेही गेलं तरी हे कॉफीप्रेमी आढळतात. यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे या कॉफीचा अरोमा म्हणजेच कॉफीचा सुगंध.

असं म्हणतात की, कॉफी पिण्याची खरी पद्धत म्हणजे, आधी या कॉफीचा अरोमा अनुभवायचा आणि मग त्या कॉफीचा घोट घ्यायचा.. तर अशी ही कॉफी.

 

 

आता कॉफी म्हटली की तुमच्या डोळ्यासमोर येतं ते घुटके घेत वाफाळत्या कॉफीचा घेतला जाणारा आस्वाद. पण तुम्हाला माहिती आहे का, या कॉफीचे पिण्याव्यतिरिक्तही अनेक फायदे आहेत…

कोणते विचारताय.. चला तर मग आज तुम्हाला कॉफीच्या त्या फायद्यांची ओळख करून घेऊ …

 

किटकांच्या समस्येवर उपायकारी “कॉफी”…

 

theheartysoul.com

 

आपल्या सर्वांना कॉफीचा अरोमा  खुप आवडतो, पण हाच कीटकांना जरा सुद्धा भावत नाही. मुंगी, मच्छर यांसारखे कीटक या कॉफीच्या सुगंधापासून दूर राहतात. जर तुमच्या घरात या कीटकांची समस्या असेल तर तुम्ही कॉफीचा वापर करू शकता.

 

घर सजावटीतही मदत करते “कॉफी”…

 

socreativethings.com

 

कॉफी बिन्स या दिसायला खूप छान असतात. जर तुमच्याकडे खराब झालेल्या कॉफी बिन्स असतील तर तुम्ही त्या फेकुन न देता त्यांचा उपयोग फुलदाणी भरण्यासाठी करू शकता. याने तुमच्या कॉफी बिन्स वाया पण जाणार नाहीत आणि तुमचं फुलदाण अधिक सुंदर दिसेल. त्यासोबतच येणारा कॉफीचा अरोमा घरभर दरवळेल ते वेगळं.

 

तुमच्या बागेला सुरक्षित ठेवते “कॉफी”… 

 

catsaway.org

 

जर तुमच्या घरी बाग असेल, तर तुम्ही नक्कीच तिची खूप काळजी घेत असाल. त्यात नवनवीन रोपं लावून ती बाग अधिक सुंदर बनविण्याचा प्रयत्न करत असाल, पण जर एखाद्या मांजरीने येऊन तुमच्या बागेतील रोपांवर मूत्रविसर्जन केलं तर किंवा तुमची बाग खराब केली तर.

नक्कीच तुम्हाला खूप वाईट वाटेल. पण तुम्ही कॉफीचा उपयोग करून या समस्येला देखील दूर पळवू शकता. थोडीशी बारीक केलेली कॉफी तुमच्या रोपांच्या आजूबाजूला टाकली तर मांजर तुमच्या बागेजवळ भटकणारही नाही.

 

चेहऱ्याची निगा राखण्यास उपयुक्त “कॉफी”…

 

enjoycoffees.com

 

कॉफी प्यायल्याने रिफ्रेश फील होत, पण हीच कॉफी तुमच्या चेहऱ्याला देखील फ्रेश ठेवू शकते. कॉफी ही चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त आहे. याची पेस्ट लावल्याने चेहरा मुलायम होतो तसेच चेहऱ्याच्या त्वचेला टाईट करण्याचंही काम ही कॉफी करते. तर तुम्ही याचा फेस आणि बॉडी स्क्रब म्हणूनही उपयोग करू शकता.

 

रंग म्हणूनही वापरता येऊ शकते “कॉफी”…

 

wikihow.com

 

कॉफीचा रंग हा एक नैसर्गिक डाय आहे. याचा उपयोग कपडे, अंडे, कागद इत्यादी रंगण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. पण, नेहमी धुतल्याने कॉफीचा रंग फिका पडत जातो त्यामुळे तुम्ही याचा उपयोग त्या वस्तूवर करू शकता जे तुम्ही जास्त धूत नाही.

 

केसांना नॅच्युरल रंग देते “कॉफी”…

 

youtube

 

एवढचं नाही, तर ही कॉफी तुमच्या केसांसाठी देखील खूप कामाची आहे. आपले केस सुंदर व्हावे यासाठी आपण किती काही experiment आपल्या केसांवर करत असतो. पण त्याने केस खराब होतात आणि पैसे वाया जातात ते वेगळे.

पण कॉफी तुमच्या केसांना सिल्की आणि चमकदार बनविण्यास मदत करते. त्यासाठी कॉफीचा एक स्ट्रॉंग काढा बनवा त्याला पूर्णपणे थंड होऊ द्या, त्यानंतर हा काढा तुमच्या केसांवर लावा आणि २० मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

आठवड्यातून एकदा हा प्रयोग केल्यास तुमच्या केसांवर त्याचा परिमाण दिसून येईल. केस सिल्की आणि चमकदार दिसू लागतील. 

 

फ्रिजमधील दुर्गंध दूर करते “कॉफी”…

 

designsponge

 

फ्रिज हे आपल्यासाठी बहुउपयोगी असं साधन आहे. आपण कित्येक वस्तुंना फ्रेश ठेवण्यासाठी त्याचा वापर करतो. मग ते फळं-भाजी असो की कुठलेही डेअरी प्रॉडक्ट्स असो आपण यासर्वांसाठी फ्रिजवर विश्वास ठेवतो.

पण आपण त्यात एवढ्या सर्व गोष्टी ठेवतो त्यामुळे काही काळानंतर आपल्या फ्रिजमधून दुर्गंध यायला लागतो. तुम्ही या दुर्गंधीला कॉफीचा वापर करून दूर करू शकता. त्यासाठी फ्रिजमध्ये एका वाटीत फ्रेश कॉफी ठेवा, यामुळे दुर्गंध दूर होईल.

काय मग आहेत ना हे कॉफीचे भन्नाट फायदे… वाट काय बघताय, तुम्ही पण हे आयडीयाज नक्की ट्राय करून बघा आणि ही पोस्ट तुमच्या ‘कॉफी लव्हर्स’ मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका… 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version