क्रेडीट कार्डचे पॉईंट्स, रिडीम कसे केले जातात?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
क्रेडीट कार्डने या जगात पाऊल ठेवल्यापासून खरेदी क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. पैसे नसतानाही तुम्ही क्रेडीट कार्डच्या साहाय्याने हवी ती वस्तू खरेदी करू शकता म्हणजे ही गोष्ट एखाद्या जादूगाराच्या पेटाऱ्यातून निघालेल्या जादूच्या वस्तूपेक्षा कमी नाही.
तसेच क्रेडीट कार्डमुळे गरजेच्यावेळी आवश्यक रोख रक्कम मिळवणे सोपे होते.
पण क्रेडिट कार्डचा एवढाच फायदा नसून आणखीही फायदे आहेत. क्रेडिट कार्डच्या प्रत्येक ट्रान्झाक्शनवर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉईंट बद्दल तुम्हाला माहितीच असेलच.
यामुळे तुम्ही जितके पेमेंट केले आहे, त्याच्यावर कॅश रिवॉर्डसोबतच अन्य सवलतीही मिळतात.

क्रेडिट कार्डवरून १०० किंवा २०० रुपयाचे पेमेंट करताना तुम्हाला प्रत्येक ट्रॉन्झक्शनवर एक पॉईंट मिळतो. अशा प्रकारे तुम्हचे २००० पेक्षा जास्त पॉईंट झाल्यावर त्याला तुम्ही रिडीम करु शकता.
क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही खरेदी करतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक ट्रॉन्झक्शनसाठी पॉईंट मिळतात. तुम्हाला मिळणारे पॉईंट संग्रहित करीत राहा. पण लक्षात ठेवा रिडीम पॉईंटला एक वेळेची मर्यादाही असते.

जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड सरेंडर किंवा रिन्यू करता त्यावेळीस मिळालेले रिवॉर्ड पॉईंट बाद होतात. त्यामुळे कार्ड रिन्यू करताना हे लक्षात ठेवले पाहिजे. पण वेळेपूर्वीच क्रेडिट कार्डला रिडीम करा, नाहीतर क्रेडिट कार्डचे पॉईंट वाया जातील.
रिवॉर्ड पॉइंट दोन प्रकारचे असतात. हे पॉइंट परत करून तुम्हाला एकतर त्याबदल्यात रोख रक्कम मिळू शकते. किंवा या पॉइंटच्या आधारे सिलेक्टेड दुकान, शोरूममधून खरेदी करू शकता.
जर तुम्ही पॉईंट रिडीम करण्याच्या बदल्यात शॉपिंगचा विचार करीत असाल तर ते अशा जागी करा, ज्या शोरूमचे आणि तुमच्या कंपनीचे टायअप असेल. त्यामुळे तुम्हालाच याचा जास्तीत जास्त फायदा होईल.

तुम्ही क्रेडिट कार्डचे पॉईंट रिडीम करून कपडे खरेदी किंवा फ्लाइटचे तिकिट बुकिंग किंवा इतर खरेदी करू शकता. अनेक बँका रिवॉर्ड पॉईंटच्या आधारे विमान प्रवासाच्या तिकीटात सुट देतात.
सध्यातर यासाठी एक नवा ट्रेंड आला आहे. बँकांना याबदल्यात को ब्रॅडेड क्रेडीट कार्ड देण्यास सुरुवात केली आहे. ज्याचे अनेक कंपनींशी टायअप असते आणि या क्रेडिट कार्डवरून खरेदी करण्याने इंधन खरेदी, रेस्टॉरंट, हॉटेल बिल आदीमध्ये सुट देखील मिळत असल्याने दुप्पट फायदा होतो.
तर मग आता क्रेडीट कार्डवरून भरपूर शॉपिंग करा आणि डबल फायदा मिळवा !!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.