Site icon InMarathi

अँड्रॉइड स्मार्टफोन लॉक झालाय? ही ट्रिक वापरा डेटा न गमावता फोन पूर्ववत करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या स्मार्ट फोन्स ने धुमाकूळ घातला आहे, अगदी अबालवृद्ध आता स्मार्ट मोबाईलचा वापर करत आहेत.  या स्मार्ट फोन्स नी प्रत्येक सामान्य व्यक्तीला भुरळ घातली आहे, आणि बहुसंख्य लोक पूर्वीच्या फिचर फोनच्या ऐवजी स्मार्ट फोन्स ला पसंती देतांना दिसत आहेत. या आधी असलेले फिचर मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या पण दिवसेंदिवस कमी होत आहे. टेलिफोन तर आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत.

अँड्रॉइड फोन वापरणाऱ्या लोकांची वाढती लोकसंख्या आणि त्यात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे व ती जगाच्या लोकसंख्येच्या ४०% आहे.

या ऑपरेटिंग सिस्टिमने युजर्सच्या डेटाच्या सुरक्षेसाठी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात महत्वाची सुविधा म्हणजे तुम्ही तुमचा फोन स्पेशल पिन, पासवर्ड किंवा पॅॅटर्न वापरून सुरक्षित करू शकता..

आजकाल अँड्रोईड स्मार्टफोन वापरताना बहुतेक सर्वच जण या सुविधेचा वापर करतात, जेणेकरून आपल्या स्मार्टफोनशी आपल्या व्यतिरिक्त इतर कोणीही चाळे करू नयेत.

==

हे ही वाचा : ‘इलेक्ट्रॉनिक’ नाकाच्या मदतीने आता आपला गंध ओळखून अनलॉक होणार स्मार्टफोन !

==

 

पण कधी कधी हाच सुरक्षा उपाय आपल्या अंगाशी येतो आणि आपण पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड विसरून जातो. मग काय?

अशा वेळी दोन पर्याय उपलब्ध असतात- एकतर Factory Data Reset हा पर्याय वापरून स्मार्टफोनमधील सर्व data हरवून बसा किंवा मोबाईल दुकानात जाऊन त्याला २००-५०० रुपये देऊन पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड अनलॉक करा.

पण कधीकधी हे दोन्ही मार्ग अवलंबणे परवडत नाही.

 

जर तुम्हीदेखील कधी अश्या परिस्थितीमध्ये अडकलात आणि या दोन्ही मार्गांचा अवलंब करायचा नसेल तर आज आम्ही सांगतोय ती पद्धत वापरा. म्हणजे तुमचा data, मोबाईल आणि पैसा तिन्ही गोष्टी वाचतील.

जर कधी स्मार्टफोनचा पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड विसरलात तर सर्वप्रथम एका मेमरी कार्डची आणि स्मार्टफोनची सोय करायची.

या दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये हे मेमरी कार्ड insert करायचं.

नंतर या स्मार्टफोन मधून Aroma File Manager हे अॅप्लिकेशन डाउनलोड करावे. डाउनलोड करून झाल्यावर हे अॅप्लिकेशन मेमरी कार्ड मध्ये move करावं किंवा कॉम्प्यूटर मधून डाउनलोड करून ते नंतर मेमरी कार्ड मध्ये move केलं तरी चालेलं.

त्यानंतर हे मेमरी कार्ड त्या स्मार्टफोनमधून काढून तुमच्या locked झालेल्या (ज्याचा पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड तुम्ही विसरला आहात) स्मार्टफोनमध्ये insert करा.

यानंतर तुमच्या locked झालेल्या स्मार्टफोनची Power Key आणि Volume up key एकाच वेळी दाबून Recovery Mode ओपन करा.

Recovery Mode ओपन करण्यासाठी प्रत्येक फोनचे Key Combination वेगवेगळे असतात.

या Recovery Mode मध्ये गेल्यावर Volume up आणि Volume down या बटनांच्या सहाय्याने Install Zip from SD Card या पर्यायावर यावे, हा पर्याय select करण्यासाठी मोबाईलचे मधले बटण दाबावे.

==

हे ही वाचा : आयफोनने चक्क कॉपी केलेत अँड्रॉइड स्मार्टफोनचे हे पाच फीचर्स

==

 

Install Zip from SD Card पर्याय निवडल्यावर SD कार्ड मधून Aroma File Manager चा path निवडून ते install करावे.

Aroma File Manager अॅप्लिकेशन install झाल्यावर ते पुन्हा Recovery Mode मध्ये ओपन होईल.

या Aroma File Manager मधून settings मध्ये जावे, त्यात तुम्हाला सर्वात शेवटी Automount all devices on start हा पर्याय दिसेल. त्या या पर्यायावर क्लिक करा आणि exit करा.

आता पुन्हा Install Zip from SD Card या पर्यायावर यावे, हा पर्याय select करण्यासाठी मोबाईलचे मधले बटण दाबावे.

Install Zip from SD Card पर्याय निवडल्यावर SD कार्ड मधून Aroma File Manager चा path निवडून ते install करावे. Aroma File Manager अॅप्लिकेशन install झाल्यावर ते पुन्हा Recovery Mode मध्ये ओपन होईल.

आता Data Folder या पर्यायामधील System Folder या पर्यायामध्ये जाऊन gesture.key किंवा password.key या फाइल्स शोधा.

 

==

हे ही वाचा : तुमचा स्मार्टफोन फारच लवकर डिस्चार्ज होण्यामागे ही १० कारणे आहेत

==

यापैकी जी फाईल तुम्हाला दिसेल ती delete करा आणि exit करून तुमचा स्मार्टफोन reboot करा. reboot झाल्यानंतर तुमचा स्मार्टफोन सुरु होईल आणि पुन्हा तुम्हाला पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड विचारेल.

 तेव्हा जुना पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड न टाकता एखादा नवीन पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड enter करा आणि तुमचा अँड्रोईड स्मार्टफोन सुरु होईल.

पण यावेळेस मात्र तुम्ही जो नवीन पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड टाकाल तो विसरू नका. नाहीतर या सगळ्या गोष्टी नव्याने कराव्या लागतील.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version