Site icon InMarathi

नक्की काय आहे हा सरकारने लावलेला नवीन शोध – Aadhaar Pay App ?

aadhar-pay-app-marathipizza00

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

कॅशलेस युगाकडे जाण्यासाठी आपलं भारत सरकार फारच उतावीळ आहेत असं दिसतंय. गेल्या काही काळात नवनवीन कॅशलेस पेमेंट पर्याय जनतेला app च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा त्यांनी सपाटाच लावलाय जणू ! आता त्यांनी Aadhaar Pay App नावाने अजून एक application लॉन्च केलं आहे. असो, पण शेवटी हे आपल्याच फायद्याच आहे म्हणा! चला जाणून घेऊया हे Aadhaar Pay App नक्की काय आहे आणि त्याचा वापर कसा करायचा?

business-standard.com

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या app मुळे सर्वात सोपी पेमेंट पद्धत निर्माण होणार आहे ज्यामधून ग्राहक केवळ अंगठा लावून पेमेंट करू शकेल. अजून एक खास आणि आनंदाची गोष्ट म्हणजे इतर apps ला ज्याप्रमाणे मोबाईल व स्मार्टफोन लागतो तसा या app साठी मोबाईल किंवा स्मार्टफोन वापरण्याची गरज नाही. तसेच डेबिट व क्रेडीट कार्डची किंवा त्यांच्या नंबरची देखील गरज नाही. तुम्हाला केवळ तुमचा आधार क्रमांक लक्षात असला पाहिजे.

Aadhaar Pay App हे ग्राहकांना त्यांच्या स्मार्टफोन इंस्टॉल करण्याची गरज नसून दुकानदार वा व्यापाऱ्यांना हे app त्यांच्या स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल करायचे आहे. हे application सध्यातरी अॅण्ड्रोईड फोन्ससाठी उपलब्ध असून तुम्ही जर दुकानदार किंवा व्यापारी असाल तर गुगल प्ले स्टोर वर जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. त्यानंतर या app मध्ये स्वत:ला रजिस्टर करून तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती टाकून ते बँकेशी जोडावं लागेल.

aadharpaymentapp.in

इंस्टॉल केलेलं हे app एका biometric reader शी जोडलेले असेल. हे biometric reader यंत्र २००० रुपयांना मिळते. जेव्हा कधी एखादा ग्राहक एखाद्या दुकानात खरेदी करेल तेव्हा त्याला दुकानदाराच्या स्मार्टफोन मध्ये असलेल्या Aadhaar Pay App मध्ये स्वत:चा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर बँक निवडायची आहे आणि biometric reader यंत्रावर आपला अंगठा ठेवून स्कॅन करायचा आहे. एवढं केलं की तुमचं पेमेंट दुकानदाराच्या खात्यात जाईल. तुमच्या अंगठ्याचा छाप यापूर्वीच आधार कार्ड देताना सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे तुमचा अंगठा हा Aadhaar Pay App च्या व्यवहारांमध्ये तुमचा पासवर्ड असेल.

या पेमेंट सिस्टमचा हाच सगळ्यात मोठा फायद आहे की तुमच्या व्यतिरिक्त तुमचा आधार क्रमांक वापरून कोणीही तुमच्या नावावर खरेदी करू शकत नाही. ज्याचा आधार क्रमांक त्याचाच अंगठा biometric reader वर स्कॅन करणं बंधनकारक आहे. दुसऱ्या कोणी असा प्रयत्न केला तर biometric reader  व्यवहार पुढे नेणारच नाही.

Aadhaar Pay App पेमेंट सिस्टम वापरण्यापूर्वी तुमचा आधार क्रमांक तुमच्या बँक खात्यांशी जोडलेला असणे गरजेचे आहे.

या application मुळे जवळपास २५ बिलियन रुपयांचे व्यवहार होऊ शकतात अशी सरकारला आशा आहे. सरकारने सत्तेत आल्यापासून आधार कार्ड पासून वंचित असणाऱ्या लोकांना आधार कार्डशी जोडण्यासाठी मोहीम सुरु केली होती आणि त्यामुळे जवळपास संपूर्ण देश आधार कार्डशी जोडलेला आहे. हे आधार कार्ड नंतर बँकेशी जोडले गेले. त्यामुळे जनता आपसूकच बँकेशी देखील जोडली गेली. अश्याप्रकारे सरकारने कॅशेलेस युगाचा पाया तर घातला आहे आणि त्यावर application च्या माध्यमातून एक एक पायरी चढवत आहे.

upipayments.co.in

आधार कार्ड, बँक आणि जनता हे त्रिकुट आता एकमेकांशी जोडले गेले असल्याने Aadhaar Pay App साठी सध्याचे वातावरण पोषक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लोक या app चा जातीत जास्त वापर करतील अशी आशा आहे.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version