Site icon InMarathi

‘या’ प्रसिद्ध लोगोंंचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या ह्या प्रसिद्ध लोगोंविषयी!

amezone inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

प्रत्येक कंपनीचा स्वतःचा असा एक लोगो असतो.

हा लोगो म्हणजे त्या कंपनीची ओळख असली, तरी एवढंच त्याचं महत्व नाही.

 

joe.ie

 

सध्याच्या स्पर्धेच्या युगात तुमचा लोगो हा इतरांपेक्षा किती वेगळा, आकर्षक आणि समर्पक आहे हे देखिल तितकचं महत्वाचं असतं.

त्या लोगोमधून ह्या कंपन्या आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात.

या लोगोमधून ते आपल्या कंपनीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवत असतात.

हा कंपनीचा लोगो बनवण्यासाठी कंपनीवाले लाखो रुपये खर्च करतात.

आता तुम्हाला वाटेल, की लहानसा एक लोगो बनविण्यासाठी इतरे पैसे कशाला खर्च करतात?

पण प्रत्यक्षात लोगो म्हणजे कोणतंही सामान्य चित्र नसतं, तर त्यात कंपनीचं नाव, त्याची प्रॉडक्ट्स आणि कंपनीची उद्दिष्ट असणं गरजेचं असतं.

 

nohat

 

आणि त्यातही ही माहिती केवळ अक्षररुपात न देता, त्याला क्रिएटिव्हीटीची जोड असणंही खुप महत्वाचं असतं.

म्हणूनच आपला लोगो आणि स्लोगन तयार करण्यासाठी नामवंत कंपन्या या उत्तमोत्तम अॅडव्हर्टायझिंग कंपन्यांवर ही जबाबदारी सोपवितात.

त्यामुळे प्रेक्षकांनाही सातत्यानी नवे आणि दर्जेदार लोगो पहायला मिळतात.

पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का? की या प्रसिद्ध लोगोंचे अर्थ तरी काय असतात?

तर तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की, या लोगोंच्या पाठीमागे खूपचं मनोरंजक आणि हुशार अर्थ लपलेले असतात.

प्रत्येक लोगोला स्वतःची अशी कथा असते, काही रंजक किस्से असतात, काही गमतीजमती असतात. 

त्यामधील काही अर्थ खरच खूप प्रभावी आहेत.

चला तर मग जाणून घेऊया की, या प्रसिद्ध लोगोंचे अर्थ काय असतात आणि त्यामधून त्यांना काय सांगायचे असते…

१. टोयोटा

 

seeklogo.com

 

टोयोटाच्या लोगोमध्ये दिसणारे तीन दीर्घवृत्त हे तीन हृदयांचे प्रतिनिधित्त्व करतात.

ग्राहकांचे हृदय, उत्पादनाचे हृदय आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीचे हृदय असा त्याचा अर्थ होतो.

 

२. अॅमेझॉन

 

gizmodo.co.uk

 

अॅमेझॉनच्या लोगोमधील पिवळी रेषा तुम्ही पाहिली असेल.

या रेषेला जवळून पाहिल्यास असे लक्षात येते की, ती रेषा म्हणजे एक प्रकारची स्माईल आहे.

याचाच अर्थ असा, की अॅमेझॉनमध्ये खरेदी करणं म्हणजे मनसोक्त आनंद.

अॅमेझॉनवर खरेदी करताना तुमच्याही चेह-यावर हसु येईल याची खात्री लोगोमधून दिली जाते.

तसेच ही रेषा A पासून सुरू होते आणि Z ला संपते याचा अर्थ येथे A टू Z म्हणजे सर्वकाही मिळेल.

३. बेंटले

 

hdwallpaper.nu

 

बेंटले ही एक जागतिक प्रसिद्ध ब्रिटीश ऑटोमेकर कंपनी आहे.

ही कंपनी लक्झरी कार बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.

बेंटलेच्या लोगोमध्ये मोठ्या B च्या दोन बाजूला उंचावर पंखे दाखवण्यात आलेली आहेत.

यावरून कंपनी गर्वाने असा दावा करते की, जसा पक्षी आकाशामध्ये उंचच उंच उडतो, तशी आमची कार वाऱ्याच्या वेगाने पळू शकते.

४. फोक्सवॅगन

 

i.pinimg.com

 

फोक्सवॅगनच्या लोगोमध्ये व्ही चा अर्थ म्हणजे फोकस असा आहे, ज्याचा जर्मन भाषेमध्ये अर्थ होतो माणसे.

दुसरा डब्लू म्हणजे वॅगन ज्याचा अर्थ होतो कार, म्हणजेच लोकांसाठी बनलेली कार असा या पूर्ण लोगोचा अर्थ आहे.

५. आयबीएम

 

pngimg.com

 

आयबीएमच्या लोगोमध्ये संपूर्ण जगाचा अर्थ लपलेला आहे.

आयबीएमच्या लोगोवर असलेल्या पांढऱ्या रेषा ह्या समानतेचे चिन्ह दर्शवते आणि त्याच्या उजव्या बाजूवरील खालच्या रेषा या समानता दर्शवतात.

६. गुगल

 

blogspot.com

 

गुगलच्या लोगोमध्ये सलग चार प्राथमिक रंग आहेत, जे दुसऱ्या दुय्यम रंगांनी जोडलेले आहेत.

यावरून गुगल हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की, ते कधीही नियमांशी खेळत नाहीत म्हणजे त्यांचे उल्लंघन करत नाही.

 

७. ऑडी

 

oooo.ucoz.ua

 

केवळ तरुणच नव्हे, तर सगळ्याच वाहनप्रेमींना हा लोगो परिचयाचा आहे.

आपल्या वाहनावरही हा लोगो असावा असं प्रत्येकाला वाटतं.

अगदी काही वर्षांपुर्वीपर्यंत या लोगोच्या गाड्या मोजक्या दिसत असल्या तरी आता मात्र प्रत्येक शहरात ऑडी धावताना दिसते.

ऑडीच्या लोगोमध्ये चार वर्तुळे दर्शवलेली असतात.

त्यापैकी प्रत्येक वर्तुळ हे १९३२ मध्ये ऑटो युनियन कंसोर्टियम संस्थेने ४ नवीन कंपन्यांची स्थापना केली होती.

डीकेडब्लू, हॉर्च, वाँडरर आणि ऑडी ह्या त्या कंपन्या होत्या, म्हणून त्यांचा लोगो असा आहे.

८. मर्सिडीज बेंझ

 

wallpapersafari.com

वाहनविश्वातलं आणखी एक अग्रगण्य नाव म्हणजे मर्सिडीज.

मर्सिडीज बेंझचा लोगो हा सर्वात आत्मविश्वास दर्शवणारा आहे.

मर्सिडीज बेंझ यांच्या लोगोमध्ये असलेले तीन स्टार हे कंपनीचे गुणवत्तेवरील वर्चस्व आणि संपूर्ण विश्वामध्ये सापडणार नाही अशी स्टाईल दर्शवते.

९. मास्टरकार्ड

 

seeklogo.com

 

मास्टरकार्डच्या लोगोमधील लाल रंगाचा वापर उत्कटता, धैर्य आणि आनंद दर्शवतो.

तसंच पिवळा रंग हा आशावाद, समृद्धता आणि समृद्धी दर्शवतो.

१०. बीएमडब्लू

 

ytimg.googleusercontent.com

 

अग्रगण्य कंपनींमधील एक नाव म्हणजे बीएमडब्ल्यु.

बीएमडब्लूचा लोगो हा सर्क्युलर रॅप मोटेरनेवेर्केच्या लोगोमधून घेण्यात आलेला आहे.

जो बेवेरीया देशाच्या ध्वजाच्या रंगाशी जोडलेला आहे.

तथापि, काहीजण असे म्हणतात की, या लोगोमध्ये प्रोपेलरचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

असे हे लोगो काही न काही आपल्या आकारमानातून आणि डिझाईनमधून लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात.

आपण जी उत्पादनं वापरतो, ज्या साईट्सवर ऑनलाईन खरेदी करतो, किंवा ज्या कंपन्यांचे आपण ग्राहक आहोत, त्या प्रत्येक कंपनीचा लोगो, त्याचा अर्थ आपल्याला माहित असणं गरजेचं आहे.

केवळ माहिती म्हणूनच नव्हे तर अनेकदा आपल्या कामाच्या ठिकाणी, मुलाखतीला या लोगांचा अर्थ विचारला जाऊ शकतो.

त्यावेळी या लोगांचा अर्थ माहीत असेल, तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होवु शकतो.

जर या लोगोंबद्दल कधी तुमच्या मनामध्ये शंका निर्माण झाली असेल, तर ती शंका आता नक्कीच दूर झाली असेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version