आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आपल्याला Disney हे नाव नावं नाही. तुम्ही जर नव्वदच्या दशकातील असाल तर तुम्हाला Disney हे नाव एखाद्या बालमित्रासारखं वाटत असेल.
Disney चं जग फारच भारी!
तो गोंडस मिकी माऊस आणि त्याची मैत्रीण मिनी, डोनाल्ड डक आणि त्याचे भाचे, अलादिन आणि त्याचा जिन, टारझन, मोगली, निमो, डोरी, जंगलाचा राजा सिंबा, सगळ्यात गोड अशी ट्वीटी असे एक न अनेक धमाल मित्र ह्या जगात आहेत.
ज्या Disney studio ने अश्या सुंदर पद्धतीनं तुमचं बालपण रंगवलंय त्या Disney चं थीम पार्क Disneyland जगप्रसिद्ध आहे. १९५५ साली अमेरिकेत सुरू झालेलं हे विश्व आता थीम पार्क्सची साखळी म्हणून उभं आहे.
सगळ्या आवडत्या कार्टून पात्रांशी भेट आणि भरपूर रोमांचक अशा rides एकाच जागी असलेलं Disney-Land लहानांपासून मोठ्यांपर्यंत आकर्षणाचं स्थळ असण्यात दुमत नाही. कॅलिफोर्निया, शांघाई, पॅरिस, टोकियो, हॉंगकॉंग अशा देशांमधल्या यशानंतर Disney चं लक्ष आहे ते भारतावर.
Yes…! The great news is – आता Disneyland भारतात पण येऊ घातलंय. 🙂
होय मित्रांनो, ह्या प्रकल्पासाठी कर्नाटकच्या बंगळूर शहराची निवड झालीये.
बंगळूर शहराच्या च्या उत्तरेकडील भागात देवनपुरा गावापाशी जागेचा शोध सुरु आहे. बंगळूर पर्यटन विभाग ह्या प्रकल्पासाठी उत्सुक आहे. ह्या प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तसेच ८००-१००० एकर जमिनीची आवश्यकता आहे.
आम्ही थीम पार्क साठी एकत्रित अशी जागा शोधात आहोत. आणि सार्वजनिक-खाजगी पद्धतीची partnership असलेल्या ह्या प्रकल्पासाठी खाजगी investors शोधत आहोत.
बंगळूर मध्ये सध्या तीन अशीच पार्क्स आहेत – Wonder La (क्षेत्रफळ ८१.५ एकर), Innovative Film City, Mysuru Road आणि Fun World, म्हैसूर राजवाड्याजवळ.
मुंबईचं Essel World आणि Water Kingdom एकूण ६५ एकरांवर पसरलंय.
तर मित्रांनो आता आपल्याला Disneyland साठी दुसऱ्या देशात जाण्याची गरज नाही…!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.