Site icon InMarathi

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘Kheyti स्टार्टअप’!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आजकाल दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या सारख्या कानी पडत असतात. आपला अन्नदाता म्हणून ज्या शेतकऱ्याकडे आपण पाहातो, त्याची आजची हलाखीची स्थिती पाहून मन विषण्ण होते. एकेकाळच्या संपन्न कृषी व्यवसायाला आज एवढी उतरती कळा यावी यापेक्षा दुर्भाग्य ते काय! दुष्काळाने तर बळीराजाला अगदी हैराण करून सोडलंय. कधी कधी अचानक गारपीट होते किंवा पाऊस सुरु होतो आणि संपूर्ण पिक उध्वस्त करतो. पिक उध्वस्त म्हणजे हाती एकही रुपया लागत नाही उलट कर्ज वाढते. हाच कर्जाचा बोजा असह्य झाल्यावर आपला शेतकरी बंधू आत्महत्येचा मार्ग अवलंबतो आणि आपले जीवन संपवून या दु:खातून कायमचा मुक्त होतो.

thenewsminute.com

शेतकऱ्यांच्या याच वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्दिष्टाने सत्या रघु व्हि मोकापट्टी नामक तरुणाने स्टार्ट अपचा मार्ग निवडला आहे. २५ शेतकऱ्यांसोबत काम करताना मोकापट्टीच्या लक्षात आले की,

पिकाचा जास्त उन आणि किडीपासून बचाव केला तर शेतीमध्ये भरपूर फायदा होऊ शकतो.

मोकापट्टी आणि त्याच्या मित्रांनी या गोष्टीवर जवळपास सहा महिने संशोधन केले आणि त्यातून त्यांना एक आगळा वेगळा मार्ग सापडला. त्यांनी असा निष्कर्ष काढला की,

खुली लागवड केल्याने अथवा खुल्या आभाळाखाली पिक घेतल्याने त्याचा पिकांवर परिणाम होतो. उत्पन्न कमी येण्याचे किंवा पिक खराब होण्याचे हेच प्रमुख कारण आहे. त्यासाठी पिकांचे थेट उन्हापासून संरक्षण करणे महत्त्वाचे होते.

weseegenius.com

आपली ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना ही गोष्ट पटवून देऊन उत्तम पिक घेण्यात त्यांना मदत करण्यासाठी डिसेंबर २०१६ मध्ये त्यांनी Kheyti नावाचे एक स्टार्टअप सुरु केले. आपल्या या कंपनी अंतर्गत त्यांनी Greenhouse-in-a-Box’ (GIB) बनवले. हे एक प्रकारचे कमी खर्चाने उभारलेले ग्रीनहाऊस आहे.

त्यांनी बनवलेले हे GIB २०० स्केअर मीटर एवढीच जागा घेते. या GIB मधून त्यांनी सिद्ध करून दाखवले की, यात शेती केली तर शेतकऱ्याला दर महिन्याला कमीत कमी ५००० रुपये उत्पन्न नक्की मिळणार, तसेच हे GIB शेतकऱ्याच्या जमिनीपैकी केवळ २ टक्के हिस्साचं घेते. अजून एक खास गोष्ट म्हणजे यामध्ये शेती केली तर ९०% कमी पाणी लागते.

fastcompany.com

या तरुणांनी GIB मध्ये चांगल्या प्रतीचे बीज पेरले आणि त्यांना आढळून आले की, खुल्या लागवडीपेक्षा यामध्ये चार ते पाच टक्के जास्त उत्पादन मिळाले आहे.

प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवून त्यांना या  GIB चे महत्त्व पटवून देण्याचा Kheyti स्टार्टअपचा मानस आहे. या एका GIB ची किंमत १,६०,००० रुपये इतकी आहे. शेतकरी ३०,००० रुपये डाऊन पेमेंट भरून हे GIB विकत घेऊ शकतात. अगोदर म्हटल्याप्रमणे हे एक छोटेखानी ग्रीन हाउसच आहे. सध्या ग्रीन हाउस उभारणीसाठी ३०-४० लाख रुपये खर्च हमखास येतो, त्या तुलनेत शेतकऱ्यांना हे GIB अतिशय स्वस्त किंमतीमध्ये मिळते आहे.

letsventure.com

Kheyti स्टार्टअपला GIB सारख्या विविध प्रकारच्या नव नवीन आयडिया शोधून काढायच्या आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीमध्ये अधिक यश मिळू शकेल, म्हणजे त्यांच्या हातात पैसा खेळू लागेल आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यास मदत होईल.सध्या Kheyti स्टार्टअप केवळ तेलंगणा राज्यामध्ये कार्यरत आहे, परंतु लवकरच ते आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये देखील आपली ही योजना सुरु करण्याच्या तयारीत आहेत.

व्यवसायासोबत समाजाचं भलं करण्याच्या दृष्टीने काम करण्याची या तरुणांची मेहनत खरंच कौतुकास्पद आहे.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version