Site icon InMarathi

डॉ. मेधा खोले यांना ट्रोल करताय? थांबा – सत्य जाणून घ्या

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

संपादकीय स्पष्टीकरण : हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. खोलेंनी मोलकरणीने आडनाव-जात खोटी सांगितली म्हणून मोलकरणीवर फसवणुकीची केस दाखल केली. त्यावरून महाराष्ट्रभर, विशेषतः फेसबुकवर, चर्चा झडत आहेत. सदर घटनेवर काही तासांपूर्वीच आम्ही एक लेख प्रसिद्ध केला आहे. त्या लेखात खोले कश्या चुकीच्या आहेत व त्यांचं समर्थन करणारे कळत नकळत कसं जातीयवादाचं समर्थन करत आहेत हे विशद केलं होतं. सदर लेख इथे क्लिक करून वाचू शकता. ह्या प्रकरणाची दुसरी बाजू उजेडात आणणारा, श्री मयुरेश प्रभुणे ह्यांचा लेख आम्ही प्रसिद्ध केला होता.

डॉ खोले ह्यांनी सदर प्रकारणाबद्दल माफी मागून आपली तक्रार मागे घेतली आहे.

लेखक श्री प्रभुणे ह्यांनी ह्या प्रकरणावरील त्यांचा लेख मागे घ्यावा अशी विनंती केली आहे. त्यांच्या विनंतीचा मान राखून आम्ही हा लेख काढून घेत आहोत.

लेखक : मयुरेश प्रभुणे ह्यांचं स्पष्टीकरण :

डॉ मेधा खोले यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून आपली तक्रार मागे घेतली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर दोन दिवस निर्माण झालेली अशांततेची स्थिती आता तक्रार मागे घेतल्यानंतर निवळण्यास सुरुवात व्हावी ही अपेक्षा. हा विषय आणखी ताणाला जाऊ नये यासाठी माझा लेख डिलीट करीत आहे. या दरम्यान माझ्याकडून व्यक्तिशः कोणी प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या दुखावले गेले असल्यास क्षमस्व.

– मयुरेश

लेखकांनी त्यांचा लेख मागे घेतला असला तरी टीम मराठीपिझ्झा ची भूमिका पुन्हा स्पष्ट करणे हे आमचं कर्तव्य आहे :

१) डॉ खोले ह्यांचं कृत्य “चार भिंतीतील गोष्ट”, “खाजगी गोष्ट”, “धर्म स्वातंत्र्य” किंवा “व्यक्ती स्वातंत्र्य” ह्या मुद्द्यावर समर्थनीय ठरत नाही. कारण सोवळं, शुचिर्भूत असणं हे जन्माधिष्ठित जातीवरून ठरवलं जाणं ही प्रवृत्ती समर्थनीय नाही.

डॉ खोले ह्यांच्या स्वयंपाकीण बाईंनी ६ वेळा स्वयंपाक केला त्यांच्याकडे. म्हणजे त्या बाईंचं काम चांगलं होतं – अन्यथा खोलेंनी त्यांना पुन्हा सोवळ्यातील स्वयंपाकाला बोलावलं नसतं. म्हणजे त्या चांगला स्वयंपाक करतात, स्वच्छताही पाळत असाव्यात…मग फक्त जन्माच्या जातीवरून सोवळं भंगलं असं का वाटावं? स्वच्छतेवर, निर्जंतुक स्वयंपाक असण्यावर जरूर लक्ष घालावं…पण ह्या गोष्टींचा जातीशी संबंध असू नये.

२) डॉ खोलेंच्या सोवळ्याच्या चालवलेल्या समर्थनाचा तीव्र विरोध करायला हवा. डॉ खोलेंच्या कृत्याहून ह्या समर्थनाची दाहकता कितीतरी अधिक आहे.

धन्यवाद.

टीम मराठीपिझ्झा

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version