' खास स्त्रियांसाठी, स्वरक्षणाची ५ आधुनिक अस्त्र – आवर्जून वापरा! – InMarathi

खास स्त्रियांसाठी, स्वरक्षणाची ५ आधुनिक अस्त्र – आवर्जून वापरा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्त्रियांची सुरक्षा ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. रोज उठून वर्तमानपत्र हातात घेल्यावर स्त्रियांवरील अत्याचाराच्या असंख्य बातम्या मन अगदी अस्वस्थ करून सोडतात.

हे सर्व कधी थांबणार हे साक्षात ब्रह्मदेव जरी सांगू शकणार नसला तरी आता मात्र स्त्रियांनीच स्वत:ची सुरक्षा स्वत: घेण्याची वेळ आली आहे. यासाठी पहिले शस्त्र म्हणून स्त्रिया आपल्या स्मार्टफोनचा वापर करू शकतात.

तुम्ही विचार करत असाल, स्मार्टफोन स्त्रियांच्या सुरक्षेसाठी कसा काय प्रभावी ठरू शकतो? त्याचं उत्तर आहे आजचं प्रगत तंत्रज्ञान!

 

 

सध्याच्या घडीला स्मार्टफोनमध्ये वापरता येतील आणि स्त्रियांच्या सुरक्षेसाठी रामबाण पर्याय ठरू शकतील अशी काही सेफ्टी अॅप्स उपलब्ध आहेत. हे सेफ्टी अॅप्स जर स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या मोबाईलमध्ये असतील तर ती स्वत:चा बचाव स्वत: करू शकते यात तिळमात्र शंका नाही.

 

Life 360 App

 

Life360-app-Geoawesomeness InMarathi

 

 

Life 360 App तुमच्या घरातल्या लोकांना तुम्ही ज्या लोकेशनवर आहात त्या लोकेशनची त्वरित माहिती पाठवते. हे अॅप जीपीएस ट्रॅकिंग तंत्रज्ञानावर चालते. या अॅपद्वारा जीपीएस, वाय-फाय किंवा कॉल ट्रायंग्यूलेशनच्या माध्यमातून कोणता व्यक्ती कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती मिळवता येते.

या व्यतिरिक्त या अॅप मध्ये एक पॅनिक बटन देखील देण्यात आले आहे. जे दाबल्यावर जवळच्या व्यक्तीला मदतीसाठी sos मेसेज पाठवला जातो. आयऑएस आणि अँड्रोईड अश्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अॅप उपलब्ध आहे.

 

Nirbhaya: Be Fearless

 

nirbhaya-app-marathipizza

 

दिल्लीमधील दुर्दैवी निर्भया प्रकरण आठवतंय? त्याच घटनेनंतर हे अॅप तयार करण्यात आलं आहे. यामध्ये जीओ फॅन्स, स्टॉप, शेक टू अलर्ट, अनसेफ एरिया अलर्ट आणि हीट मॅप सारखे जबरदस्त फीचर्स आहेत.

या व्यतिरिक्त हे अॅप प्रत्येक ३०० मीटरनंतर लोकेशन अपडेट करते. संकटाच्या वेळी जर या अॅप मधला sos पर्यंत तुम्ही निवडला तर दर 2 मिनिटांनी हे अॅप तुम्ही ज्या व्यक्तींचे नंबर सेव्ह केले आहेत त्यांना मेसेज पाठवत राहील.

आयऑएस आणि अँड्रोईड अश्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अॅप उपलब्ध आहे.

 

I Feel Safe

 

ICE-Personal-Safety-App-marathipizza

 

खास करून दिल्ली युनिव्हर्सिटी मधील स्त्री वर्गासाठी हे अॅप तयार केले गेले होते.

या अॅप मध्ये व्हर्चूअल पॅनिक बटनची खास सोय देण्यात आली आहे. अॅप मधील सेफ्टी पावर बटन पाच वेळा दाबल्यावर अलार्म अॅक्टीव्ह केला जाऊ शकतो. जेव्हा तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन लॉक असेल किंवा सीम कार्डला नेटवर्क नसेल किंवा वाय-फाय अव्हेलेबल नसेल तेव्हा देखील हे अॅप काम करते.

मुख्य म्हणजे या अॅपमधील बहुतांश फीचर्ससाठी इंटरनेटची देखील गरज नाही. संकटाच्या वेळी फोनबुक मधील कॉन्टॅक्सना हे अॅप मेसेज आणि लोकेशन पाठवते. आयऑएस आणि अँड्रोईड अश्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अॅप उपलब्ध आहे.

 

ICE: Personal Safety App

 

ICE-Personal-Safety-App-marathipizza

 

हे अॅप गेल्या काही काळापासून ग्राहकांच्या चांगलेच पसंतीस उतरते आहे. या अॅप मधील विशेष गोष्ट ही आहे की तुम्ही स्मार्टफोन एकदा झटकला किंवा स्मार्टफोनला कनेक्ट असलेला एयरफोन ओढून काढला तर हे अॅप तुमच्या कॉन्टॅक्सना लगेच अलर्ट पाठवते.

जीपीएस लोकेशन सोबत इमेल आणि टेक्स्ट मेसेज देखील तुमच्या कॉन्टॅक्सना पाठवला जातो. जोवर तुम्ही हे बंद करत नाही तोवर हे अॅप कॉन्टॅक्सना अपडेट देणं सुरूच ठेवतं.

हे अॅप तुम्हाला आसपासची पोलीस स्टेशन्स आणि हॉस्पिटलची देखील माहिती देते. या व्यतिरिक्त हे अॅप महिलांना सेल्फ डिफेन्सच्या टिप्स देखील पाठवत असते. आयऑएस आणि अँड्रोईड अश्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अॅप उपलब्ध आहे.

 

Chilla – Anti Rape Women App

 

Chilla–Anti-Rape-Women-App-marathipizza

 

हे अॅप ओरडण्याचा किंवा किंचाळण्याचा आवाज ऐकल्यावर काहीतरी धोका आहे हे लगेच ओळखते आणि ऑटोमॅटिकपणे अॅक्टीव्ह होते. इतर अॅप्स प्रमाणे हे अॅप देखील संकटकाळी तुमच्या कॉन्टॅक्सना तुमचे लोकेशन पाठवते.

स्मार्टफोनचे पावर बटन ५ वेळा दाबल्यावर देखील हे अॅप अॅक्टीव्ह करता येते. मुख्य म्हणजे फोन स्वीच ऑफ असेल किंवा बॅटरी संपली असेल तरी हे अॅप काम करते. आयऑएस आणि अँड्रोईड अश्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अॅप उपलब्ध आहे.

अजूनही या यापैकी कोणतेही अॅप तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर आताच कोणतेही एक अॅप डाऊनलोड करा आणि स्वत:ची सुरक्षा स्वत: करण्याच्या दिशेने पहिले पाउल टाका. तसेच तुम्हाला माहित असलेले अजून काही उपयुक्त अॅप्स असल्यास कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?