गुगल बद्दलच्या ‘ह्या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
गुगल आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग तर आहेच, पण काहीही शंका असली की, त्याबद्दल आपल्याला समाधानकारक उत्तर देणारा तो आपला मार्गदर्शक देखील आहे. ज्याप्रमाणे आत्म्याविना शरीर निरुपयोगी तसेच काहीसे गुगल विना इंटरनेट आणि परिणामी आपले जीवन निरुपयोगी ठरेल असे म्हटले तर वावगे ठरू नये.
कारण इतर कोणतेही सर्च इंजिन येवो, पण आपल्या आयुष्यात जे स्थान गुगलने निर्माण केलंय ते स्थान इतर कोणतही सर्च इंजिन हिरावून घेऊ शकणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे.
जगातील या अग्रगण्य कंपनीने संपूर्ण जगभर आपले असे काही साम्राज्य उभे केले आहे की पुढील शतकभर तरी त्या साम्राज्याला तडा जाणार नाही हे नक्की.
असो तर या गुगलबद्दल तुम्हाला सगळी माहिती असेलच, पण आम्हाला वाटतं की, अजूनही अशी काही माहिती आहे जी तुम्हाला माहित नाही… काय म्हणता? संपूर्ण जगभरातील माहिती लोकांना पुरवणारं गुगल स्वत:बद्दलची अशी काय गोपनीय माहिती लपवून ठेवून आहे असं विचारता?
तर मंडळी ही माहिती काही धक्कादायक वा गोपनीय नाही, परंतु रंजक मात्र नक्की आहे आणि जी गुगल वापरणाऱ्या प्रत्येकाला माहित असायलाच हवी अशी आहे.
चला आता जास्त उत्सुकता न ताणता जाणून घेऊया काय आहे ती माहिती.
१) तुम्हाला हे माहित असेल की, लॅरी आणि सर्गी यांनी गुगलची स्थापना केली, पण तुम्हाला हे माहित नसेल की, ऑगस्ट १९९८ मध्ये सन मायक्रोसिस्टिम कंपनीचे सहसंस्थापक अँडी बॅचतोलशॅयम यांनी दोन्ही मित्रांना एक लाख डॉलर इतकी रक्कम दिली.
त्यायोगे त्यांना गुगल कंपनी सुरू करता आली.
२) आय अॅम फिलिंग लकी हे बटण देण्यासाठी गुगलला दरवर्षी ६८२ कोटी इतकी रक्कम द्यावी लागते.
यात जाहिरात न पाहता युजरला थेट रिझल्ट मिळतो.
३) गुगलने ई-मेलसोबत सोशल मीडियात जबरदस्त आघाडी मिळवली असून कंपनीने २०२० पर्यंत १२ कोटी ९० लाख पुस्तके स्कॅन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
४) सौदी अरबच्या वाळवंटामध्ये स्ट्रीट व्ह्यूच्या शूटिंगसाठी गुगलने भाड्याने उंट घेऊन त्याच्या पाठीवर कॅमेरे बसवले होते.
कठीण माेहीम सहजसोपी करण्यासाठी ही पद्धत अवलंबण्यात आली.
५) गुगलच्या सर्च इंजिनवर दर मिनिटाला २० लाख गोष्टी सर्च केल्या जातात. २४ तासांत १६ टक्के अशा गोष्टी सर्च केल्या जातात ज्या यापूर्वी कधीही गुगलमध्ये नोंदल्या गेल्या नव्हत्या.
६) लॅरी आणि सर्गी यांनी १९९६ मध्ये इंटरनेटवर सर्च इंजिन तयार केले. याचे नाव आधी बॅकरब होते. १९९७ मध्ये कंपनीला गुगल डॉट कॉम डोमेन मिळाले.
७) गुगलचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मायक्रोसॉफ्टने युजर्सना बिंग वापरण्यासाठी काही रक्कम देण्याची लालूच दाखवली; पण गुगलच्या युजर्सवर याचा परिणाम झाला नाही.
८) कंपनीतील एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला पुढील १० वर्षे अर्धा पगार दिला जातो. त्याचबरोबर मुलांना एक हजार डॉलर इतकी रक्कम तो १९ वर्षांचा होईपर्यंत दिली जाते.
९) गुगल हे ४० पेक्षा जास्त देशांमध्ये ७० कार्यालये चालवते.
१०) दररोज १०० कोटीपेक्षा जास्त सर्च रिक्वेस्ट गुगलकडून हाताळल्या जातात. या जवळपास १० लाख संगणकामधून पाठवण्यात येतात.
११) जून २००० मध्ये गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन बनले होते, जे ते अजूनही टिकून आहे.
१२) तुम्हाला माहित आहे का ? की गुगलकडे ऑनलाइन असलेल्या व्यक्तीचे वर्तन विश्लेषण करण्याची आणि ते ट्रॅक करण्याची क्षमता आहे. तुम्ही कोणत्या साईट्सवर जात आहात आणि कोणत्या जाहिरातींवर क्लिक करत आहात, याबद्दलची माहिती गुगल त्यांच्या जाहिरातदारांना देते.
१३) ८८ भाषा गुगल होम पेजवर वापरल्या जाऊ शकतात.
१४) २००७ मध्ये गुगलने अॅपल आयफोनला स्पर्धक म्हणून स्वतःचा मोबाईल फोन काढण्याची योजना आखली. या प्रकल्पाला अँड्रॉइड नाव देण्यात आले, जी आज मोबईलची ऑपरेटिंग सिस्टम आहे.
१५) १००० पेक्षा जास्त डुडल्स त्यांच्या टीमने तयार केले आहेत. गुगलच्या या टीमला डुडलर्स असे म्हटले जाते. हे सर्वच खूप प्रतिभावान इलूस्ट्रेटर आहेत, जे गुगलच्या होमपेजवर येणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवतात. गुगलने पहिले डुडल १९९९ मध्ये तयार केले होते.
१६) आपण जर गुगलने दिलेल्या सेवांमधील सर्व कोड जोडले, म्हणजेच जिमेल, गुगल डॉक्स आणि युट्युब या सर्वांचे कोड जोडले, तर आपल्याला त्यामध्ये २०० कोटी कोडच्या ओळी आणि जवळपास ८६ टेराबाईट फाइल्स मिळतील.
१७) २००६ मध्ये गुगलने १.६५ बिलियन डॉलर्सला युट्यूबला विकत घेतले होते. युट्यूब आज जगतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लोकप्रिय वेबसाईट आहे. युट्यूबवर प्रत्येक मिनिटाला ३०० तासांपेक्षा जास्त व्हिडीओ अपलोड होतात, असे गुगलच्या लक्षात आले आहे.
१८) गुगल स्ट्रीट व्ह्यूव हे खूपच प्रभावशाली वाटते. याच्या मदतीने आपण त्या जागी खरच गेलोय का ? असा भास होतो. काही वर्षांपूर्वी गुगलने १९४ देशांमधील २८ मिलियन मैल रस्ते गुगल मॅप्सने यशस्वीरीत्या व्यापले होते. या सर्वांचा जवळपास २० पेटबाइट्स डेटा या गुगल मॅप्सचा गुगलकडे आहे.
१९) गुगलने मोटोरोला मोबिलिटीला १२.५ बिलियन डॉलर्सना २०११ मध्ये विकत घेतले होते आणि २.९१ बिलियन डॉलर्सना २०१७ मध्ये विकले होते.
२०) गुगलचा ९९ टक्के नफा हा जाहिरातींमधून येतो.
काय म्हणता, माहित होत्या का ह्या गोष्टी तुम्हाला???
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.