Site icon InMarathi

आजचं ज्ञान: फेसबुक बद्दल एक fun-fact सांगतोय स्वतः Mark Zuckerberg

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

फेसबुकने प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श केलाय. तुम्ही स्वतः फेसबुक वापरत असाल किंवा नसाल (seriously? फेसबुक वापरत नाही? 😮 ) – तुम्ही ह्या amazing गोष्टीबद्दल १००% ऐकलं असणारच. तुम्हाला फेसबुकचा लोकांवरील प्रभाव मान्य करावाच लागणार…!

एका कॉलेज-प्रोजेक्टने बघता बघता महाकाय ऑनलाईन विश्वाचं स्वरूप घेतलंय.

फेसबुक किती मोठं आहे, किती मोठं झालंय हे आपण आकडेवारी वाचून समजून घेऊ शकतो – पण कधीकधी केवळ आकडे पूर्ण perspective देत नाहीत. त्यासाठी जर काही संदर्भ वापरले तर चटकन लक्षात येतं.

 

आज फेसबुकचा जनक आणि प्रमुख (founder आणि CEO) – मार्क झुकरबर्ग ने लेटेस्ट फेसबुक युजर्सचा आकडा घोषित केलाय.

पण केवळ आकडा घोषित करून मार्क थांबला नाही – त्याने एक गमतीशीर संदर्भ पण दिलाय :

 

 

एक गमतीशीर fact : १०० वर्षापूर्वी जेवढे लोक जिवंत होते, तेवढे लोक आज फेसबुक वापरत आहेत. (~ १.७ बिलियन/अब्ज लोक)

 

म्हणजेच –

१०० वर्षापूर्वी जेवढी पृथ्वीची लोकसंख्या होती – तेवढे लोक आज फेसबुक वापरतात!

लई भारी राव मार्क !

स्त्रोत

पण हे झालं फक्त युजर्सबद्दल. Facbook पैसा किती कमावतीये?

ते आकडेसुद्धा डोळे विस्फारण्याइतके मोठे आहेत.

२०१६-१७ ह्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या quarter (तिमाही) मधे facebook ने 6.2 अब्ज डॉलर्सची उलाढाल केली. ज्यात निव्वळ नफा आहे – तब्बल २ अब्ज डॉलर्स.

Wall Street Journal ने facebookच्या नफ्याचा चढता क्रम एका चार्टमधे असा दाखवलाय :

एक महत्वाची गोष्ट नोंदवायलाच हवी – जी ६.२ अब्ज डॉलर्सची उलाढाल नोंदवल्या गेलीये, त्यातील ८४% उलाढाल मोबाईल वरून आहे!

म्हणजेच, फेसबुकचा वापर मोबाईलवरून प्रचंड प्रमाणात वाढत तर आहेच – त्याच प्रमाणात आपल्याला फेसबुकवर दिसणाऱ्या जाहिरातीदेखील वाढत आहेत!

सर्वात शेवटी – facebook परिवारातील चारही बड्या प्लेयर्सची कामगिरी बघा :

मार्कची वरील पोस्ट म्हणजे – facebook हे डिजीटल जगातील महाकाय बिझनेस हाऊस होतंय – ह्याची साक्षच आहे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version