Site icon InMarathi

Flipkart ने jabong विकत घेतली! – Snapdeal आणि Future Group चा पराभव!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

एकीकडे भारतीय ई-कॉमर्सचे ‘वाईट दिवस’ आलेत अश्या बातम्या येत आहेत. ऑनलाईन रिटेलमधून अजूनही नफा मिळत नाहीये, पण दुसरीकडे ह्या वेबसाईट, मोठाले व्यवहार करून एकमेकांवर कुरघोडी करतच आहेत!

अशीच एक कुरघोडी आता official झालीये.

“Fashion and Lifestyle” सेग्मेंटमधली Myntra ही flipkart ची एक उपकंपनी (ही सुद्धा विकत घेतलेलीच!).

ह्या Myntra ने Jabong ही दुसरी fashion ecommerce वेबसाईट विकत घेतलीये.

 

Myntra चे CEO, अनंत नारायणन म्हणतात :

भारताचा सर्वात मोठा Fashion platform होण्याकडे आमचा प्रवास सुरू आहे. Jabong विकत घेणं ही त्या प्रवासातील नैसर्गिक स्टेप आहे. हे दोन्ही brands (myntra आणि jabong) अनेक प्रकारे एकसारखेच आहेत. भारतीय fashion e commerce ला पुढे नेण्यामधे आम्ही jabong च्या टीमसोबत काम करण्यास उत्सुक आहोत.

अनंत नारायणमूर्ती, Myntra चे CEO

स्त्रोत

गेल्या बऱ्याच दिवसांपासून “मार्केट” मधे Jabong विक्रीस होती. मोठमोठ्या कंपनीज Fashion and Lifestyle क्षेत्रात आपलं बस्तान मजबूत करण्यासाठी jabong विकत घेण्यास उत्सुक होत्या.

ह्या सर्वांत Snapdeal आणि Future Group (माहितीये ना? बिग बझार आणि pantaloon वाला ग्रूप!) देखील होते.

पण Flipkart ने त्यांच्यावर विजय मिळवलाय.

ह्या acquisition मुळे flipkart group चं अस्तित्व fashion सेग्मेंटमधे अधिक मजबूत होणारे.

ज्यामुळे ह्यापुढे Amazon Fashion ला मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Exit mobile version