' चीनमधील जागतिक रोबोट कॉन्फरन्समधील हे १३ फोटोज बघायलाच हवेत! – InMarathi

चीनमधील जागतिक रोबोट कॉन्फरन्समधील हे १३ फोटोज बघायलाच हवेत!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

तंत्रज्ञान क्षेत्रात चीनचा हात संपूर्ण जगात कोणीही धरू शकत नाही ही गोष्ट प्रत्येक विज्ञान-तंत्रज्ञान प्रेमी माणूस मान्य करेल. हा…आता त्यांनी लावलेले शोध व बनवलेल्या गोष्टी कितपत टिकतील याची काही शाश्वती मात्र देता येत नाही, पण तरीही त्यांच्या भन्नाट कल्पनांना मात्र द्यावी तेवढी दाद कमी आहे. रोबोट्सवर तर चीनमधील प्रत्येक व्यक्तीचं विशेष प्रेम! पण रोबोट्स विषयी चीन्यांचे विचार काहीसे पुढारलेले वाटतात, कारण आपण आपल्या इथे माणसांना कामाला जुंपतो, तर दुसरीकडे चीनी हाच पायंडा बदलू पाहत… त्यासाठी ते रोबोट्स तयार करून त्यांना कामाला ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. असो अतिशयोक्तीचा भाग सोडला तर चीन्यांचे रोबोट्सप्रेम हे जगजाहीर आहे आणि या त्यांच्या रोबोट्स प्रेमाची साक्ष म्हणजे वर्ल्ड रोबोट कॉन्फरन्स!

wrc-marathipizza01
wfeo.org

यावर्षीही बीजिंग येथील या कॉन्फरन्सला तुफान प्रतिसाद मिळाला. या कॉन्फरन्सची विशेषता म्हणजे जगभरातील रोबोट्सप्रेमी या कॉन्फरन्समध्ये सहभागी होतात. रोबोटिक्स क्षेत्रात कार्य करणाऱ्या कंपनी आणि विद्यार्थ्यांसाठी ही कॉन्फरन्स म्हणजे सुवर्णमय संधी असते. या कॉन्फरन्सद्वारे ते आपले प्रोडक्ट्स जगासमोर सादर करू शकतात. यंदाची वर्ल्ड रोबोट कॉन्फरन्स विविध कारणांनी विशेष ठरली. त्यातीलच काही खास Business Insider छायाचित्रे या वेबसाईटने प्रसिद्ध केली होती, तीच छायाचित्रे आपल्या मराठी वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.

१) आईसक्रीम कोन्स बनवणारा हा रोबोट प्रत्येकाचेच लक्ष वेधून घेत होता.

wrc-marathipizza02

 

२) या आर्टिफिशीयल लीम्ब्स येणाऱ्या काळात वैद्यकीय क्षेत्रात मोठा बदल घडवू शकतात.

wrc-marathipizza03

 

३) कॉन्फरन्समध्ये सगळीकडे ऑटोनोम्स रोबोट फिरताना दिसत होते, ज्यांच्याकडे प्रत्येकजण वळूनवळून पाहत होता. तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी  देखील एक स्पर्धा ठेवण्यात आली होती, ज्यामध्ये कोणत्या कॉलेजचा रोबोट बेस्ट कमांड घेतो हे पाहिले जात होते.

wrc-marathipizza04

 

४) रोबोटिक्स डॉग्जनी देखील प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले.

wrc-marathipizza05

 

५) सॉफ्टबँक्सचे पेपर रोबोट्स मनुष्यांचा अद्देश पाळण्यात भलतेच तरबेज असल्याचे दिसून आले.

wrc-marathipizza06

 

६) एकीकडे तर ही रोबोटची लहानगी आर्मी पाहायला मिळाली, त्यांना चार्जिंगला लावण्यात आले होते, जणू ही त्यांच्या आरामाची वेळ होती.

wrc-marathipizza07

 

७) तर दुसरीकडे फुल चार्ज रोबोट्स चक्क डान्स करून लोकांचे मनोरंजन करत होते.

wrc-marathipizza08

 

८) पावसात देखिल सदा तत्पर….!

wrc-marathipizza10

 

९) खाली दिसतोय तो रोबोट सामन्य नाही. कोणत्याही प्री-प्रोग्रामिंग शिवाय तो माणसाच्या सूचना समजू शकतो.

wrc-marathipizza11

 

१०) पर्सनल असिस्टन्ट रोबोट्सच्या दुनियेत सध्या बोलबाला आहे पॅडबॉट टी2 चा! पूर्वीच्या पॅडबॉट रोबोटचे हे अपडेटेड व्हर्जन आहे.

wrc-marathipizza12

 

११) एक नवीन अंडरवॉटर ड्रोन कोणीतरी सादर केला होता, जो पाण्याखाली अगदी स्पष्ट शुटींग करू शकतो.

wrc-marathipizza13

 

१२) ड्रोन मॅन्यूफॅक्चर्सनी काही अशी मॉडेल्स बनवली आहेत जी स्कल कॅप्सच्या माध्यमातून नियंत्रित करता येतात.

wrc-marathipizza14

 

१३) रोबोट्सचा मेकअप…!

wrc-marathipizza15

 

काय? आहेत की नाही हे रोबोट्स म्हणजे विज्ञानाचा चमत्कार!!!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?