Site icon InMarathi

अभिमानास्पद….! फेसबुकची पहिली महिला इंजिनियर होती ही महाराष्ट्राची कन्या..!

ruchi-sanghavi-marathipizza00

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

फेसबुकबद्दल तुम्हाला काय नव्याने सांगायचे. आता तर आपला दिवस फेसबुकने सुरु होतो आणि फेसबुकनेच संपतो असे म्हटले तरी वावगे ठरू नये. लहानांपासून मोठ्यापर्यंत आज प्रत्येकजण फेसबुकवर सापडतो. कोणी कितीही म्हणो की, फेसबुक म्हणजे वेळेचा अपव्यय आहे वगैरे, पण या फेसबुकने आपल्या दैनंदिन जीवनात क्रांती घडवली आहे हे मात्र कोणीच नाकारू शकत नाही. तुम्हाला अश्या या उपयुक्त फेसबुकबद्दल सर्वच माहित असेल, नसेल माहित तर हा लेख नक्की वाचा.

नक्की फेसबुक आहे तरी किती मोठं: फेसबुकबद्दल काही गमतीशीर गोष्टी

telegraph.co.uk

जर तुम्हाला वाटतं की फेसबुकबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत, तर मंडळी थांबा जरा, कारण आम्हाला वाटतंय की तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहित नाहीत… असं काय विशेष माहित नाही म्हणून विचारताय? बरं सांगा मग फेसबुकची पहिली महिला इंजिनियर कोण होती? तिचं नाव काय? नाही माहित ना? एवढा विचार करू नका, चला जाणून घेऊया!

फेसबुकची पहिली महिला इंजिनियर होती एक भारतीय महिला आणि त्यापेक्षाही विशेष आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे ती होती महाराष्ट्राची सुपुत्री! तिचे नाव- “रुची सांघवी”…

pbs.twimg.com

रुची मूळची पुण्यातली! म्हणजे तिचा जन्मच तिथला. मुलीने शिक्षणानंतर आपला व्यवसाय सांभाळावा असं तिच्या वडिलांच्या मनात होतं, पण रुचीने मात्र वेगळा मार्ग निवडत Carnegie Mellon University मधून इलेक्ट्रिकल कम्प्यूटर इंजिनियरींगमध्ये थेट मास्टरकी मिळवली. तेथून कामाच्या आशेने ती जगप्रसिद्ध सिलिकॉन व्हॅलीमध्ये दाखल झाली. तंत्रज्ञान क्षेत्राची आवड असणाऱ्यांसाठी सिलिकॉन व्हॅली म्हणजे पवित्र ठिकाणच. आपला प्रियकर आदित्य अग्रवालच्या मदतीने रुचीने ऑरेकल कोर्पोरेशनमध्ये पहिली नोकरी मिळवली. पण तिच्या करियरला खरी कलाटणी तेव्हा मिळाली जेव्हा तिने २००५ साल फेसबुकमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिच्यासोबत तिचा प्रियकर आदित्य अग्रवाल देखील फेसबुकमध्ये रुजू झाला होता. रुची ही फेसबुकमधील पहिली महिला इंजिनीअर ठरली.

रुचीने ‘फेसबुक’ला यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. रुची ही ‘फेसबुक’च्या पहिल्या १० इंजिनिअर्समध्ये एकमेव महिला होती. फेसबुकमध्ये कार्यरत असताना रुचीने अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले.

indiasamvad.co.in

फेसबुकचे प्रसिद्ध फीचर ‘न्यूज फीड’ची आयडीया रुचीच्याच सुपिक डोक्यातून बाहेर आली होती. फेसबुक’चा संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि त्याचे सहकारी यूजर्सला साइटवर खिळवून ठेवण्यासाठी आयडिया शोधत होते. तेव्हा रुचीने एका न्यूज पेपरसारखी आयडिया दिली. रुचीची ‘न्यूज फीड’ची कल्पना मार्क झुकरबर्गला खूप आवडली. नंतर फेसबुकवर ‘न्यूज फीड’ अस्तित्वात आले. एकट्या या फीचर्सच्या माध्यमातून फेसबुकला दर तासाला ५० हजार नवे यूजर्स मिळाले.

२०१० साली मात्र काही कारणास्तव रुचीने ‘फेसबुक’चा राजीनामा दिला आणि पतीसोबत स्वत:ची ‘कोव्ह’ ही नवी कंपनी सुरु केली. मात्र फेब्रुवारी २०१२ मध्ये त्यांची ‘कोव्ह’ ही कंपनी प्रसिद्ध कम्प्युटर डाटा शेअरिंग कंपनी ‘ड्रॉपबॉक्स’ने खरेदी केली.

i.pinimg.com

त्यानंतर रुची ड्रॉपबॉक्स कंपनीसोबत काम करू लागली, त्यांनी तिला कंपनीच्या व्हाइस प्रेसिडेंट पदावर बसविले. ऑक्टोबर २०१३ मध्ये रुचीने व्हाइस प्रेसिडेंट पदाचा राजीनामा देत ड्रॉपबॉक्स सोबत केवळ सल्लागार म्हणून काम करण्याचे ठरवले.

आज रुची ‘सिलिकॉन व्हॅली स्टार’ म्हणून ओळखली जाते. फेसबुक आज जे काही आहे ते रुचीने दिलेल्या न्यूज फीडच्या संकल्पनेमुळे, नाहीतर फेसबुक आज तितके यशस्वी नसते असे म्हटले जाते.

code.org

म्हणजे रुची सांघवी नावाची ही भारतीय महिला फेसबुकच्या यशामागची खरी सूत्रधार आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version