Site icon InMarathi

हे बघून गणेश मंडळ आणि मंडळ कार्यकर्त्याबद्दल आपला दृष्टिकोनच बदलून जाईल…!

hrutik-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

गणेश उत्सव म्हणजे १० दिवसांसाठी बाप्पा आपल्या घरी येणार आपण पूर्ण मनोभावे बाप्पाची पूजा करणार आणि १०व्या दिवशी आपल्या लाडक्या गणेशाला निरोप देणार. पण हा गणेश उत्सव आता केवळ एक सण नसून तो ज्याच्या त्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे.

तुम्ही बरोबर समजलात…आम्ही बोलतोय मंडळांबद्दल…!

“सार्वजनिक गणपती” जिथे बसवला जातो, ज्यांच्या कडून बसवला जातो ती ही मंडळे.

खरं तर सार्वजनिक गणपती बसविण्यामागील हेतू काही वेगळा होता पण आज यालाच एक वेगळंच रूप प्राप्त झालं आहे.

आता सार्वजनिक गणेश उत्सव म्हणजे मोठं-मोठे मंडप आणि कोणाचा बाप्पा किती मोठा याची स्पर्धा, आरतीवेळी लाऊड स्पीकरचा तो आवाज, जबरदस्ती आकारण्यात येणारा कर म्हणजेच गणपतीची वर्गणी, गणपती मांडवात रात्रभर चालणारा जुगार आणि कॅरम!

आणि ह्या सर्वात आपली सभ्यता आणि संस्कृती विसरणारी तरुणाई…

 

youtube.com

गणपतीचे स्वागत करताना आणि त्याला निरोप देताना त्या डीजेवर वाजणारे ते घाणेरडे गाणे आणि त्यावर बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई हेच स्वरूप सध्या बघायला मिळत गणेश मंडळाचं.

त्यातही हे सर्व घडवून आणण्यासाठी हिरीरीने काम करतो तो म्हणजे मंडळाचा कार्यकर्ता.

पण म्हणून गणेशोत्सव अगदी निरुयोगी झाला आहे का..? समाजाला घातक आहे का…?

आजचा तरुण खरंच एवढा वाया गेलाय का, की त्याला १० दिवसांच्या मौज-मजेशिवाय काहीच दिसत नाही?

 

newtbit.com

आजची तरूणाई एवढी वाईट आहे का?

या प्रश्नाचं उत्तर घेऊन, ‘BaalkiDukaan’ हे फेसबुक पेज मागील वर्षी एक व्हिडीओ घेऊन आलं होतं.

हा व्हिडीओ बघून गणेश मंडळ आणि मंडळ कार्यकर्त्याबद्दल आपला दृष्टिकोनच बदलून जाईल…!

आवर्जून बघा – बघून शेअर करा…! कारण बाप्पाचा प्रसाद आपण असाच शेअर करत असतो…नाही का? 🙂

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version