Site icon InMarathi

हिऱ्याला पेपरवेट म्हणून वापरणा-या भारतातील या सर्वात श्रीमंत माणसाचा थाट पाहून थक्क व्हाल

osman-ali-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज जगात सर्वात जास्त किंमत आहे ती पैश्याची. कुणालाही बघा तो पैश्याच्या मागे पळतो आहे. जणूकाही पैसाच माणसाचा सर्वेसर्वा झालायं. त्यातच दरवर्षी त्या वर्षीच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी निघत असते.

त्यांच्या संपत्तीचा आकडा बघून चक्रावल्या सारखं होत. या लिस्टमध्ये जगातील धनाढ्यांसोबत काही भारतीयांचाही समावेश होते.

पण आज आम्ही आपल्याला एका अशा राजा राजाबद्दल सांगणार आहोत ज्याला आजही भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती समजलं जातं. तो म्हणजे उस्मान अली खान…!

 

alchetron.com

 

भारताच्या इतिहासातील सर्वात समृद्ध आणि श्रीमंत व्यक्ती म्हणून उस्मान अली खान यांची ओळख. यांच्या एवढा श्रीमंत व्यक्ती अजूनही भारतात नाही असं म्हणतात. एवढच काय तर यांनी पोर्तुगीजांकडून चक्क गोवा विकत घेण्याचाही प्रयत्न केला होता.

त्यांच्याकडे असणारे असणारे मोती आणि हिऱ्यांचे कलेक्शन एवढ मोठं होत की, त्यांनी ऑलिम्पिकच्या आकाराचे स्विमिंगपूल भरून जाईल.

उस्मान अली खान यांची संपत्ती अमेरिकेच्या १९४० सालच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या २% एवढी होती.

हा भारताचा सर्वात श्रीमंत माणूस हैद्राबादचा ७वा आणि शेवटचा निज़ाम होता.

उस्मान अली खान, असफ जाह VII यांचा जन्म ६ एप्रिल १८८६ मध्ये झाला. १९११-१९४८ या काळात त्यांनी हैद्राबादवर आपले स्थापत्य गाजवले, याच दरम्यान त्यांनी सर्वात जास्त संपत्ती देखील गोळा केली.

 

southreport.com

 

या श्रीमंत भारतीयाची दखल टाइम्स मॅगजीनने देखील घेतली आणि २२ फेब्रुवारी १९३७ साली त्यांना पृथ्वीतलावरील सर्वात श्रीमंत व्यक्ती  ‘Richest Man On Earth’ म्हणून जाहीर केले.

उस्मान अली खान यांचे दैनिक उत्पन्न जवळजवळ ५,००० डॉलर एवढे होते. त्याच्या दागदागिन्यांची एकूण किंमत १५०,०००,००० डॉलर इतकी होती. तर त्यांच्याकडे असलेल्या सोन्याची किंमत २५०,०००,००० डॉलर एवढी नमूद करण्यात आली होती. त्यांचं एकूण भांडवल हे १,४००,०००,००० डॉलर इतकं होत.

जाकोब हिऱ्याचा उस्मान अली खान पेपर वेट म्हणून वापर करत असे, ज्याची किंमत १०० मिलियन पाउंड्स एवढी होती.

निझामच्या राजवटीत त्यांच्या परिसरात त्यांचे स्वतःचे चलन ‘हैद्राबादी रुपया’ म्हणून चालायचे. त्यांची एकूण संपत्ती सुमारे २३० अब्ज डॉलर इतकी होती.

 

express.co.uk

 

उस्मान अली यांनी शिक्षण, विज्ञान आणि विकास यांसारख्या गोष्टींसाठी स्पॉन्सर केले असून त्यांनी वीज, रेल्वे, रस्ते आणि वायुमार्ग यांच्यामध्ये देखील आपले महत्वपूर्ण योगदान दिले होते.

त्यांच्या महालात ६००० कर्मचारी कामावर होते, त्यांच्यापैकी ३८ हे केवळ महालातील झुंबरची साफसफाई करण्यासाठी होते.

उस्मान अली यांना ३४ मूलं आणि १०४ नातवंड होती.

१९४८ साली भारत सरकारने निज़ाम यांचे राज्य आणि त्यांची संपत्ती जप्त केली. निज़ामाने लंडन येथील नॅटवेस्ट बँकेत १ मिलियन पाउंड ट्रान्स्फर केले जेणेकरून त्याच्या नातू मुकर्रम जाह याला त्याची संपत्ती मिळावी म्हणून.

पण दुर्दैवाने ब्रिटिश सरकारने त्याची सर्व रक्कम जप्त केली आणि मुकर्रम जाह हा संपूर्ण आयुष्य आपल्या संपत्ती पासून वंचित राहिला.

तर असे होते हे भारतातील सर्वात श्रीमंत उस्मान अली खान…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version