' ही नैसर्गिक किमया आवर्जून समजून घ्या : अंतराळातील पाऊस! – InMarathi

ही नैसर्गिक किमया आवर्जून समजून घ्या : अंतराळातील पाऊस!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले, मंगळ ग्रहावर रोव्हर नेला. अवकाशाचा अभ्यास करण्यासाठी हबल दुर्बीण सोडली. आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही एक प्रोब सध्या अवकाशात आहे.

अंतराळातल्या कितीतरी गूढ गोष्टी लोकांना माहीत होत आहेत, कित्येक अवघड कोडी उलगडत आहेत. अजून आपल्यासाठी कितीतरी अज्ञात गोष्टी, अज्ञात ग्रह, आकाश गंगा, ब्लॅक होल्स अवकाशात आहेत.

 

 

तिथपर्यंत माणसाची झेप अजून गेली नाही. पण तरीही माणूस अशा सगळ्या गोष्टींचा मागोवा घेत असतो आणि म्हणूनच अंतराळविज्ञान हा आता एक अभ्यासातील महत्त्वाचा विषय ठरतो आहे.

आजवर अंतराळ या विषयावर कित्येक चित्रपट देखील येऊन गेले, आणि त्यातून आपल्याला बऱ्याच नवीन गोष्टी माहीत झाल्या आणि शिकायला मिळालं!

ग्रॅविटि, इंटेरस्टेलार, अपोलो १३,  अशा कित्येक चित्रपटांच्या माध्यमातून आपण याविषयी काहीतरी नवीन माहिती मिळवली!

 

space movies inmarathi
decent times

 

सृष्टीतील अनेक रहस्य आपल्याला माहित नाहीत. त्यामुळे जेव्हा पूर्वी नं अनुभवलेलं काही आपण पहिल्यांदा अनुभवतो, ही mystery सुटे पर्यंत मानवी मन आणि मेंदू ते कोडं उलगडण्यात गढून जातात.

अशाच एका कोड्याबद्दल आज आपण विस्तृत पद्धतीने माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत!

अंतराळात पाऊस पडू शकतो का? हा प्रश्नचं मुळातचं विचित्र आहे. १०० टक्क्यांपैकी ९० टक्के लोकांचं म्हणणं असेल की, मस्करी करता काय रावं? अंतराळात थोडी ना पाउस पडणार आहे.

 

space inmarathi

 

जर तुमचा समज अजूनही असाच अबाधित असेल तर तो खोटा पडू शकतो, कारण अंतराळात देखील पाऊस पडतो हे एका संशोधनाने सिद्ध केलं आहे.

८०च्या दशकात नासाच्या व्हॉयेजर या अवकाशयानामार्फत टिपण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये शनीवर दोन ते तीन गडद रंगाचे पट्टे आढळून आले होते.

ते पट्टे पाहिल्यावर शनीच्या कडयांमधून त्या पट्टयांवर पाऊस पडत असावा, असा शास्त्रज्ञांचा अंदाज होता.

 

raining-on-saturn-marathipizza00
beatport.com

 

याच आधारे नासाच्या मदतीने इंग्लंडमधील लिसेस्टर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की, शनीग्रहाची कडी पावसाची निर्मिती करतात.

शनीच्या वातावरणात असलेल्या पाण्याच्या प्रभारित रेणूंचा या वर्षावात मोठा सहभाग असतो.

या पावसाचा शनीच्या वरच्या भागातील वातावरणामधील तापमानाच्या स्वरूपावर आणि तेथील घटकांच्या मिश्रणावर फार मोठा परिणाम होतो.

ग्रहावरील कडयांची रचना आणि त्याचे वातावरण यांच्यात काही विशेष संबंध असल्याचे दाखवणारा शनी हा अंतराळातील पहिला ग्रह आहे.

 

shani grah inmarathi
angwaal news

 

पृथ्वी आणि गुरू या दोन्ही ग्रहांना विषुववृत्तीय प्रदेश असल्याने या दोन्ही ग्रहांचे भाग नियमित तेजाने तळपत असतात. हाच प्रकार शनीवर असण्याची शास्त्रज्ञांची अपेक्षा होती.

मात्र, शनीच्या काही भागांत विचित्र परिणाम दिसून आला.

शनीच्या भोवताली असणाऱ्या कडयांच्या पावसाचा मुख्य परिणाम असा होतो की शनी ग्रहावर ज्या भागात पाऊस पडतो त्या भागातील इलेक्ट्रॉनकणांची घनता मोठया प्रमाणावर कमी होते.

 

raining-on-saturn-marathipizza01
sciencing.com

 

शनीच्या ज्या भागात प्रभारित कणांची निर्मिती होते त्याच भागात कडयांचा पाऊस दिसून येतो. इतर वेळी प्रभारहीन अर्थात न्यूट्रल असलेल्या वातावरणावर सौर किरणोत्सार किंवा प्रभारित कणांचा सातत्याने मारा होत असतो.

गुरू या ग्रहाचा विषुववृत्तीय प्रदेश तेजस्वी असताना शनी या ग्रहावर मात्र गडद पट्टे आहेत. याच भागात पावसाचे पाणी पडत असल्याने हे गडद पट्टे तयार झाल्याचं स्पष्टीकरण शास्त्रज्ञ देतात.

 

rain in space inmarathi
AllMacwallpaper

 

या कडयांचा परिणाम अतिशय महत्त्वाचा असल्याचं संशोधकांचं मत आहे, कारण अनेक दशकांपासून केलेल्या अभ्यासांमधून हे दिसून आलं आहे की,

शनीच्या पृष्ठभागावर विशिष्ट अक्षांशांवर आयनांचं प्रमाण भरपूर कमी आहे.

असं का याचं उत्तर पावसाच्या परिणामातून मिळालं आहे. त्याचबरोबर या संशोधनामुळे शनीच्या कडयांचे मूळ आणि त्यांची निर्मितीप्रक्रिया जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांना फायदा होणार आहे.

raining-on-saturn-marathipizza02
spaceweatherwayoutthere.blogspot.in

 

अधिक माहितीसाठी sciencing.com चा अभ्यासपूर्ण लेख नक्की वाचा!

आपलं विश्व हे अजब-गजब घटनांनी अगदी गच्च भरलेलं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं!

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?