' होय! इंटरनेटशिवाय मोबाईल बँकिंग सेवा वापरता येते. कसे काय? वाचा… – InMarathi

होय! इंटरनेटशिवाय मोबाईल बँकिंग सेवा वापरता येते. कसे काय? वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे कॅशलेस युगाची! कॅशलेस म्हणजे काय तर ज्यात रोख पैशांचा वापर न होता सामान्यत: इंटरनेटच्या माध्यमातून सगळे व्यवहार ऑनलाईन केले जातात. हे कार्य स्मार्टफोन किंवा संगणकाच्या माध्यमातून पार पाडले जाते.

पण भारतीय लोकसंख्येमधील बहुतांश घटक हा कमी शिकलेला किंवा अशिक्षित आहे. त्यांना या डिजिटल युगामध्ये जुळवून घेणे म्हणावे तेवढे सोपे नाही. अनेक जणांना संगणकाविषयी देखील शून्य माहिती आहे आणि सोबतच त्यांना स्मार्टफोन वापरताही येत नाही.

लोकसंख्येचा हा घटक अजूनही साधा मोबाईल फोनचाच वापर करतो ज्यांमध्ये इंटरनेट प्रकरण नाही. मग अश्यांना कॅशलेस व्यवहारांची सवय कशी लावायची हा यक्ष प्रश्न होता. त्यांना हीच सवय लावण्याच्या दिशेने उचलले पहिले पाउल म्हणजे स्मार्टफोन आणि इंटरनेटविना मोबाईल बँकिंगचा वापर होय. हो हे शक्य आहे.

तुमच्याकडे स्मार्टफोन, संगणक किंवा इंटरनेट नाही किंवा तुमच्याकडे स्मार्टफोन आहे पण इंटरनेट वापरता येत नाही, तर हा रामबाण तोडगा तुमची ही समस्या मिटवू शकतो आणि तुम्ही देखील इंटरनेटविना मोबाईल बँकिंगचा वापर करु शकता. चला जाणून घेऊया हे कसं शक्य आहे..!

हा रामबाण तोडगा आहे यूएसएसडीचा !

ussd-marathipizza01
capitecbank.co.za

 

यूएसएसडी (USSD) सेवेच्या माध्यमातून इंटरनेटविना मोबाईल बँकिंग वापरता येते. आता हे यूएसएसडी म्हणजे काय? तर यूएसएसडी म्हणजे- ‘अनस्ट्रक्चर्ड सप्लीमेंटरी सर्व्हिस डेटा’

ज्यांच्याकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट नाही, केवळ बेसिक फिचर असणारा साधा मोबाईल आहे किंवा स्मार्टफोन असून ज्यांना इंटरनेट वापरता येत नाही त्यांच्यासाठी ही सेवा म्हणजे वरदान ठरत आहे. मुख्य म्हणजे इंग्रजी येत नसेल तरी काळजी करण्याचं कारण नाही कारण जवळपास ११ प्रादेशिक भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. यूएसएसडीच्या माध्यमातून मराठी भाषेमध्ये देखील व्यवहार करता येतो.

मराठीमध्ये वापर करण्यासाठी मोबाईलमध्ये *99*28# हा कोड टाईप करावा, तर हिंदीमध्ये वापर करण्यासाठी *99*22#, आणि इंग्रजीमध्ये वापर करण्यासाठी *99# हा कोड टाईप करावा.

यूएसएसडी सेवा जरी २४ तास उपलब्ध असली तरी तिच्या वापराच्या काही मर्यादा आहेत. यामध्ये एक रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार एकाच वेळेस करता येतात आणि यासाठी प्रत्येक व्यवहाराला ५० पैसे इतका चार्ज लागतो.

 

ussd-marathipizza02
brandspurng.com

 

यूएसएसडी सेवा मोबाईलवर सुरु कशी करावी?

सर्वप्रथम ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्या बँकेत जाऊन तुमचा मोबाईल नंबर खात्याशी कनेक्ट आहे की नाही याची खात्री करून घ्या. नसेल तर बँकेकडून मोबाईल बँकिंग सुरु करण्यासाठीचा एक फॉर्म घेऊन तो भरून सबमिट करा. त्यानंतर एमएमआयडी (MMID) म्हणजेच मोबाईल मनी आयडेंटीफायर हा सात अंकी क्रमांक जनरेट केला जातो.

मोबाईल बँकिंग सुरु केल्यानंतर बँक हा क्रमांक मोबाईलवर मेसेजद्वारे पाठवते. त्यानंतर बँकेकडून तुम्हाला एक एमपीन (MPIN) प्रदान केला जातो.

यूएसएसडी कोड वापरण्याची पद्धत

यूएसएसडी सेवा वापरण्यासाठी बँकेशी कनेक्ट असलेल्या मोबाईल नंबरवरून तुम्हाला ज्या भाषेमध्ये व्यवहार करायचा आहे त्या भाषेचा कोड टाईप करावा लागेल.

उदाहरणार्थ मराठी भाषेमध्ये व्यवहार करायचा झाल्यास डायल पॅडमध्ये *99*28# हा कोड टाईप करावा. त्यातून तुमची बँक निवडा. बँक निवडताना बँकेच्या नावाची तीन अक्षरे टाकावीत. स्टेट बँक ऑफ इंडिया साठी SBI, स्टेट बँक ऑफ हैदराबादसाठी SBH, एचडीफसी बँकसाठी HDF, आयसीआयसीआय बँकसाठी ICI टाईप करावे.

एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जी भाषा निवडली आहे त्याच भाषेमध्ये तुम्हाला ही तीन अक्षरे टाईप करायची आहेत. बँक निवडल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर व्यवहाराशी संबधित काही महत्त्वाचे पर्याय दिसतील. उदा. बँक बॅलेन्स तपासणे, पैसे ट्रान्सफर करणे, पिन बदलणे वगैरे !

ussd-marathipizza03
kadvacorp.com

 

यूएसएसडी सेवेच्या माध्यमातून पैसे कसे ट्रान्सफर करावे?

स्क्रीनवर तुम्हाला विविध पर्याय दिसले की, त्यातून पैसे ट्रान्सफर करण्याचा पर्याय निवडा. त्यानंतर बेनिफिशियरी मोबाईल नंबरचा पर्याय दिसेल. त्यामध्ये तुम्ही ज्यांना पैसे पाठवणार आहात, त्यांचा मोबाईल क्रमांक टाईप करा. मोबाईल क्रमांक टाईफ केल्यावर तुम्ही ज्यांना पैसे पाठवणार आहात, त्यांचा एमएमआयडी क्रमांक तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. हा क्रमांक दोन-तीन वेळा तपासून नंतरच टाईप करावा. त्यानंतर रक्कम टाकावी. एका वेळी केवळ ५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम पाठवता येते.

ही सर्व प्रक्रिया न चुकता पूर्ण केल्यावर शेवटी तुम्हाला बँकेमार्फत देण्यात आलेला चार अंकी एमपीन टाकावा. स्पेस देऊन त्यासोबत तुमच्या खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक देखील टाईप करावेत. बस्सं! एवढं नीट केलंत तर तुमचे पैसे लगेच ट्रान्सफर होतील.

काही महत्त्वाच्या सूचना:

यूएसएसडी सेवेच्या माध्यमातून व्यवहार करताना तुमच्या भाषेचा क्रमांक टाईप केल्यानंतर व्यवहाराचे पर्याय स्क्रीनवर दिसण्यासाठी किमान १० सेकंदांचा एवढी लागतो. जर नेटवर्क नीट नसेल तर नेटवर्क एररचा मेसेज दाखवतो. असा एरर आला की व्यवहार प्रक्रिया तिथल्या तिथे रद्द होते आणि पुन्हा तुम्हाला सर्व प्रक्रिया पहिल्यापासून सुरु करावी लागते.

 

ussd-marathipizza04
iheadlines.in

 

या काही मर्यादा सोडल्या तर खेड्यापाड्यात राहणाऱ्या आणि जास्त न शिकलेल्या आपल्या भारताच्या नागरिकाला ही सेवा त्यांना डिजिटल युगाची ओळख करून देण्यास उत्तम आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?