Site icon InMarathi

इरफान ने ३ leaders ना twitter वरून भेटण्याची विनंती केली: तिघांचे replies त्यांच्यातील फरक दाखवतात

irfan modi kejriwal gandhi marathipizza

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

====

पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी – हे तिघेही नुकतेच एका समान परीक्षेतून गेले.

अर्थात – ही काही निवडणूक किंवा एखाद्या महत्वाच्या विषयावर त्यांचं मत…अशी गंभीर परीक्षा नव्हती.

प्रकरण जरा वेगळं आहे. 😀

झालंय असं, की अभिनेता इरफान खान मोदी, केजरीवाल आणि गांधी ह्यांना भेटण्यास इच्छुक आहे. In all probabilities, त्याच्या Madari चित्रपटाच्या संदर्भात इरफानला ह्या तिघांची भेट घ्यायचीहोती.

त्याने ट्विटरवरून तशी सरळ विनंती केली – तिघांनाही…!

सर्वप्रथम पं.प्र. मोदींना…

 

मग अरविंद केजरीवालांना

 

आणि लगेचच, राहुल गांधींना…

ह्या tweets अगदी काही सेकंदांच्या फरकाने केल्या गेल्या आहेत.

===

अरविंद केज्रीवालांचा reply सर्व प्रथम आला :

 

त्यावर इरफानने त्याच्या दिल्ली भेटीचा दिवस सांगितला आणि केजरीवालांनी त्यांच्या ११ वाजता, त्यांच्या ऑफिसला येण्यास सांगितलं :

===

दुसरा reply होता गांधींचा…गांधींनी इरफानला नंबर मेसेज करायला सांगितला :

===

आणि सर्वात शेवटी मोदींच्या ट्विटरवरून उत्तर आलं ! 😀

 

पंतप्रधान आगामी संसद अधिवेशनाच्या तयारीत गुंतले आहेत. कृपया (कामाबद्दलची माहिती देऊन भेटण्याची विनंती करणारं) पत्र पाठवा.

😀 😀 😀

=====

तर मित्रांनो…काय कळालं?! 😀

किमान ह्या संभाषणावरून निघालेले निष्कर्ष असे आहेत :

१ – राहुल गांधी त्वरित निर्णय घेत नाहीत (अजूनही संथ कारभार आहे म्हणायचा कॉंग्रेसचा!) !

२ – अरविंद केजरीवाल ट्विटरवर चांगलेच active आहेत (हे आपल्याला माहिती आहेच, नाही का?!) आणि त्यांना आवश्यक वाटणाऱ्या tweets ना ते लगेच प्रतिसाद देतात. तसंच – त्यांची इच्छा असेल तर ते तुम्हाला सहज भेटूही शकतात.

३ – आपले पंतप्रधान त्यांच्या पदाचं गांभीर्य ओळखून आहेत. आणि हो – ते “काम करत असतात” असं दिसतंय ! 🙂

 

जर विचार केला तर लक्षात येईल की ह्या तिन्ही लीडर्सची बहुतांश भारतीयांच्या मनात जी प्रतिमा आहे, अगदी त्यानुसारच हे तिघेही वागले आहेत…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Exit mobile version