' रात्री १० वाजता मोदींचा IAS अधिकाऱ्याला फोन? खरं की खोटं?! सत्य हैराण झालंय – InMarathi

रात्री १० वाजता मोदींचा IAS अधिकाऱ्याला फोन? खरं की खोटं?! सत्य हैराण झालंय

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

ही गोष्ट तशी जुनी आहे, पण प्रत्येक भारतीयाला माहित असायलाच हवी अशी देखील आहे.

प्रकरणाची सुरुवात होते एका लेखावरून. “क्वोरा”वर पुष्पक चक्रवर्ती नामक तरुणाने एक प्रसंग शेअर केला होता. लेखात, नरेंद्र मोदींच्या एका आश्चरकार्यक कृतीचं वर्णन होतं.

तर प्रसंग असा :

गेल्या वर्षीच्या जुलै मधील पावसाळ्यात त्रिपुरामधील NH208A हा महामार्ग अतिवृष्टीमुळे खचला. त्रिपुरासाठी हा महामार्ग अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हाच महामार्ग त्रिपुराला भारतातील इतर महत्त्वाच्या शहरांशी जोडतो. त्यामुळे हा महामार्ग बंद म्हणजे त्रिपुराचा उर्वरित भारताशी संबध तुटण्यासारखंच होतं. महामार्ग खचल्यामुळे अतिशय धीम्या गतीने वाहतूक सुरु होती, हळूहळू तर वाहतूकच ठप्प झाली. परिणामी गरजेच्या वस्तू जसे की डीझेल, पेट्रोल, एलपीजी, अन्यधान्य यांचा पुरवठा बंद झाला.

संपूर्ण त्रिपुरा भल्यामोठ्या संकटात सापडलं होतं. अश्यावेळी बातमी समजताच आपली जबाबदारी ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे सरसावले, त्यांनी कश्याप्रकारे स्वत: जातीने लक्ष घालून त्रिपुरा हायवे ६ दिवसांमध्ये युद्धपातळीवर काम करवून घेऊन पूर्ववत केला – असं पुष्पक ने लिहिलं आहे.

 

narendra-modi-marathipizza01
indianexpress.com

पुष्पक चक्रवर्ती म्हणतो,

त्रिपुराचे एक आयएएस ऑफिसर आहेत. नुकतीच त्यांची बदली झाली आहे आणि ते माझ्या वडिलांचे खास मित्र आहेत. झालं असं की २१ जुलै २०१६ च्या रात्री १० वाजता त्यांना एक फोन आला. एवढ्या रात्री फोन आल्याने ते जरा चक्रावलेच. त्यांनी फोन उचलला. पलीकडून एका तरुणाचा सौम्य आवाज आला. त्याने एवढ्या उशिरा फोन केल्याबद्द्दल त्यांची माफी मागितली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्याशी महत्त्त्वाचे बोलायचे आहे असे कळवले.

एका आयएएस ऑफिसरला खुद्द पंतप्रधान स्वत: फोन का करतील या विचाराने क्षणभर त्यांच डोकंच चालेना. कसंबसं स्वत:ला सावरत त्यांनी बोलण्यास होकार दिला. पलीकडून काही बिप्स ऐकू आल्या, कॉल पंतप्रधान मोदींकडे ट्रान्स्फर झाला आणि पुढील काही सेकंदातच मोदिजी फोनवर होते.

एवढ्या रात्री फोन केल्याबद्दल नरेंद्र मोदींनी देखील त्यांची माफी मागितली आणि म्हटले की, “मी आताच नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा केली आहे आणि त्रिपुराला भारताशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 208A च्या दुरुस्तीसाठी मला तुमची मदत हवी आहे.”

मोदींनी पुढे सांगितले की, “मी स्वत: आसाम आणि त्रिपुरा सरकारशी चर्चा केली आहे आणि या दुरुस्ती प्रकल्पा संदर्भात तुम्हाला हवी ती मदत केली जाईल”. जो व्यक्ती देश सांभाळतो तो व्यक्ती आपल्याकडून मदत मागतो ही गोष्ट कोणत्याही आयएएस ऑफिसरसाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. त्यांचा झालेल्या प्रसंगावर विश्वास बसत नव्हता. क्षणभर त्यांना वाटले कोणी आपली मस्करी तर करत नसले ना. उद्या काय होते असा विचार करून त्या रात्री त्यांना झोप लागली नाही.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पोचल्यावर त्रिपुरा आणि आसाम सरकारने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना दोन्ही सरकारकडून १५ किमीचा रस्ता दुरुस्ती करण्याबाबत निधी पाठवण्यात आला. त्यांनी त्वरित आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळ गाठले आणि त्यांनी पाहिले की, तेथे आसाम सरकारने आधीच ६ जेसीबीची सोय करून ठेवली होती.

पुढील ४ दिवस युद्धपातळीवर काम सुरु होते, लवकरात लवकर आवश्यक काम पूर्ण करून त्यांनी जनसामन्यांसाठी गरजेच्या वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना रास्ता मोकळा करून दिला. काम पूर्ण झाल्यावर नितीन गडकरी यांनी स्वत: फोन करून त्यांचे धन्यवाद मानले आणि दिल्लीमध्ये आल्यावर पंतप्रधान कार्यालयाला भेट देण्याचे निमंत्रणही दिले.

असा आहे माझा भारत, जिथे अश्या आदर्श आणि प्रशंसनीय कहाण्या घडतात आणि ज्याचा मला सार्थ अभिमान आहे. ही घटना दर्शवते की, विद्यमान केंद्र सरकारला आपल्या जनतेची किती काळजी आहे. रात्रीच्या वेळी देखील संकट दूर करण्यासाठी ते कसे तत्पर असतात आणि अश्या असंख्य कहाण्या देशभर घडत असतील याबाबत मला खात्री आहे. फक्त त्या सामान्य लोकांना माहित नाहीत.

 

narendra-modi-marathipizza02
ndtv.com

पुष्पकचा मूळ लेख इथे वाचू शकता.

पण – पुढे मात्र काहीतरी वेगळंच घडलं.

ह्या घटनेला नाट्यमय वळण मिळालं. क्वोरावर ह्या लेखकावर “भाजप आयटी सेल चा” असल्याचा आरोप लावल्या गेला आणि ही कथा खोटी असल्याचं म्हटल्या गेलं. ह्यावरून बरंच मोठं वादळ (सोशल मीडियावर!) उभं राहीलं.

नंतर खुद्द पुष्पक ने स्वतःवरील “भाजप आयटी सेल” आरोप आणि सदर प्रकरण ह्यावरच स्पष्ट भाष्य केलं.

पुष्पक म्हणतो :

मी माझ्या पोस्टमध्ये सदर अधिकाऱ्याचं नाव सांगितलं नाही कारण अशी संभाषणं खुली करणं योग्य नाही. खुद्द अधिकाऱ्यांना हे उघड करण्याची अनुमती नसते. पण माझ्या माहितीनुसार हे प्रकरण संपूर्णपणे खरं आहे आणि विविध स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध सुद्धा केलं आहे.

पुष्पक ने पुढे ह्या बातम्यांच्या स्क्रोनशॉट्ससुद्धा दिल्यात.

 

 

 

 

pushpak chakraborty modi bengali news inmarathi 02

 

 

pushpak chakraborty modi bengali news inmarathi 03

 

स्वतःवरील आरोपांबद्दल पुष्पक म्हणतो

 

pushpak chakraborty modi bengali news bjp it cell inmarathi

म्हणजेच –

मला भाजप आयटी सेलकडून पैसे मिळत नाहीत. मी फक्त महिन्यातून काही लेख लिहून देतो. ही घटना लिहिण्यासाठी, पसरवण्यासाठी मला कुणीही पैसे दिलेले नाहीत. ही घटना सत्य आहे आणि मी त्याची पूर्ण जबाबदारी घेतो.

 

आणि ह्यापुढे – एबीपी न्यूजने देखील या संदर्भात कव्हर केलेल्या बातमीच्या संपूर्ण रिपोर्टची ही लिंक पुष्पक ने दिली आहे. पण आता त्या लिंक वर काहीही दिसत नाही. दिसलंच तर एरर दिसतोय!

 

pushpak chakraborty modi abp 400 error inmarathi

काय समजावं कळत नाही!

ह्या अश्या घटनांनंतर एकूणच कशावर विश्वास ठेवावा अन कशावर नाही हे कळणं अधिकाधिक अवघड होत जात आहे.

आपण सर्वांनी सतत जागरूक रहायला हवं!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?