Site icon InMarathi

मेंदुपासून हृदयापर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असलेल्या या फळाकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका

pomegranate im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक -डॉ प्राजक्ता जोशी

हे पण वाचा – भारतीय संस्कृतीमधील फलाहाराचे महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग ५

===

फळांच्या पोषणमुल्यांचा व औषधीय उपयोगाचा एक ढोबळ आढावा आपण मागील लेखामध्ये घेतला. आज “डाळिंब” (pomogranate) या बद्दल जाणून घेऊया.

 

wpengine.netdna-cdn.com

 

पोषणमुल्ये/100gm

 

आधुनिक शास्त्राचा विचार करता डाळिंब हे खूप उपयुक्त फळ आहे…

1) डाळींबामध्ये antioxidents चे प्रमाण खुप अधिक असते. red wine व green tea पेक्षा 3 पट अधिक प्रमाणात antioxidents हे डाळिंबात असतात.

2) यातील punicalagin नावाचे antioxident अत्यंत महत्वाचे असुन त्यामुळे धमणीकाठीण्य (atherosclerosis), Hypertention या व्याधींमध्ये ऊपयुक्त ठरते.

3) यात Punic acid नावाचे fatty acid सापडते. जे conjugated linolic acid प्रकारात मोडते.

famina.in

 

4) हे शरीराचे lean body mass (चरबीविरहीत वजन) वाढवण्यास मदत करते. अशा रीतीने fitness वाढवण्यास तसेच wt management program मध्ये ऊपयुक्त ठरते.

5) यातिल antioxidents मुळे पचनसंस्थेतील विकार, स्तन, आंत्र याचे कर्करोग यात उपयुक्त ठरते. यातील anti inflamatory गुणामुळे संधीवातामध्ये ऊपयुक्त ठरते.

 

squarespace.com

 

Phenotol हा डाळींबातील घटक निसर्गोपचार पद्धतीत स्मृतीवर्धक मानला जातो. त्यामुळे Alzheimer (स्मृतिभ्रंश ) मध्ये ऊपयुक्त ठरते.

आयुर्वेदीक ऊपयोग….

आयुर्वेदानुसार, “डाळिंब”चे गुणधर्म आपण बघुया.

1) आंबट डाळिंब हे पित्तवर्धक असते.

खुप गोड डाळिंब हे कफ विकार वाढवणारे असते.

2) त्यामुळे आंबटगोड स्वाद असणारे डाळिंबच शरीरास हीतकर असते. डाळिंब स्निग्ध व ऊष्ण गुणांनी युक्त असते.

3) हृदयासाठी डाळिंब उत्तम सांगितले आहे.

4) खोकला, अतिसार (diarrhoea) यामध्ये उपयुक्त ठरते.

5) संतर्पन (rehydration) हा गुणधर्म असल्याने ज्वर, अतिसार ई. व्याधीमुळे होणारे dehydration लवकर भरून काढते.

6) मलाच्या निर्मीतीस मदत करते. त्यामुळे बद्धकोष्ठता, मुळव्याध व ईतर गुदद्वाराच्या व्याधी यात सहज मलविसर्जनास मदत करून ऊपयुक्त ठरते.

 

healthynibblesandbits.com

 

7) आयुर्वेदानेही डाळिंब मेधा(बुद्धी) वर्धक सांगितले आहे.

8) तसेच बल्य हा गुणधर्म सांगितला आहे. त्यामुळे कृश व्यक्तीत वजन वाढवण्यास ऊपयुक्त ठरते.

9) शुक्रजनक हा गुणधर्म सांगितला आहे. त्यामुळे Male infertility (azoospermia, oligospermia) च्या रुग्णांनी आहारात डाळींबाचा अवश्य समावेश करावा.

10) बल्य व स्मृतीवर्धक असल्याने लहान मुलांनी डाळिंब अवश्य खावे.

11) दाडीमावलेह हा आयुर्वेदीक कल्प अतिसारामध्ये ऊपयुक्त ठरतो.

12) दाडीमाष्टक चुर्ण पचनासंबंधीत व्याधीमध्ये ऊपयुक्त ठरते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version