Site icon InMarathi

हे ७ उपाय करून बघाच; तुम्हाला पेनकिलर्सची गरजच पडणार नाही!

medicines taking inmarathi 2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

औषध म्हटलं की बऱ्याच जणांची नाकं मुरडतात, कारण औषध कुणालाच आवडत नाही किंवा औषध ही कुणीच हौस म्हणून घेत नाहीत!

वेदनेवर उपाय काय तर औषध घेणे. म्हणूनच कोणत्याही शारीरिक वेदनेने तोंड वर काढले की गोळ्या घेतो, इंजेक्शन घेतो. पण बऱ्याचदा होतं काय वेदना तात्पुरत्या थांबतात, औषधाचा प्रभाव संपला की पुन्हा औषध घ्यावं लागतं.

अश्याने जर वेदना दीर्घकाळ असतील तर कोणीही माणूस असो तो औषधाला कंटाळतो.

 

जर तुम्हीही खूप काळासाठी वेदनाशमक औषधे घेत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण अति औषधांचे सेवन हानिकारक ठरू शकते. तर मग आता या गोष्टीला पर्याय काय हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल.

तर मंडळी आज याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देत आहोत. खाली सांगितलेल्या गोष्टी केल्याने तुमची वेदना औषधाशिवाय नियंत्रित करता येऊ शकते.

विश्वास बसत नाहीये? चला जाणून घेऊया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा निरोगी राहण्यासाठी जर रोज व्हिटॅमिनच्या गोळ्या खात असाल तर थांबा, आधी ‘हे’ वाचा

===

वेदनेकडे दुर्लक्ष करावे

 

काही लोकांची दुखणी ही शारीरिक असतात आणि काही लोकांची मानसिक असतात. आणि सर्वसाधारणपणे ज्यांना मानसिक दुखणी असतात त्याकडे तर दुर्लक्ष केलेलं उत्तम कारण त्यात समोरच्या व्यक्तीला काहीच हॉट नसतं, ती केवळ त्या व्यक्तीच्या मनातली एक भीती असते!

वेक फॉरेस्ट विद्यापीठातर्फे वेदनाग्रस्त लोकांवर संशोधन करण्यात आले. हे करताना या लोकांना दोन समूहांमध्ये विभागण्यात आले. एका समूहातील लोकांच्या पायांना १२२ डिग्री फॅरेनहाइट उष्णता देण्यात आली.

यामुळे त्यांच्या पायातील वेदना २८ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे दिसून आले. एमआरआय अहवालाच्या आधारे त्यास दुजोरा देण्यात आला. संशोधन प्रमुख डॉ. रॉबर्ट सी. कॉगहिल म्हणाले की,

वेदनेकडे जास्त लक्ष देऊ नये. त्यामुळे जास्त वेदना होतात.

हिरवे सफरचंद उपयोगी

 

शिकागो येथील स्मेल अँण्ड टेस्ट ट्रीटमेंट अँण्ड रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, डोकेदुखीचा त्रास होत असल्यास सफरचंदाचा वास घ्यावा किंवा सुगंधीयुक्त मेणबत्ती पेटवावी.

अशा प्रकारे डोकेदुखी किंवा अर्धशिशीची तक्रार कमी करता येते. तज्ज्ञांच्या मते, सफरचंदाच्या गंधाने डोके व मानेचे स्नायू सैल होतात. यामुळे डोकेदुखीचा त्रासही दूर होतो.

मनात राग दाबू नये

 

माणसाने व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. राग, प्रेम, काळजी, उत्सुकता अशा कित्येक भावनांमधून माणसाने व्यक्त व्हायला पाहिजे आणि जर का तसे होत नसेल तर ते फार चुकीचे आहे, कारण कोणतीही गोष्ट मनात धरून ठेवल्याने ती आणखीन चिघळते जसं राग!

जे लोकं मनात राग दाबून ठेवतात किंवा उघडपणे, बोलत नाहीत, त्यांना अधिक वेदनेची जाणीव होते. इंग्लंडच्या संशोधकांचे असे म्हणणे आहे की, अशा पद्धतीने वेदनेतून ३५ टक्के आराम मिळू शकतो. राग काढून टाकल्याने शरीरात असे अनेक हार्मोन सक्रिय होतात, जे वेदना कमी करण्यात फायद्याचे ठरतात.

===

हे ही वाचा औषधांच्या पॅकेट्सवर रिकामी जागा सोडण्यामागे ही आहेत वेगळीच कारणं!

===

दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडा

 

ज्या लोकांना खोलवर श्वास घेऊन मंदगतीने सोडण्याची सवय असते, अशा लोकांना वेदना कमी होतात, असे एका संशोधनातून असे पुढे आले आहे. अशा प्रकारे वेदना सहन करण्याची ताकद वाढते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गरोदर महिलांसाठीसुद्धा ही पद्धत फायदेशीर ठरत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. गर्भधारणेच्या वेळी जर महिलांनी या पद्धतीचा अवलंब केला तर त्यांना वेदना कमी होतील.

मित्रांची मदत घ्यावी

 

पाठ किंवा कमरेत वेदना होत असल्यास जवळच्या मित्रांची मदत घेऊ शकता. एका स्पॅनिश संशोधनातून असे समोर आले आहे की, वेदनाग्रस्ताने जवळच्या मित्रांची मदत घेतल्यास वेदना कमी होतात. मित्रांकडून मिळणार्‍या स्नेह आणि देखभालीमुळे त्याला लवकर आराम मिळू शकतो.

ध्यानधारणा करावी

 

रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटे ध्यानधारणा करणे आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरते. तज्ज्ञांच्या मते, ध्यानधारणेमुळे मेंदूच्या कॉरटेक्स नावाच्या भागाला फायदा होतो.

हा भाग वेदनेविषयी अधिक संवेदनशील असतो. कॅनडात झालेल्या एका संशोधनानुसार, नियमितपणे ध्यानधारणा केल्याने व्यक्ती मानसिकरीत्या शांत व स्थिर राहतो. यामुळे त्याची वेदना सहन करण्याची ताकदही वाढते.

आवडत्या व्यक्तीचे छायाचित्र पाहावे

 

एका संशोधनानुसार, वेदना झाल्यास ज्यांच्यावर तुम्ही जास्त प्रेम करता अशा एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र पाहावे. उदा. पती किंवा मुले. संशोधनादरम्यान करण्यात आलेल्या प्रयोगशाळेतील चाचणीत वेदनाग्रस्त असलेल्या महिलांनी आपल्या सहकार्‍याचे छायाचित्र बघितले होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा एकाच वेळी वेगवेगळी औषधं घेणं धोकादायक असू शकतं – वाचा तज्ञांचे मत!

===

अशा महिलांच्या वेदनेच्या तक्रारी कमी झाल्या होत्या. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, मॅमोग्राफ तपासणी करण्यापूर्वी मोबाइलमध्ये असलेले सहकार्‍याचे छायाचित्र पाहिल्यास वेदना कमी होतात.

तर मग औषधाविना वेदनांपासून मुक्ती मिळवायची असेल तर हे उपाय नक्की ट्राय करा!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version