Site icon InMarathi

DRDO आश्चर्यचकित: IIT मद्रासच्या विद्यार्थ्याने बनवलाय “underwater” रोबोट!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

IIT मधली मुलं मुली त्यांच्या बुद्धीमत्तेसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या नातेवाईकांमधील कुणी (किंवा कुणाचा मुलगा-मुलगी !) IIT मधे शिकत असेल तर तो एक चर्चेचा विषय असतो.

पण सध्या एक IITian देशाच्या सर्वोच्च सुरक्षा संशोधन संस्थेसाठी कौतुकाचा विषय बनला आहे. DRDO सारख्या संस्थेतील शास्त्रज्ञांना गुंग करून टाकलंय संतोष रविचंद्रन ह्या IIT Madras, MS, द्वितीय वर्ष (मशीन डिझाईन) च्या विद्यार्थ्याने.

कारण आहे – त्याने बनवलेला अंडरवॉटर – म्हणजेच, पाण्याखालून पोहणारा – रोबोट.

 

कासवाच्या आकाराचा असा रोबोट पहिल्यांदाच बनवला गेलाय.

संतोषने ह्या रोबोटचं नाव “दुली” ठेवलंय.

दुली हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे – कासव!

संतोष रविचंद्रन

आणखी मोठं आश्चर्य म्हणजे, संतोषने हा ‘दुली’ फक्त ३ महिन्यांत बनवलाय.

प्रोफेसर प्रभू राजगोपाल ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या ह्या रोबोटमधील काही खास फीचर्स असे आहेत :

बायो-इन्स्पायर्ड प्रोपेलर — डॉल्फिन्सला असतात तसे !

युनिक हायड्रो डायनामिक्स

उत्तम उर्जा कार्यक्षमता — कमी उर्जेवर जास्त वेळ कार्यरत राहण्यासाठी उपयुक्त

Camouflage म्हणजेच – स्वतःला लपवण्याची क्षमता !

ह्या शेवटच्या फिचरमुळे DRDO आणि संपूर्ण नेव्ही ऑपरेशन्ससाठीच ‘दुली’ खूप उपयुक्त ठरू शकतो.

 

‘दुली’ ची चाचणी स्विमिंगपूलमधे करत असताना संतोषला “सेल्फी” काढण्याचा मोह आवरला नाही 😀 –

 

फेसबुकवर हा फोटो शेअर करून संतोष म्हणतो :

Was taken while testing my underwater robot in the swimming pool, couldn’t resist taking this shot with the gopro in hand 😉

DRDO चे अधिकारी सध्या संतोष आणि IIT च्या प्रोफेर्सशी चर्चा करत आहेत. दुलीवर DRDO चे सेन्सर्स लावून टेस्टिंग करण्याचा त्यांचा मानस आहे. अजूनतरी DRDO तर्फे दुलीच्या मिलिटरी उपयुक्ततेबद्दल अधिकृत वक्तव्य आलं नाहीये.

संतोषच्या म्हणण्यानुसार – सध्या जे underwater रोबोट्स वापरले जातात त्यांच्यामध्ये mechanical thrusters असतात. परंतु दुली मधील bio-inspired flap movement मुळे दुलीची ऊर्जा क्षमता ७०% आहे – जी सध्या वापरल्या जाणाऱ्या रोबोट्समधे ३०% च आहे.

अमेरिकेतील Underwater Interventions expo मधे देखील दुलीचं कौतुक झालं होतं. महत्वाची गोष्ट ही, की त्या एक्स्पोमधे अमेरिकन नेव्ही देखील सामील झाली होती.

सध्या फक्त prototype असलेलं दुली, काही महिन्यातच पूर्ण तयार होईल आणि भारतीय सुरक्षा सेवेत दाखल होईल असा विश्वास राजगोपाल ह्यांना वाटतोय.

लई भारी संतोष…!

लई म्हणजे लईच भारी ! 😀

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Exit mobile version