Site icon InMarathi

अहो आश्चर्यम्! ‘हा’ संपूर्ण देश पायी फिरायला तुम्हाला ‘एक तास’ सुद्धा पुरेसा आहे

monaco inmarathi

worldnomads.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना फिरायला आवडतं. रोजच्या त्याच-त्या रटाळ कामापासून थोडा काळ दूर आणि रिलॅक्ससेशन म्हणून आपण कुठल्या ना कुठल्या टूरवर जात असतो.

रोजच्या दैनंदिन कामांपासून थोडा ब्रेक घेणं तसही चांगलंच. पण काही लोकांना पर्यटनाचं वेड असत.

अशी लोकं कुठेही फिरायला गेली की त्यांना तिथला सर्व परिसर बघायचा असतो, एकही जागा सोडायची नसते पण असं होत नाही काही ना काही नेहेमी सूटूनच जातं.

 

pinterest.com

 

वेळे अभावी म्हणा किंवा पैश्यांअभावी असं होत असत आणि मग परतताना आपल्याला होते ती निराशा की आपण एवढ्या दूर येऊन देखील सर्व काही नाही बघू शकलो.

कदाचित हे आपल्यापैकी प्रत्येकासोबतच झालं असणार.

त्यातही जर आपण कुठला दुसरा देश फिरायला गेलो मग तर विसरूनच जा. याच भटकंतीत काही ना काही आपण मिस करतोच.

पण करणार काय त्याला पर्याय नसतो ना, पण जर तुम्हाला कोणी अश्या देशाबद्दल सांगितलं जो तुम्ही केवळ एका तासात पायी फिरू शकता आणि तोही पूर्ण!

विश्वास बसत नाहीये ना…? अहो आम्ही गंमत नाही करत आहोत!

जगात खरचं एक असा देश आहे जो तुम्ही केवळ एका तासात पूर्ण फिरू शकता, यावर विश्वास ठेवणे जरा अवघड आहे पण हे खरं आहे!

चला तर मग तुम्हाला आज याच देशाची जरा ओळख करून देऊ.

 

kirkerholidays.com

 

तो देश म्हणजे मोनॅको… हा युरोपातील एक नगर-देश आहे. मोनॅको आकाराने जगातील दुसरा सर्वात लहान सार्वभौम देश आहे.

मोनॅकोच्या पूर्वेला भूमध्य समुद्र तर इतर तीन दिशांना फ्रान्स हा देश आहे.

मोनॅकोपासून इटली देशाची सीमा केवळ १६ किमी अंतरावर आहे. मोनॅकोमध्ये राजेशाही सरकार आहे. अल्बर्ट दुसरा हा मोनॅकोचा राजकुमार व सत्ताप्रमुख आहे. 

१९२७ पासून येथे ही राजेशाही सुरु आहे.

 

monacograndprixticket.com

 

फ्रान्सला लागून असलेला मोनॅको हा छोटासा देश खरोखरच १ तासात पायी फिरता येतो. विशेष म्हणजे या छोट्याश्या देशात प्रचंड संख्येने पर्यटक येतात व जगातील श्रीमंत देशात त्याची गणना देखील होते.

या देशाचे क्षेत्रफळ अवघे १.९५ चौरस किलोमीटर असून मोनॅको असेच या देशातील एकमेव शहराचे नांव आहे. मोनॅकोची लोकसंख्या अंदाजे ३३,००० आहे.

त्यामुळे हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला देश आहे.

हा देश फॉर्म्युला कार रेसिंग, जगप्रसिद्ध कॅसिनो आणि इथल्या उत्तम हवामानाबद्दल जगभरात प्रसिद्ध आहे.

 

pinterest.com

 

इथले दुसरे आणि महत्वाचे आकर्षण म्हणजे येथे नागरिकांना आयकर भरावा लागत नाही! तरीही नागरिकांना अव्वल दर्जाची सुरक्षा आणि सुविधा पुरवल्या जातात.

त्यामुळे युरोपियन देशांमधले अनेक धनाढय़ मोनॅकोचे नागरिक बनले आहेत.

बाहेर पैसा कमवायचा, तो मोनॅकोत आणून गुंतवायचा… म्हणजे कर नको, कर चुकवेगिरीपणा नको. या देशात भ्रष्टाचारही नाहीच.

त्यामुळे विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटींची मोनॅकोत स्थावर-जंगम मालमत्ता आहे.

 

thousandwonders.net

 

या देशात फ्रेन्च भाषा बोलली जाते. येथे होत असलेले फॉर्म्युला कार रेसिंग, जगप्रसिद्ध माँटेकार्लो कॅसिनो आणि इथल्या शाही परिवाराची शानोशौकत ही इथे येणाऱ्या पर्यटकांसाठीची मुख्य आकर्षणे आहेत.

येथे ऐतिहासिक आर्कीटेक्चरल कॅथेड्रल दे मोनॅको, ७ हजार प्रकारचे कॅक्टस असलेले उद्यान, जपानी गार्डन, १३ व्या शतकातील शाही निवास पॅलेस डू प्रिन्स, ४ हजार प्रकारचे गुलाब असलेले बगिचे, सरोवरातील हंस अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे बघायला मिळतात.

या देशातील क्वार्टियर गोल्डन स्कवेअरमध्ये फॅशनेबल हॉटेल्स, नाईटक्लब, रेस्टॉरंट, बुटीक्सची एकच गर्दी असते. कार रेसिंगबरोबरच येथे गोल्फ, फूटबॉल, वॉटर स्पोर्टस यांच्याही स्पर्धा सतत होत असतात.

व्हॅटिकन सिटी नंतरचा हा जगातला दुसरा सर्वात छोटा देश आहे. जर तुम्हाला पायी चालायचे नसेल तर तुम्ही बसने देखील प्रवास करू शकता. फ्रान्समधून येथे बस व रेल्वेने जाता येते.

 

globalchampionsleague.com

 

इथली लोकसंख्या कमी, मध्यमवर्गीय उत्पन्नस्तर आणि पुरेसे पोलीस बळ यामुळे तीव्र अशा सामाजिक समस्या मोनॅकोत नाही आहेत.

हिंसा, गुन्हे, गरिबी असही काही इथे दिसत नाही. इथे शिक्षण दहावीपर्यंत अनिवार्य आहे.

त्यामुळे या देशाची साक्षरता ९९ टक्के आहे. सरासरी उत्पन्नाचे आकडे सरकार देत नसले तरी सरासरी खर्चाची रक्कम वर्षांला ३० हजार डॉलर्स म्हणजे दरमहा लाख-सव्वा लाख रुपये आहे.

देशात सर्वदूर सीसीटीव्हीचे जाळे पसरलेले आहे, त्यामुळे इथला क्राईम रेटही कमीच आहे. एवढच काय तर इथली सरकार नागरिकांना डायरेक्ट पेन्शन देतं यावरून इथली सरकार जरा जास्तच दानशूर आहे असं म्हटल्यास वावग वाटायला नको.

तसेच इथे हवी तेवढी प्रसूती रजा मिळते. तर सरकारी व्यवस्थेतून प्रत्येकाला आरोग्य सुविधाही मिळते. रोमन कॅथलिक हा इथला राष्ट्रधर्म आहे. इथे ९५ टक्के लोकसंख्या याच धर्माची आहे.

पण इतरांनाही त्यांच्या त्यांच्या धर्मपालनाचे, पूजापाठाचे स्वातंत्र्य घटनेने दिलेले आहे. परंपरा, रीतिरिवाज, सण-उत्सवपालनात मोनॅकोवासी तसे शिस्तप्रिय आहेत.

मग… बसला ना आश्चर्याचा धक्का…! मोनॅको हा देश जरी आकाराने लहान असला तरी येथे पर्यटनासाठी भरपूर वाव आहे आणि सोबतच तुम्ही हा देश पूर्णपणे फिरू शकता!

लॉकडाऊनमुळे टुरिझम सेक्टर पूर्ण ठप्प आहे, पण एकदा हे कोरोना संकट टळूदे मग तर एकदातरी या देशाला अवश्य भेट द्या! 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version