' आर माधवन ने रिलीज केलेलं हे गाणं युट्युबवर जबरदस्त व्ह्यूज खेचतंय! – InMarathi

आर माधवन ने रिलीज केलेलं हे गाणं युट्युबवर जबरदस्त व्ह्यूज खेचतंय!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

पूर्वीचा काळ कसा वेगळा होता ना? खासकरुन नव्वदचं दशक! चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ ओसरू लागला होता आणि त्याची जागा वेगवेगळे प्रयोग करणारे कर्णमधुर अल्बम्स घेऊ लागले होते. आर्यन्स, बँड ऑफ बॉईज, सुचित्रा, कलोनियल कझिन्स, लकी अली, सिल्क रूट इ. अगणित नावे, जी आजही अंगावर रोमांचरोमांचक उठवतात, ती सारी याच काळाची अपत्ये! पण जसजसा याही क्षेत्रात पायरसीचा शिरकाव झाला, तशी याही क्षेत्राला उतरती कळा लागली. मधली काही वर्षं शांततेत आणि हताशेत गेल्यानंतर लोकांना आणि कलाकारांना इंटरनेटचे एक नवेच वरदान आकळू लागले, ते होते युट्यूब!

गाणी सिडी, डिजिटल डाऊनलोड वगैरेंतून विकण्यात हमखास पायरसी व्हायची. तीच गाणी आता थेट युट्यूबवर बोटाच्या एका टिचकीत उपलब्ध होऊ लागली. लवकरच युट्यूबने विशिष्ट व्ह्यूजमागे विशिष्ट रक्कम द्यायला सुरुवात केली आणि इंडी-म्युझिकचे एक वेगळेच व्यावसायिक विश्व बहरू लागले. जी गाणी कधीच तुमच्या-आमच्यापर्यंत पोहोचू शकली नसती, तीदेखील सहजगत्या उपलब्ध होऊ लागली. गंगनम स्टाईल, व्हाय धिस कोलावेरी डी, डेस्पासिटो वगैरे गाणी जगाच्या कानाकोपऱ्यांतसुद्धा हिट झाली, यात युट्यूबचा वाटा सिंहाचा आहे!

खरं तर या युट्यूब क्रांतीमुळे स्ट्रगल फार सोपा झालाय. पूर्वी आपली कला लोकांसमोर सादर करण्यासाठी पायपीट करावी लागायची, आता तेच काम एका लिंकवर होतं! यामुळे अनेक न-कलाकार जरी या क्षेत्रात शिरलेले असले, तरीही खऱ्या प्रतिभावंतांना कुठेच मरण नाही!

असेच दोन अवलिये कलावंत आहेत, विशाल रामकृष्णन आणि आदित्य रामकुमार!

अवघे विशितले हे दोघे तरुण विशाल-आदित्य (फेसबुक पेज) या नावाने संगीत देतात. यांपैकी विशाल रामकृष्णन हा लंडनच्या प्रख्यात ट्रिनिटी कॉलेजचा विद्यार्थी. त्याचे रेकॉर्डिंग, मिक्सिंग आणि प्रोग्रॅमिंगमधले कौशल्य वादातीत आहे तर आदित्य हा साक्षात ए. आर. रहमानच्या के. एम. म्युझिक कॉन्झर्व्हेटरीमध्ये संगीत शिकलेला!

vishal ramakrushnan marathipizza
विशाल

विशाल उत्तम मास्टरिंग करतो तसाच आदित्य जबरदस्त गातो. या दोघांच्या जोडीने बनवलेली गाणी (युट्यूब चॅनेल) त्यांच्या वेगळ्या वाटेवरील संगीताची साक्ष देणारी आहेत.

aditya rajkumar marathipizza
आदित्य

“ग्लोबल पिस साँग अवॉर्ड्स”सारखा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या या जोडीच्या विकिपिडिया (लिंक) पेजवरील माहितीदेखील उद्बोधक आहे.

नुकतेच या जोडीचे नवीन हिंदी गाणे रिलिज झाले. “मंज़िल” नाव असलेल्या या गाण्याचे विमोचन स्वतः आर. माधवनने केले आहे.

r madhavan manzil marathipizza

दक्षिणेतील सुप्रसिद्ध गायक साईशरण यांनी ते गायले आहे व लिहिले आहे विक्रम एडके यांनी.

saisharan marathipizza
साईशरण

 

vikram edke marathipizza
विक्रम एडके

याविषयी बोलताना विशाल-आदित्य सांगतात –

विक्रम हा आमच्या संगीतप्रवासाचा सुरुवातीपासूनच एक महत्त्वाचा भाग आहे. त्याने आमच्यासाठी अनेकदा हिंदीच नव्हे तर मराठी, बंगाली आणि पंजाबीदेखील गीतरचना केली आहे. त्याच्याशिवाय आम्ही आमच्या कोणत्याही हिंदी गाण्याची कल्पनाच करू शकत नाही! तसाच साईशरण आहे. इंडियात संगीतकारांना असलेले बजेटचे अडथळे ठाऊक असूनही त्याने आमचे गाणे गायले ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी!

“मंज़िल”चे सगळ्यांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे थॉमस ज्युथ! अनेकवार ग्रॅमी पटकावलेला हा जगप्रसिद्ध साऊंड इंजिनियर. तो भारताच्या दौऱ्यावर आला असता, त्याने “मंज़िल”ची मिक्सिंग आणि फायनल मास्टरिंग केली. तीदेखील चक्क ए. आर. रहमानच्या विख्यात ए. एम. स्टुडिओजमध्ये!

thomas juth marathipizza
थॉमस ज्यूथ

 

असे हे “मंज़िल”.

 

त्याने प्रकाशनाच्या दिवशीच पंचवीस हजारांहून अधिक व्ह्यूज मिळवले. सर्वच स्तरांतून वाहवा मिळवत असलेले हे गीत आता एक लाखांचा टप्पा ओलांडण्याकडे दिमाखदार वाटचाल करते आहे.

पैश्यांचा अभाव असूनही केवळ आणि केवळ प्रतिभेच्या बळावर पाय रोवून उभे असलेल्या विशाल-आदित्यसारख्या कलाकारांमुळेच संगीताला पुन्हा एकवार सोन्याचे दिवस येतील असा, ठाम विश्वास वाटतो. थोडक्यात, आवर्जून लक्ष ठेवावी अशीच ही सगळी मंडळी आहेत.

तुम्ही देखील खालील लिंकवर “मंज़िल” ऐकू शकता व तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता…!

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?