Site icon InMarathi

व्होडकाचे हे फायदे वाचून तुम्हीही एक बॉटल घरात आणून ठेवाल…!

vodka inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

दारूचे जे विविध प्रकार आहेत त्यापैकीच एक म्हणजे व्होडका! हा व्होडका तसा दारूच्या इतर प्रकारांपेक्षा जरा जास्त हार्ड! हार्ड म्हणजे त्याची नशा जास्त.

असो इथे आपण काही व्होडका चांगला कसा वगैरे गोष्टी जाणून घेणार नाही. शेवटी दारूच ती….शरीराला वाईटच…त्यामुळे तिच्या पासून लांब राहिलेलंचं बरं…

नाही का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पण मंडळी आज आम्ही तुम्हाला वोडका असे काही उपायोग सांगणार आहोत जे तुम्हाला आजवर कोणीही सांगितले नसतील.

हे उपाय वाचल्यावर तुम्ही देखील विचार कराल की – गोष्ट तशी वाईट पण अडीअडचणीला कामाला येऊ शकते आणि तुम्ही देखील एखादी व्होडका बॉटल घरात आणून ठेवाल!

चला जाणून घेऊया व्होडकाचे “हटके” फायदे!

 

hangoverprices.com

 

१) तापावर उपाय…

एखाद्या व्यक्तीला खूप ताप आला असेल तर पाण्यामध्ये थोडासा व्होडका टाकून त्यामध्ये एक कपडा भिजवून पिळून घ्या आणि पिळलेला कपडा डोक्यावर ठेवल्यास ताप कमी होईल.

 

seedoc.co

 

२) व्होडका एक प्रभावी हेअर कंडीशनरप्रमाणे काम करते.

शॅम्पूच्या बाटलीत थोडासा व्होडका मिसळलेल्या शॅम्पूने केस धुतल्यास केसांचे मूळ मजबूत होतील. केस गळण्याचे प्रमाण कमी होईल. याच्या उपयोगाने केस ऑइल-फ्री आणि सिल्की होतील.

 

rapidleaks.com

३) एक कप व्होडका आणि एक कप पाणी एकत्र करून त्या मिश्रणाने काच पुसून घेतल्यास, काच चमकू लागेल.

आणि हो – याच मिश्रणाने दागिनेही चमकवू शकता… (स्त्रियांसाठी added advantage !)

 

furnishburnish.com

 

४) “स्किन केअर”…!

जर तुम्हाला तुमची स्किन हेल्दी आणि तजेलदार बनवायची असेल तर थोडासा कापूस घेऊन त्यावर व्होडका लावा आणि त्याने चेहरा साफ करा.

 

skinkraft.com

 

नियमित हा उपाय केल्यास त्वचा तुकतुकीत राहते. हेल्दी रहाते.

५) कान दुखत असेल तर व्होडका वापरून पाहा.

ज्या कानामध्ये वेदना होत आहेत त्यामध्ये व्होडक्याचे काही थेंब टाका आणि ५ मिनिटानंतर कान स्वछ करून घ्या. कान दुखणे थांबेल.

व्होडक्याच्या थेंबामुळे कान दुखण्याला कारणीभूत असलेल्या बॅक्टीरिया नष्ट होतील.

 

livestrongcdn.com

६) तुमच्या घरामध्ये सजावटीसाठी लावण्यात आलेली फुलं जास्त काळ टवटवीत ठेवायची आहेत?

एका बाटलीभर पाण्यामध्ये व्होडक्याचे काही थेंब आणि एक चमचा साखर टाका. हे मिश्रण फुलांवर स्प्रे करा.

 

tripadvisor.com

 

या उपायाने फुलं बराचवेळ ताजे, टवटवीत राहतील.

७) तुमचे बूट खूप खराब झाले असतील आणि तुमच्याकडे पॉलिश करण्यासाठी वेळ नसेल तर थोडीशी व्होडका बुटांवर टाका आणि कपड्याने बूट पुसून घ्या.

चमचम चमकतील!

 

i.ytimg.com

 

८) वेदना शामक…!

तुम्हाला शरीरातील एखाद्या अवयामध्ये असह्य वेदना होत असतील तर थंड पाण्यामध्ये थोडासा व्होडका टाका. सोबत आइस क्यूब (बर्फ) तयार करून घ्या.

व्होडकायुक्त बर्फ वेदना असलेल्या ठिकाणी लावा, आराम मिळले.

 

onlymyhealth.com

 

हे सर्व “लाभ” वाचून आश्चर्यचकित झाला असाल…नाही? 😀

अजूनही विचार करताय? विश्वास बसत नसेल तर नक्की ट्राय करून पहा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version