आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
Time Management बद्दल खूप लिहिल्या गेलंय. तुम्ही खूप वाचलं आणि ऐकलं असेल. आम्ही त्या सगळ्याचा सार इथे द्यायचा प्रयत्न करतोय. छोट्या, ७ टिप्स मध्ये.
१ – एका आठवड्याचं analysis
Image source: stemdigitalvillage
संपूर्ण आठवड्याच्या कामाची records ठेवणारा एक planner बाळगा, ज्यामध्ये तुम्ही सगळं note down करून ठेऊ शकता.
जसं इतरांशी बोलण्यात किती वेळ गेला, विचार करण्यात किती वेळ गेला actual काम किती वेळ केलं, इ. ह्यामुळे एका week मधेच तुम्हाला कळून येईल कि तुमचा वेळ नक्की कुठे waste होतोय.
२ – आवश्यक, तातडीच्या कामाची scheduling
कोणतीही activity किंवा conversation – जी तुमच्या ध्येयाशी निगडीत आहे – त्याला daily एक वेळ assign केलेला असला पाहिजे आणि तो कोणत्याही परिस्थितीत पाळला गेला पाहिजे.
जर दुसरं काही काम त्या वेळेला आलं, जे टाळता येऊ शकत नाही, तर ह्या कामाला लगेच त्याच दिवशी reschedule करा. “उद्या”वर ढकलू नका.
३ – काम सुरु करण्याआधी व्यवस्थित planning करा
महत्वाच्या आणि किचकट गोष्टींवर direct काम सुरु करायच्या आधी, त्यावर विचार करण्यात आणि planning करण्यात पुरेसा वेळ घालवा.
Image source: actioncoach
लक्षात ठेवा – कामाचं planning हेच कामाच्या execution चं foundation असतं. पुरेश्या planning शिवाय, घाई-गडबडीत सुरु केलेलं काम व्यवस्थित पूर्ण नं झाल्यास आपली संपूर्ण मेहनत आणि वेळ अक्षरश waste जातो.
४ – अडचणींची तयारी ठेवा
गोष्टी schedule & plan करतांना हे लक्षात ठेवा कि तुम्हाला interruption येणारच आहेत आणि त्यासाठी पण त्यामध्ये वेळ add करून ठेवा (planned interruptions).
५ – Planning, Early Morning!
सकाळी कमीत कमी 30 minutes तुमचा दिवस plan करण्यासाठी घालवा.
Image source: smed
६ – Do Not Disturb मोड वर जा
कामाच्या वेळी सोशल मिडीयावर हा DND मोड activate करा. ह्या दरम्यान जर काही कामा व्यतिरिक्त phone calls किंवा mails आले तर त्यांना बाजूला ठेवा. काम झाल्यावर तुम्ही call back किंवा mails check करू शकता. अशा वेळेस शक्यतो phone silent वर ठवा.
७ – ८०% यशाची खात्री बाळगा, २०% अपयशाची तयारी ठेवा
सर्वात शेवटचं पण महत्वाचं – सगळंच achieve करणं खूप अवघड आहे. परंतु विचारपूर्वक, time management आणि planning ने केलेल्या कामामधून ७०-८०% results हे नक्कीच येतात. पण त्याचवेळी २०-३०% अपयशाचीही शक्यता असतेच. यशस्वी झालात तर मस्तच! पण नाही झालात तर काय? – हा विचार आधीच करून ठेवा. प्लॅन बी तयार असू द्या.
म्हणजे अपयशाने खचून नं जाता, त्या कठीण प्रसंगात “आता पुढे का?” ह्या विवंचनेत नं सापडता लगेच पुढील मार्गावर मार्गक्रम करू शकाल.
सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास दोन्हीही मनामध्ये ठेवून काम करा आणि बघा तुम्हाला नक्कीच success मिळेल.
जय हो !
Cheers!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.