Site icon InMarathi

माचिसच्या ७५ हजार काड्या + १ वर्ष १९ दिवसांची मेहनत, त्यातून तयार झालेला ताजमहाल!

taaj mahal im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शेख सलीम – अहमदाबादचा एक चाव्या बनवणारा साधा माणूस.

एकदा त्याची नजर सहज समोर पडलेल्या, वापरून फेकून दिलेल्या माचीसच्या काड्यांवर पडली. लोकांनी सिगरेट पेटवण्यासाठी वापरलेल्या आणि क्षणात भिरकावून दिलेल्या काड्यांवर. त्यांना बघून सलीमच्या मनात एक विचार आला –

ह्या काड्यांचा सदुपयोग करण्याचा.

गंमत म्हणून सलीमने त्या काड्या गोळा केल्या आणि मेहनत घेऊन त्यापासून एक टेबल बनवला.

पण टेबल समोर खुर्ची नको का?! म्हणून मग खुर्चीपण बनवली !

हे करत असताना चाव्या बनवण्याचं काम सुरूच होतं. सलीमने ही टेबल-खुर्चीची जोडी तिथेच ठेवलेली होती.

एका गिर्हाईकाने ती जोडी विक्रीस आहे का असं विचारलं – आणि तेव्हा सलीमला आपल्या हातात असलेल्या कौशल्याची जाणीव झाली.

तेव्हापासून सलीमने एका मागून एक अनेक कलाकृती घडवल्या आहेत आणि त्यांसाठी पुरस्कारही जिंकले आहेत.

 

 

 

 

 

आणि एक दिवस सलीमने ठरवलं – सर्व कलाकारांना ज्या अजरामर शिल्पाचं वेड लागलेलं असतं – त्या ताजमहालची निर्मिती करायची !

 

===

===

सलीम झपाटल्यागत कामाला लागला. तब्बल १ वर्ष १९ दिवस खपून, ७५,००० काड्या वापरून त्याने हा ताजमहाल बनवलाय !

 

 

एक वर्ष, रोज एखाद्या कलाकृतीवर केवळ छंद म्हणून काम करणं सोपं नाही. त्यात ही कलाकृती ज्या वस्तू वापरून केली जाते – त्या माचीसच्या काड्या – ही नाजूक वस्तू आहे. कितीदा अपयश आलं असेल कल्पना करवत नाही.

शिवाय ज्या कलाकृतीची निर्मिती सलीमने केलीये, ती कलाकृती देखील फार सोपी नाही ! पण जिद्दीच्या बळावर मनुष्य काहीही करू शकतो, हे सलीमने सिद्ध करून दाखवलंय.

सलीमचा हा प्रवास एका छोट्याश्या व्हिडिओमधून कळून येईल.

भारतात एकाहून एक हिरे लपलेले आहेत, हे काही खोटं नाही !

Well done Salim !

Salute…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version