' गरम किंवा थंड पाण्यापेक्षा ‘कोमट’ पाणी पिणे आरोग्यासाठी जास्त चांगले असते..? – InMarathi

गरम किंवा थंड पाण्यापेक्षा ‘कोमट’ पाणी पिणे आरोग्यासाठी जास्त चांगले असते..?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पाणी म्हणजे आपल्या जीवनाचा आधार, एकवेळ अन्न नसेल तर माणूस काही काळ तरी जिवंत राहू शकतो, पण पाणी नसले तर मात्र तेच जगणे असह्य होऊन जाते. असे हे पाणी आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे असते.

दिवसातून कमीत कमी 7-8 ग्लास पाणी पिणे आवश्यक असल्याचा खुद्द डॉक्टरही सल्ला देतात. पण तुम्हाला माहित आहे का पाणी उकळून पिण्यापेक्षा किंवा अतिशय थंड पाणी पिण्यापेक्षा जर तुम्ही कोमट पाणी पिले तर ते शरीरासाठी जास्त चांगले असते. कसे म्हणून विचारताय? चला जाणून घेऊया.

 

water-marathipizza01

 

सध्याच्या काळात पोटाच्या आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे. अधिकांश पोटाचे आजार दुषित पाण्यामुळे होतात. आयुर्वेदानुसार पाणीसुद्धा पचावे लागते. त्यामुळे त्यावर अग्निसंस्कार होणे गरजेचे आहे.

म्हणून प्रत्येक व्यक्तीने उकळून थंड केलेले पाणी प्यावे असे सांगितल्या जाते. उकळल्यामुळे पाणी निर्जंतूक तर होतेच, तसेच पचण्यास हलकेही होते.

 

Boiling water InMarathi

 

जर तुम्ही स्किन प्रॉब्लेममुळे त्रस्त असाल किंवा तजेलदार त्वचेसाठी वेगवेगळे कॉस्मॅटिक्स प्रॉडक्ट वापरून थकले असाल तर दररोज एक ग्लास गरम पाणी पिण्यास सुरुवात करा. तुमची त्वचा तजेलदार होईल.

कोमट पाण्यामुळे शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. सकाळी रिकाम्या पोटी व रात्री जेवल्यानंतर कोमट पाणी पिल्यास पचनक्रियेशी संबधित आजार होणार नाहीत. पोट साफ राहील. मलबद्धता होणार नाही.

भूक वाढवण्यातही एक ग्लास कोमट पाणी खूप उपयोगी आहे. एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एका लिंबाचा रस आणि मीठ टाकून प्यावे. यामुळे पोटातील जडपणा थोड्या वेळातच कमी होईल.

 

water-marathipizza02

 

पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्याचे सेवन करावे. यामुळे मळमळणे, छातीत जळजळ होणे आणि मलावरोध यासारख्या समस्या दूर होतात.

कोमट पाणी त्वचेशी संबंधित समस्या दूर करणारे नैसर्गिक औषध आहे. त्वचा तजेलदार ठेवण्यात कोमट पाण्याची महत्त्वाची भूमिका असते.

लिंबूपाण्याचे सेवन केल्याने वजन कमी केले जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, त्यासाठी कोमट पाण्यात लिंबाच्या रसासोबत मध मिसळून त्याचे सेवन करावे.

 

lemon water InMarathi

 

रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्यास मूत्ररोग होत नाहीत. हृदयातील जळजळ कमी होते. वातामुळे उत्पन्न होणाऱ्या आजारांमध्ये कोमट पाणी अमृतासमान फायदेशीर मानले जाते.

मासिक पाळीच्या काळात पोट दुखत असेल तर मुलींनी कोमट पाणी पिणे उत्तम मानले जाते, कारण त्याने आराम मिळतो. कोमट पाण्याचे नियमित सेवन केल्यास रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते. कोमट पाण्यामुळे शरीरातील तापमान वाढते. घामाच्या माध्यमातून शरीरातील सर्व विषारी तत्व बाहेर पडतात आणि रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते.

water-marathipizza03

 

कोमट पाणी पिणे शरीरासाठी फार उपयोगी आहे, यामुळे शरीरात उर्जा निर्माण होते. त्यामुळेच सर्दीचे रुग्ण, अजीर्णाचे रुग्ण, कफप्रकृती व स्थूल व्यक्तींनी नेहमी कोमट पाणी प्यावे.

दमा, उचकी, घश्यात जळजळ होणे इ. आजारांमध्ये तसेच तळलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानंतर कोमट पाणी पिणे लाभदायक राहते.

चरक संहितेनुसार शरीरात ज्वर (ताप) असेल तर थंड पाणी पिऊ नये. कोमट पाणी प्यावे. तापामध्ये कोमट पाणी जास्त लाभदायक ठरते. शरीरातील एखाद्या भागात गॅसमुळे त्रास होत असेल तर एक ग्लास कोमट पाणी पिल्यास गॅस बाहेर पडतो.

काय मंडळी आहे की नाही उपयुक्त माहिती? पटलं असेल तर मग सुरु करा आजपासून कोमट पाण्याचे सेवन!

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?