Site icon InMarathi

दातांबद्दलचे ‘ते’ गैरसमज ज्यांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो!

teeth-marathipizza00

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या सौंदर्यात भर टाकण्यात मोलाची भूमिका बजावणारे शरीरातील अंग म्हणजे दात होय. जर दात पांढरे शुभ्र असतील तर ते आपले हास्य अधिक उजळवतात आणि समोरच्यावर आपला प्रभाव पाडण्यासाठी देखील रामबाण ठरतात.

त्याचमुळे अनेकजण केवळ आपल्या चेहऱ्याची निगा घेत नाहीत तर सोबतच आपल्या दातांची देखील भरपूर निगा घेतात, कारण त्यांना माहित असते एकवेळ चेहऱ्यावर मेकअप थापला नाहीतरी चालेल पण दात पिवळे असतील तर त्याचं अधिक वाईट इम्प्रेशन पडू शकतं.

दिवसातून दोनदा नीट दात घासणे, वेळेवर दंतचिकित्सकाकडून तपासणी करून घेणे वगैरे गोष्टी दातांबद्दल प्रेम असणारे लोक आवर्जून करतात, पण इतके असूनही त्यांच्या मनात दातांबद्दल काही गैरसमअ असतात, जे वेळीच दूर होणे गरजेचे आहे. म्हणून हा लेख..!

१) जास्त वेळ ब्रश केल्यानेच दात चांगले साफ होतात

johnstreetdental.com

जास्त वेळ ब्रश करत राहिल्याने दातांची सफाई चांगल्या रीतीने होते, असे अनेकांना वाटते, परंतु हे चुकीचे आहे. तज्ज्ञांच्या मते, दात कधीही तीन मिनिटांपेक्षा जास्त ब्रश करू नयेत. जास्त वेळ ब्रश करत राहिल्याने दातांच्या एनॅमलचे नुकसान होते आणि दातांचा रंगही फिका पडतो.

 

२) टार्टर काढल्यावर दातही कमकुवत होतात

beautyhealthtips.in

हिरड्या व दात मुळांच्या माध्यमातून जुळलेले असतात. अशा वेळी टार्टर (दातावर जमा झालेला पिवळा थर) आणि दातांची मजबुती यांचा एकमेकांशी कोणताच संबंध नसतो. वास्तविक हा तुमच्या कमकुवत आरोग्याचा संकेत आहे. सोबतच दातांची योग्य प्रकारे स्वच्छता न झाल्यानेसुद्धा अशी स्थिती निर्माण होते.

तज्ज्ञांच्या मते टार्टरच तोंडाची दुर्गंधी आणि दातांच्या पिवळ्या रंगासाठी जबाबदार असतो. यामुळे दातांचा नैसर्गिक रंग निघून जातो.

 

३) अधिक दाबाने ब्रश केल्यावर चांगली सफाई होते

दात निरोगी ठेवण्यासाठी अधिक दाबाने ब्रश करण्याचा धोका पत्करू नये. यामुळे दातांवर अधिक दबाव पडल्याने हिरड्या ढिल्या होतात आणि दातांची पकड कमकुवत होते. अशा स्थितीत दात पडण्याची भीतीही असते. त्यामुळे नेहमी हलक्या हातांनीच ब्रश करावा.

 

४) दातांचा पांढरा रंग म्हणजे दात अत्यंत स्वच्छ असणे

blogsnow.com

जर तुमचे दात पांढरे असतील तर तुम्हाला दातांशी संबंधित कोणतीच समस्या उद्भवणार नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. कॅव्हिटी (पोकळी) दातांमध्ये आणि मुळांपर्यंत निर्माण होते. त्यामुळेच सहजपणे लक्षात येणे शक्य होत नाही. कॅव्हिटी भविष्यात गंभीर समस्याचे रूपही घेऊ शकते. तसेच दातांमध्ये जमा झालेल्या कॅव्हिटीचे काळ्या रंगात रूपांतर होऊ शकते.

 

५) ब्लीचिंग दातांसाठी धोकादायक ठरू शकते

locanto.net

वास्तविक दातांचा रंग एकसारखा करण्यासाठी ब्लीचिंग केली जाते. ब्लीचिंगमुळे व्यक्तीच्या मौखिक आरोग्याचे कोणतेच नुकसान होत नाही. तथापि, ब्लीचिंग केल्यानंतर अनेकांचे दात दुखायला लागतात, परंतु यामुळे कायमस्वरूपी कोणतेच नुकसान होत नाही. दातांमध्ये होणार्‍या ब्लीचिंगमध्ये हायड्रोजन पॅरॉक्साइडचा वापर केला जातो. यामुळे दातांचे आरोग्य चांगले राहते. हा घटक दात पांढरे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

 

६) दातांशी संबंधित विकार आनुवंशिक असतात

hubspot.net

दातांशी संबंधित विकार आनुवंशिक असतात, असे काही लोकांना वाटते, जे अत्यंत चुकीचे आहे. तज्ज्ञांच्या मते, दातांची संरचना आणि जॉ-लाइन (जबड्याची घडण) भलेही आनुवंशिक असू शकतात, परंतु दातांची स्थिती ती व्यक्ती दातांच्या स्वच्छतेसाठी किती सजग आणि प्रयत्नशील आहे त्यावर अवलंबून असते.

 

७) गोड खाद्यपदार्थ किंवा चॉकलेटचे सेवन केल्यानेच कॅव्हिटी निर्माण होते.

techtimes.com

चॉकलेट किंवा कोणत्याही चिकट खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने दात किडण्याची शक्यता अधिक असते, परंतु गोड पदार्थ खाणेच बंद करावे हा त्याचा अर्थ होत नाही. अशा वेळी दिवसातून दोन वेळा नियमित ब्रश करणे आवश्यक आहे.

झाले ना आज गैरसमज दूर…तरी दातांची योग्य ती निगा घ्यायला विसरू नका, कारण ते देखील सौंदर्याचे एक प्रतिक आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version