' यशस्वी होण्यासाठी “मेहनतीबरोबरच” महान लोकांच्या ‘ह्या’ सवयी अंगीकारा! – InMarathi

यशस्वी होण्यासाठी “मेहनतीबरोबरच” महान लोकांच्या ‘ह्या’ सवयी अंगीकारा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या प्रत्येकाचा कोणी ना कोणी आदर्श असतो. मला त्याच्यासारखं व्हायचं आहे असं आपण स्वत:लाच सांगत असतो. त्यासाठी कितीही मेहनत घ्यायची आपली तयारी असते.

कारण आपण ज्यांना आदर्श मानतो ते महान लोक असतात आणि ते महान यामुळेच होतात कारण त्यांनी त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी तेवढीच मेहनत घेतलेली असते.

पण तुम्हाला माहित आहे का –

ज्या कोणी महान व्यक्ती आहेत त्या केवळ मेहनतीच्या जोरावर किंवा राबराब प्रयत्न करून मोठ्या झालेल्या नाहीत.

एक विशिष्ट पद्धती हे लोक फॉलो करतात आणि म्हणूनच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात आणि महान होतात.

 

success-way-inmarathi
salesforce.com

 

आता तुम्ही म्हणाल की त्यांना कसं कळत असेल की, कोणती विशिष्ट पद्धती फॉलो केल्यावर आपण आपले ध्येय प्राप्त करू शकू? तर मंडळी या पद्धती स्वत:च स्वत:ला उमगतात.

पण त्या प्रत्येकालाच उमगत नाहीत, अन्यथा प्रत्येकजण महान झाला असता नाही का?

पण जर आपण सर्वच महान लोकांचा एकत्रित विचार केला, तर आपल्या लक्षात येतं की त्यांनी त्यांच्या खडतर प्रवासामध्ये फॉलो केलेल्या काही पद्धती ह्या एकसारख्याच होत्या.

आज याच पद्धती आम्ही तुमच्यासमोर उलगडत आहोत.

 

दिवसाला अनेक कामे…

 

great-personality-marathipizza02
jewishstudies.washington.edu

 

यशस्वी लोक दिवसभरात अनेक कामे करत असतात.

जर्मन तत्त्ववेत्ते इमॅन्युअल कांट दुपारी पायी चालत असत. दररोज आपल्या मित्रांसोबत जेवण करत असत. गांधीजी चरखा चालवत आणि रात्री उशिरा स्नान करत असत.

चर्चिल पेंटिंग करत असत, माशांना दाणे देत असत आणि पत्त्यांचा बंगला तयार करत असत. आपल्या मेंदूला आरामापेक्षा विविध प्रकारची कामे हवी असतात, असे त्यांचे मत होते.

 

व्यायामास कंटाळा करू नये…

 

great-personality-marathipizza03
britannica.com

 

इमर्सन, गांधी, व्हिक्टर ह्युगो हे नियमित पायी चालत. जर्मन तत्त्ववेत्ते नित्शे म्हणत की,

सकाळी पाच वाजता व्यायाम करताना त्यांना रचनात्मक विचार सुचत.

नेल्सन मंडेलादेखील दररोज सकाळी पाच वाजता पायी फेरफटका मारायला जात.

एकदा तर मंडेलांनी एका पत्रकाराला मुलाखतीसाठी सकाळी पाच वाजेची वेळ दिली होती, पण त्या पत्रकाराला मंडेलांच्या वेगाने चालता आले नाही. तो एवढा थकला की, काहीच प्रश्न विचारू शकला नाही.

 

रिलॅक्स होणे…

 

great-personality-marathipizza08
amazonaws.com

अनेकदा रिलॅक्स होण्यासाठी बरेच जण एखाद्या कमी अवघड कामात स्वत:ला गुंतवून घेतात. पुस्तक वाचणे किंवा भांडी घासणे हे रिलॅक्सेशन नाही.

गांधीजी शांत राहून निसर्गाचे निरीक्षण करत असत. चर्चिल एकटे बसून सिगारेट पीत असत. बिथोवन नेहमी आत्मपरीक्षण करत असत.

 

कामाची मर्यादा…

 

great-personality-marathipizza01
usefulstooges.files.wordpress.com

आजकाल ऑफिसमध्ये जास्त वेळ काम करण्याला ‘प्रेझेंटिझम’ असे म्हटले जाते. पण आठ तासांपेक्षा जास्त वेळ काम करणारे इतिहासात खूप कमी लोक होते.

मायकल फोकॉल्ट हे तत्त्वज्ञानी सकाळी नऊ वाजेपासून तीन वाजेपर्यंत काम करत होते. संगीतकार बिथोवन सूर्योदयापासून दुपारी तीन वाजेपर्यंत काम करत असत.

टॉ रॉबिन्स हे लेखकसुद्धा तीन तासांपेक्षा जास्त वेळ लिखाण करत नसत.

 

जेवताना घाई नको…

 

great-personality-marathipizza04
thevintageguidetolondon.com

 

ही गोष्ट बऱ्याच जणांना रुचणार नाही किंवा बालिश वाटेल, पण हे अगदी खरे आहे. यशस्वी लोक शांतपणे, मन लावून जेवतात.

चर्चिल जेवण अगदी निवांतपणे करत असत. आजकालसारखे आपल्या डेस्कवर बसून सँडविच खाल्ल्याप्रमाणे ते जेवण नव्हते. शांततेने जेवण करत असत.

घरात एकट्याने किंवा दूरवर एखाद्या उद्यानात बसून आरामात जेवणाचा आस्वाद घेत असत.

 

पहाटे लवकर उठणे आणि एकांतात वेळ घालवणे…

 

great-personality-marathipizza05
sbs.com.au

 

ही काहीशी गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. कारण बरेचसे महान व्यक्ती हे पहाटे उठायचे जसे की गांधी, फ्रँकलिन आणि मंडेला लवकर उठत असत,

तर बरेचसे महान व्यक्ती असेही होते जे उशिरा उठत असत जसे की,  सॅम्युअल जॉन्सन, चर्चिल आणि डायलन थॉमस उशिरा उठत असत.

पण बहुतेक वेळा हेच आढळून आले आहे की लवकर उठो किंवा उशिरा, त्यांच्याकडे एकांतात रमण्यासाठी, स्वत:साठी बराच वेळ होता.

 

कामादरम्यान विश्रांती…

 

great-personality-marathipizza06
static.guim.co.uk

 

हे महान लोक दिवसभर काम करताना ब्रेक घेत होते. सॉक्रेटिस हे तत्त्वज्ञानी काम सोडून सात मिनिटे उभे राहत असत. संगीतकार बिथोवन थोडा वेळ धावत असत किंवा फिरून येत असत.

ते आपल्या कामाला ‘वर्किंग व्हाइल वॉकिंग’ असे म्हणत असत. म्हणजे काम करता करता पायी चालणे.

 

मिनिटांचा हिशेब ठेवू नये…

 

great-personality-marathipizza07
headsup.boyslife.org

 

यशस्वी लोकांची दिनचर्या पाहिली असता असे लक्षात येते की, प्रत्येक मिनिटाचा हिशेब ठेवणे आवश्यक नसते. प्रत्येक मिनिटाचा हिशेब ठेवून आपण दिनचर्या कठीण करतो.

दुपारचा थोडावेळ का होईना आराम करणे…

मेंदूला आराम मिळण्यासाठी आणि क्रियेटीव्हीटी टिकवून ठेवण्यासाठी अनेक जण जास्तीत जास्त वेळ कामापासून दूर राहत असत.

बिथोवन सकाळी काम सुरू करत होते, पण दुपारपर्यंत ते संपवत होते. व्हिक्टर ह्युगो सकाळी लिखाण करत असत आणि दिवसभर काम करत नसत.

दुपारभर पॅरिसच्या रस्त्यांवर डबल डेकर बसमधून फिरत असत.

या अश्या गोष्टी आहेत ज्याकडे आपण सामान्य लोक दुर्लक्ष करतो.

 

success-inmarathi

 

आपल्याला वाटतं नं थकता मेहनत केली तरच आपण यशस्वी होऊ. पण असे नाही आहे.

तुमच्या मेंदूला आराम मिळाला पाहिजे, तुमचे मन काही क्षणांसाठी का होईना शांत झाले पाहिजे आणि तेव्हाच तुम्ही स्वत:पुढे उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांबरोबर चिंतन करू शकता.

स्वत:चे ध्येय गाठण्यासाठी अजून काय प्रयत्न करावेत याचा विचार करू शकता. तर मंडळी जमल्यास नक्की या पद्धती वापरून पहा, यश तुमचेच आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?