आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – ओंकार दाभाडकर
===
चाणक्याला कोण ओळखत नाही?
चंद्रगुप्त मौर्यांच्या बलाढ्य “मौर्य” साम्राज्याची स्थापना ज्या कुशाग्र बुद्धिवंताच्या मार्गदर्शनाखाली झाली, ज्याने “अर्थशात्र” नावाचा ग्रंथ रचून राज्यव्यवस्था, कृषी, न्याय आणि राजनीतीची अनेक मूल्य मांडली – तो कौटिल्य… तो चाणक्य…!
चाणक्यांच्या मृत्युबद्दल अभ्यासकांत मतभेद आहेत. पण अनेक जैन ग्रंथांमधे एक कथा आढळते – ती अशी :
आपल्या प्रिय शिष्य चंद्रगुप्तावर चाणक्यांचा केवळ विश्वासच नव्हता – तर प्रेमही होतं आणि ह्या प्रेमापोटीच – चाणक्य चंद्रगुप्ताच्या अन्नात विष घालत असत…!
अर्थात – चाणक्याचा हेतू शुद्ध होता. मौर्य साम्राज्याची पताका चौफेर झळकत होती. त्यामुळे चंद्रगुप्त मौर्याचे अनेक शत्रू होते. आपल्या राजावर विषप्रयोग होऊ शकतो हा धोका चाणक्याने ओळखला होता.
असं काही घडल्यास विषासमोर चंद्रगुप्ताची प्रतिकारशक्ती टिकावी म्हणून त्याच्या भोजनात रोज थोडं थोडं विष मिसळवलं जाई.
एक दिवस राणी दुर्धराने राजाचं अन्न खाल्लं. त्यावेळी राणी गर्भार होती आणि ७ दिवसातच त्यांना मूल होणार होतं.
अचानक खाल्ल्या गेलेल्या विषामुळे राणीला वेदना होऊ लागल्या आणि त्या किंचाळायला लागल्या. चाणक्य बाजूच्या कक्षात होते – त्यांनी धावत येऊन परिस्थिती ओळखली.
राजाचा वंश टिकायला हवा, त्याला विषबाधा होऊ नये म्हणून चाणक्यांनी त्वरित पोटातून शिशुला बाहेर काढलं, पण राणीचा मृत्यू झाला.
असं म्हणतात, की एक थेंब विषाचा स्पर्श त्या शिशूच्या कपाळाला झाला आणि तिथे निळसर डाग पडला – हाच दुसरा मौर्य सम्राट – राजा बिंदूसार. सम्राट अशोकाचा पिता.
बिंदुसार मोठा झाला, राजा बनला. चंद्रगुप्ताने सन्यास घेतला पण चाणक्य अजूनही अधूनमधून बिन्दुसारचं मार्गदशन करत असत.
बिंदुसारचा प्रधान – सुबंधू – चाणक्यांचा द्वेष करायचा.
त्याने राजाला त्याच्या जन्माची आणि राणीच्या मृत्यूची कथा सांगितली. आपल्या आईवर चाणक्याने विषप्रयोग केला असा समज झालेला बिंदुसार चाणक्यावर प्रचंड चिडला.
व्यथित चाणक्याने सर्व काही त्यागून प्राण सोडण्यासाठी अन्न-पाण्याचा त्याग केला. पुढे बिन्दुसारला सत्य कळालं आणि त्याने चाणक्यांची क्षमा मागितली. पण एकदा निर्णय घेऊन बसलेले चाणक्य बधले नाहीत आणि त्यांनी देह ठेवला.
अन्न-पाण्याचा त्याग करून देह ठेवण्याची ही पद्धत जैन संप्रदायात आजही आहे.
—
- चाणक्यांची ११ सूत्रे, काही धक्कादायक तर काही त्रासदायक!
- आर्य चाणक्यांची ही १५ वाक्यं मनात खोल रुजवा; मग जीवनात अशक्य काहीच नाही!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.