' शोएब अख्तरच्या प्रसिद्ध “पोज” मागचं कारण – InMarathi

शोएब अख्तरच्या प्रसिद्ध “पोज” मागचं कारण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

क्रिकेट हा खेळ फक्त भारतातच नाही संपूर्ण जगात खूप प्रसिद्ध आहे, हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही. अबालवृध्दांसाठी जर कुठला खेळ सर्वाधिक आवडीचा असेल, तर तो आहे क्रिकेट!

त्यातच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील युद्ध हे कधीही न संपण्यासारखं आहे. हे दोन्ही संघ जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरतात, तेव्हा त्यांच्यामधील घमासान बघण्याची मजा तो रोमांच काही औरच असतो.

यावेळी सामन्यादरम्यान फलंदाज आणि गोलंदाज यांची बाचाबाची झालेली तुम्ही खूपवेळा पाहिली असेल. याच गोष्टीसाठी पाकिस्तानातील गोलंदाज शोएब अख्तर खूप प्रसिद्ध होता.

 

akhtar-inmarathi

 

शोएब अख्तरचा जन्म पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये १३ ऑगस्ट १९७५ मध्ये झाला. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये नोव्हेंबर १९९७ मध्ये पदार्पण केले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४६ सामन्यांमध्ये २५.७ च्या सरासरीने १७८ विकेट घेतल्या.

शोएब अख्तरने १६३ एकदिवसीय सामन्यांमध्ये २४.९८ च्या सरासरीने २४७ विकेट घेतल्या आहेत. त्याची उंची ६ फुट, तसेच त्याची शरीरयष्टी सुद्धा खूप धडधाकट आहे.

शोएब अख्तरने क्रिकेटमध्ये पदार्पण करताच, तो नावारूपाला आला. त्या काळामध्ये जगातील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून शोएब अख्तर नावाजलेला होता.

शोएब गोलंदाजी करायचा तेव्हा तो फलंदाजांना अक्षरशः हैराण करून सोडायचा. २००३ च्या विश्व चषकामध्ये त्याने इंग्लंड विरुद्ध खेळताना १६१.१ किमी/तास या वेगाने चेंडू टाकला होता. त्याच्या याच वेगवान गोलंदाजीमुळे त्याला ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

१०० मैल प्रती तास एवढा वेग ओलांडणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आणि असे त्याने आपल्या कारकीर्दीमध्ये दोनदा केले. त्याच्या या भन्नाट वेगवान गोलंदाजीमुळे खूप वेळा अनेक फलंदाजांना दुखापत सुद्धा झाली आहे.

त्याच्या गोलंदाजीमुळे आणि त्याच्या खुनसी स्वभावामुळे कधी-कधी फलंदाज सुद्धा त्याच्या विरोधात खेळताना थोडेसे घाबरत असत.

२००७ मध्ये आपल्याच संघातील खेळाडू मोहम्मद आसिफ याच्याबरोबर झालेल्या त्याच्या वादामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. त्याच्यावर घालण्यात आलेली ही बंदी नंतर २०११ विश्व चषकाच्यावेळी हटवण्यात आली.

 

shoaib-akhtar-inmarathi

 

शोएब अख्तर हा त्याच्या भन्नाट गोलंदाजी व्यतिरिक्त त्याच्या विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करणाऱ्या स्टाईलने सुद्धा ओळखला जातो.

त्याची विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करण्याची स्टाईल हा त्याचा ‘ट्रेडमार्क’ होता. तो जेव्हा विकेट घेत असे, तेव्हा त्याच्या आनंद साजरा करण्यासाठी दोन्ही हात हवेत पसरवून एखाद्या विमानासारखे तरंगल्यासारखे करतो.

असे करताना आपण त्याला मैदानावर खूप वेळा पाहिले असेल. शोएब अख्तरने या गोष्टीमागील रहस्य ट्विटरवर उघड झाले होते. त्याच्या ट्विटरवर त्याने लिहिले होते की,

त्याला लढाऊ विमाने खूप आवडतात. त्याला लढाऊ विमान पायलट बनण्याची खूप इच्छा होती. त्याचे हे लढाऊ विमानांवर असलेल्या प्रेमामुळे तो विकेट घेतल्यावर नेहमी आपले दोन्ही हात हवेमध्ये पसरवतो आणि एखाद्या आकाशात उडणाऱ्या जेटसारखा आपला आनंद साजरा करतो.

 

Shoaib Akhtar.marathipizza1

 

Shoaib Akhtar.marathipizza3

 

Shoaib Akhtar.marathipizza4

शोएब अख्तर हा खूप चांगला खेळाडू आहे. त्याच्या कारकीर्दीमध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी केली यात काही शंकाच नाही. फक्त पाकिस्तानमध्येच नाही, तर संपूर्ण जगामध्ये त्याच्या चाहत्यांची संख्या खूप जास्त आहे.

भारतातील खेळाडूंना जेव्हा शोएब आउट करत असे, तेव्हा नक्कीच भारतीय लोकांना तो आवडत नसे, परंतु एक खेळाडू म्हणून तो बहुतेक भारतीयांना आवडत होता.

प्रत्येकवेळी त्याने विकेट घेतल्यानंतर एखाद्या स्वच्छंद आकाशात उडणाऱ्या पक्षाप्रमाणे असणाऱ्या त्याच्या स्टाईलमागचे खरे कारण जेव्हा त्याने ट्विटरमार्फत आपल्या चाहत्यांना सांगितले, तेव्हा त्याचे चाहते आणि फॉलोअर्स यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

त्याच्या चाहत्यांनी ट्विटर दिलेल्या काही प्रतिक्रिया :

 

Shoaib Akhtar.marathipizza5

 

असे आहे शोएब अख्तरच्या विकेट घेतल्यानंतर आनंद व्यक्त करण्याच्या स्टाईलमागचे रहस्य…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?