आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
====
११ जुलै २००६ ला झालेल्या साखळी बॉम्ब ब्लास्ट्सने मुंबईच काय, उभ्या भारताला हादरवून सोडलं होतं.
आज त्या काळ्या दिवसाला दहा वर्षं होत आहेत. अजूनही त्या जखमा भरून निघाल्या नाहीयेत.
वरील फोटो आहे माटुंगाला स्फोट झालेल्या लोकल ट्रेनच्या डब्ब्याचा.
संध्याकाळी ६:२४ वाजता साखळी स्फोटांची मालिका सुरू झाली.
माटुंगा, माहीम, वांद्रे/बांद्रा, जोगेश्वरी, बोरीवली, मिरारोड आणि सांताक्रूझ ह्या स्टेशन्सच्याजवळ प्रत्येकी एक, असे एकूण ७ बॉम्बस्फोट झाले.
२०९ जणांचा प्राण घेणाऱ्या आणि ७०० हून अधिक लोकांना जखमी करणाऱ्या ह्या सिरीज ब्लास्ट्सचा घटनाक्रम असा होता :
गुन्हेगारांना शोधण्यासाठी मोठी मोहीम उघडण्यात आली. ३६ तासात ३५० लोकांना चौकशीसाठी पाचारण केलं गेलं.
१४ जुलै रोजी लष्कर ए तैय्यबाशी संबंधित “लष्कर-ए-कहर” ह्या संघटनेने सिरीज ब्लास्ट्सची जबाबदारी घेतली.
आरोपींमध्ये SIMI म्हणजेच Students Islamic Movement of India ह्या संघटनेचे कार्यकर्ते देखील होते.
२००६ मधे घडलेल्या ह्या दुष्टकर्माची न्यायालयीन प्रक्रिया ३० सप्टेंबर २०१५ मधे पूर्ण झाली.
एकूण १३ आरोपींपैकी ८ जणांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केल्या गेली होती.
मोक्का न्यायालयाने (Maharashtra Control of Organised Crime Act (MCOCA)) एकाची निर्दोष मुक्तता केली, ५ जणांना फाशी आणि ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
२००६ नंतर काय?
२००६ नंतर असे हल्ले थांबले नाहीतच. साखळी ट्रेन ब्लास्ट्स नंतर भारतात ३० हून अधिक अतिरेकी हल्ले झालेत. (ज्यात नक्षली व हिंसेचा समावेश नाही.) २६/११ चा मुंबईवरील attack तर सर्वश्रुत आहेच.
भारतातील अतिरेकी लोकांचं जाळं अजूनही मजबूत आहेच. ISIS च्या रूपाने नवा राक्षस उभा होत आहे.
अजूनही निष्पापांचे बळी जातच आहेत. लहान मुलं अनाथ होत आहेत, महिला विधवा होत आहेत, म्हातारे आपल्या मुला-मुलींना गमावतच आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.