Site icon InMarathi

मुंबई-पुण्यात “स्टार्ट-अप” चं चित्र साधारण, दिल्ली-बंगळूरू आघाडीवर

start up matathipizza 00

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

गेल्या दशकात जगभरातील प्रमुख देशांमधे – विशेषतः अमेरिका आणि युरोपियन देशांत – स्टार्ट-अप्सचा झंझावात सुरू झाला. आपलं जग व्यापून टाकलेले गुगल, फेसबुक ह्याच झंझावाताचा result आहेत.

भारतात हे वारे नुकतेच वाहू लागलेत. मुंबई, दिल्ली, बंगळूर, हैद्राबाद ह्या प्रमुख शहारांमधे अनेक तरुण पुढे येऊन काही करू बघत आहेत. नवनवीन कल्पनांना मूर्त स्वरूप देऊ बघत आहेत.

स्टार्ट-अपला मोठं होण्यासाठी आवश्यक असतात ३ गोष्टी.

१ – अप्रतिम प्रोडक्ट आयडिया आणि ह्या कल्पनेचं किमान एक प्रोटोटाईप

२ – टीम

३ – फंडिंग….!

बहुतेक स्टार्ट-अप्स पहिल्या २ गोष्टींमधेच अयशस्वी होतात. जे ह्या पायऱ्या यशस्वीपणे चढतात त्यांना फंडिंग मिळवण्याचं दिव्य पार पाडावं लागतं. हे दिव्य यशस्वी पार पाडल्यानंतर यशस्वी ‘डील’ होते आणि कंपनी खऱ्या अर्थाने सुरू झाली असं म्हणता येतं.

एका सर्वेक्षणानुसार अश्या स्टार्ट-अप डील्स होण्यात आमचे मुंबई-पुणे मागे आहेत.

जून २०१६ पर्यंत एकट्या दिल्लीमधे जेवढे फंड्स आकर्षित झाले, तेवढे इतर सर्व शहरांमधे मिळून, एकत्रित, देखील आले नाहीयेत.

आतापर्यंत दिल्ली + NCR भागामधे १५५ स्टार्ट-अप्स मधे एकूण ९१७ मिलियन डॉलर्स (९१ कोटी, ७० लाख डॉलर्स, म्हणजेच साधारण ६४ अब्ज रुपये !) invest झालेत.

पुढील info-graphic मधे चित्र नीट स्पष्ट होईल :

स्त्रोत

महाराष्ट्रासाठी समाधानाची बाब हीच की investors ना आकर्षित करण्यात मुंबई-पुणे ही दोन्ही शहरं, भारतातील प्रमुख ५ शहरांपैकी आहेत.

दिल्ली बंगळूर पहिले २ आहेत आणि हैद्राबाद पाचवं आहे.

अहमदाबाद, जयपूर आणि चेन्नई ह्या शहरांमधे देखील स्टार्ट-अप investments वाढत आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Exit mobile version