सभोवतालच्या या ५ गोष्टी तुमच्यावर नकळत भयंकर नकारात्मक परिणाम करताहेत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या आयुष्यात सकारात्मकता किती आवश्क आहे हे आपण जाणतोच, पण त्यासाठी, आपण negativity पासुन दुर राहायला हवं. नकारात्मक गोष्टी आपली ताकद झपाट्याने कमी करतात. उत्साह संपवतात.
आपल्या जीवनात, आपल्या सभोवताली घडत असलेल्या चांगल्या घटनांतून सुख, समाधान, प्रेरणा मिळवायची असेल तर नकारात्मकतेपासून दूर जाणं अत्यंत आवश्यक आहे.
आपल्या सभोवतालच्या अशाच ५ गोष्टींची ही यादी…५ अशा नकारात्मक गोष्टी ज्या तुम्हाला डिप्रेशनपर्यंत नेऊ शकतात.
१ – लोक काय म्हणतील
हा आहे सगळ्यात मोठ्ठा अडथळा. आपण ह्या गोष्टींचा खूप विचार करतो. त्यामुळे आपल्या आवडी निवडी, आपला इंटरेस्ट लपवत फिरतो. त्याने होतं काय? आपण आतल्या आत घुसमटत राहतो…! उपयोग मात्र शून्य.
लोक शेवटी चुका काढणारच. त्यामुळे लोकांना आनंदी ठेवण्याच्या प्रेशरमध्ये कधीच राहू नका.
२ – वातावरण
ह्यात सगळंच वातावरण आलं. जिथं आपण राहतो, काम करतो, फिरायला जातो. वातावरणामुळे आपल्यावर कळत नकळत चांगले -वाईट संस्कार होत असतात. आणि त्यातून आपण घडत जातो.
आपण नकारत्मक वातावरणात अडकलो तर “पुढे” जाण्याची प्रक्रियाच बंद पडते. आपली वैचारिक प्रगती खुंटते आणि मग – डबक्यात राहून बेडकाने समुद्राचे स्वप्न पाहील्यासारखं होतं.
३ – वाढतं tech-फॅड
टेक फॅडमुळे आपण आळशी होत आहोत. दिनक्रम बदलतोय. झोप तर इतकी सावध झालीय, की जरा टुंग वाजलं की जाग येते. ह्याने झोप अपुरी होतीये, आत्मशांती हरवतीये आणि नकारात्मकता वाढतेय.
४ – अपेक्षांच ओझं
“बचपन से ब्राइट स्टुडंट था, मां बाप को लगा ये अपनी गरीबी मिटाएगा…प्रेशर बढता गया – और मार्क्स घटते गये” खरं बोल्लाय शर्मन ईडीयटस् मध्ये.
आपण एकीकडे विशाल समुद्रात उतरायची स्वप्नं बघत असतो आणि ह्या अपेक्षा पायातली बेडी होऊन अडकून बसतात.
५ – दृष्टीकोन
कुणी point of view म्हणतं तर कुणी attitude. गोष्ट एकंच. कधी आपण दुरुन डोंगर साजिरे म्हणत लांबच थांबतो, तर कधी डोंगराला तुच्छ लेखतो. परिस्थितीचा आढावा न घेणारा दृष्टीकोन आपल्याला प्रतिगामी बनवतो, तर समोरच्याला तुच्छ लेखणारा दृष्टीकोन नकारात्मकता वाढवतो.
तर मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यांना बजाऊन सांगा :
“दुऽर हो जाओ मुझसे…You are not allowed”
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.