' भारतीय संस्कृतीमधील फलाहाराचे महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग ५ – InMarathi

भारतीय संस्कृतीमधील फलाहाराचे महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग ५

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक : पंचामृतामधील सर्वगुणसंपन्न दुध आणि मध : आहारावर बोलू काही – भाग ४

फळे ही भारतीय आहार संस्कृतीत अत्यंत महत्वाची आहेत.आज आपण फलाहाराचे महत्व जाणुन घेवुया. नंतरच्या लेखांमध्ये एक एक करून ऊपयुक्त फळांची सविस्तर माहीती घेवुया. सर्वप्रथम आधुनिक शास्त्राचा विचार करू.

fruits-marathipizza01
फळांचे उपयोग
1) फळे vitamins व minerals चा मोठा स्त्रोत आहेत. त्याच्या नित्य सेवनाने vit.A & vit.C यांच्या कमतरतेमुळे होणार्या व्याधी उद्भवत नाहीत.

2) फळांचे सेवन केल्याने चिरकाल टिकणारे व्याधी (chronic diseases) होत नाहीत. कारण फळांमध्ये phytichemicals नावाचा
सर्वांगीण स्वास्थ्य वाढवणारा घटक असतो.

3) फळे ही पोटॅशिअम, vit.C, folic acid, fiberयांचा ऊत्तम स्त्रोत आहेत. त्यामुळे फारच ऊपयुक्त ठरतात.

4) vit C मुळे त्वचा नितळ राहाते.

5) folic acid हे रक्तातील Heamoglobin चे प्रमाण वाढवण्यास मदत करते.

6) गर्भारपणात फळांचे अवश्य सेवन करावे. कारणfolic acid गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक असते.

7) fibers शरीरातील मलाचे विसर्जन करण्यास मदत करतात. तसेच मेंदुतील satiety centers सक्रीय करून पोट भरल्याचा संदेश मेंदुस पोहचवतात.

8) फळांमधील fructose ही instant energy साठी उपयुक्त ठरते. म्हणून व्यायामापुर्वी एक तरी फळ खावे.

9) फळांमधील असणारी fructoseही शरीरातील साखर हळु हळु वाढवते. त्यामुळे मधुमेहींनीही फळांना आहारातुन अगदीच बाद न करता, प्रमाणात व सारासार विचार करून त्याचे सेवन करावे.

10) नवीन संशोधनानुसार, फळांचे नियमीत सेवन केल्यास, हृदयविकार, type2 diabetes यांची शक्यता कमी होते.

11) फळांमध्ये 90% पाणी असते. त्यामुळे अतिसार, ज्वर अशा व्याधीनंतर येणारा थकवा (dehydration)भरून काढण्यास फळे मदत करतात.

12) फळांतील जीवनसत्वे लहान मुलांच्या शारीरीक व बौद्धिक विकासात मदत करतात. त्यामुळे लहान मुलांच्या आहारात फळांचा आवर्जुन समावेश करावा.

fruits-marathipizza02
फळे किती खावीत???

1) 2 ते 21/2 कप फळे रोज खावीत.

2) फळे शक्यतो आहे तशी खावीत. juice बनवल्यास fiber कमी होते.

3) फळे ही सेंद्रीय पद्धतीने वाढवलेली व पिकवलेली असावीत.

4) शक्यतो त्या त्या ऋतुत मिळणारीच फळे खावीत. (seasonal fruits)

 

आयुर्वेदीय मत

आयुर्वेदानुसार, फळे ही पोषक व पचनास जड सांगीतली आहेत. त्यामुळे फळांचे सेवन सकाळी करावे. तसेच फळे दुधासोबत खाऊ नये. ते “विरूद्ध अन्न” मानले जाते. म्हणजेच घातक मानले जाते. फळे रात्री जेवणानंतर खाऊ नयेत असे आयुर्वेद मानते. ऊपवासामध्ये केवळ फलाहार घ्यावा असेही सुचवले आहे. मात्र तेव्हा over exertion करू नये.

 

निर्विशीकरण (Detoxification) व फळे

चुकीची दिनचर्या, अवेळी जेवण, अति मसाल्याचे पदार्थ, अति गोड पदार्थ याचे सेवन अशा बाबींमुळे शरीरातील समतोल बिघडून toxins ची निर्मीती होते. दोन दिवस केवळ फलाहार घेतल्यास toxins ऊत्सर्जन होण्यास मदत होते. महीन्यातुन एकदा तरी हा प्रयोग करावा. पचनसंस्था ऊत्तम राहते. आहार सात्वीक असल्याने प्रसन्न व हलके वाटते.

fruits-marathipizza03
zopnow.com

 स्थौल्य व फळे

वजन कमी करताना, तुम्ही जर calories restrict करत असाल तर फळाचा आहारात समावेश ऊपयुक्त ठरतो. आहार कमी केल्यामुळे (low calorie intake) होणारे अपतर्पण (Dehydration), vitamins च्या कमतरता, बद्धकोष्ठता (constipation) ही लक्षणे फळांच्या सेवनामुळे नाहीशी होतात.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?