Site icon InMarathi

तुम्ही मोबाईल चुकीच्या पद्धतीने चार्ज करत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच! वाचा

charging featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आजच्या युगात मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कदाचित कोणाकडे नसतील, असे होणार नाही. हे डिव्हाइस तुम्ही आपल्या जिवापेक्षा जास्त जपता, कारण तुम्ही त्यासाठी खूप पैसे खर्च केलेले असतात.

पण असे हे डिव्हाइस त्यांच्यामध्ये असलेल्या बॅटरीशिवाय काहीही उपयोगाचे नसतात. बॅटरी ही या डिव्हाइसचा जीव आहे.

जसे प्राण गेल्यावर मनुष्य निर्जीव बनतो, तसेच या डिव्हाइसचे सुद्धा आहे.

बॅटरीशिवाय यांचा काहीही उपयोग नाही. म्हणूनच अश्या या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या बॅटरीची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. पण बहुतेक वेळा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचा मोठा त्रास आपल्यालाच भोगावा लागतो.

म्हणून या डिव्हाइसचा जीव असलेल्या बॅटरीचा योग्यप्रकारे वापर करावा. तुम्ही तुमचा डिव्हाइस चार्जिंग करताना ही थोडी काळजी घेतली, तर तुमच्या बॅटरीचे आयुष्य वाढू शकते.

चला तर मग जाणून घेऊया तुम्ही तुमच्या बॅटरीची काळजी कश्याप्रकारे घेऊ शकता.

 

i1.ytimg.com

 

लिथीनियम बॅटरीमागचे विज्ञान…

आजच्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर उपकरणांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बॅटरी ह्या रिचार्जेबल असतात. यासाठी lithium-ion या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो.

यामागील सिद्धांत शास्त्रज्ञ टेस्ला यांनी मांडला होता. त्यांच्यानुसार, यामध्ये निगेटिव्ह पॉइंट आणि पॉजिटिव्ह पॉइंट असे दोन पॉइंट असतात.

जेव्हा आपण मोबाईल किंवा इतर कोणताही डिव्हाइसला चार्जिंग लावतो तेव्हा पॉजिटिव्ह चार्ज lithium-ion हे इलेक्ट्रोड ज्यांना कॅथॉड म्हटले जाते ते दुसरे इलेक्ट्रोड ज्यांना अॅनॉड म्हटले जाते त्यामध्ये परावर्तीत होतात. जेव्हा डिव्हाइस वापरला जातो तेव्हा हीच प्रक्रिया उलट्याप्रकारे घडते.

 

assets.pcmag.com

 

चार्जिंग आणि रिचार्जिंग…

मोबाईल चार्जिंग केल्यानंतर डिव्हाइस शक्यतो जास्त वेळ वापरण्याचा प्रयत्न करावा. एकदा का आपला डिव्हाइस पूर्णपणे चार्ज झाला की, त्याला तसेच ठेवून जाऊ नये. कारण त्यामुळे तुमच्या बॅटरीचे आयुष्य कमी होण्याची शक्यता असते.

आपण खूप वेळा आपले डिव्हाइस चार्जिंगला लावल्यानंतर त्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे डिव्हाइस खूप गरम होतो आणि त्याचा परिणाम तुमच्या डिव्हाइसवर होतो.

कधी-कधी आपण आपल्या मोबाईल किंवा डिव्हाइसची चार्जिंग ५० टक्के जरी बाकी असेल तरी लगेच आपला डिव्हाइस चार्जिंगला लावतो, पण असे करणे सुद्धा चुकीचे आहे.

हे ही वाचा मोबाईल पावसात भिजला… नुसतंच टेन्शन घेण्याऐवजी हे वाचा

५० टक्के चार्जिंग असून सुद्धा त्याचा वापर न करता ती सारखी-सारखी १०० टक्क्यावर ढकलणे चुकीचे आहे. असे केल्याने तुमच्या डिव्हाइसच्या बॅटरीवर त्याचा वाईट परिणाम होतो आणि ती लवकर खराब होण्याची शक्यता असते.

जर १०० टक्के चार्जिंग होऊन सुद्धा तुम्ही तुमचा डिव्हाइस तसाच ठेवून गेलात तर त्यामागील प्रक्रिया खूप जलद गतीने होते आणि डिव्हाइसची बॅटरी खराब होते आणि लवकर उतरते.

 

assets.jalantikus.com

 

इतर सामान्य काळजी…

Lithium-ion बॅटरीसाठी अतिशय जास्त तापमान किंवा अतिशय कमी तापमान देखील योग्य नसते. म्हणून तुमचे मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा अन्य डिव्हाइस अश्या ठिकाणी ठेवू नयेत, कारण त्यामुळे डिव्हाइसच्या बॅटरीवर वाईट परिणाम होतो आणि त्या लवकर खराब होतात.

त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवा की, तुम्ही तुमचा डिव्हाइस अधिकृत चार्जरनेच चार्ज करणे गरजेचे आहे. जर तुम्ही तुमचा डिव्हाइस इतर कोणत्याही चार्जरने चार्ज करत राहिलात तर तुमची बॅटरी जास्त काळ टिकणार नाही.

यावरून लक्षात येते की, जर तुम्ही चार्जिंग करताना थोडीशी काळजी घेतली तर तुम्हाला बॅटरीविषयीच्या कोणत्याच समस्येला सामोरे जावे लागणार नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version