Site icon InMarathi

अशी कोर्ट केस ज्याची चर्चा साऱ्या भारतात रंगली, खऱ्या “रुस्तम”ची रोमांचक कहाणी!

Nanawati case IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही वर्षांपुर्वी रूस्तम चित्रपट येऊन गेला, बऱ्यापैकी चालला देखील. अक्षय कुमारचा अभिनय, इलियानाचं गोड रुप, त्याची वेधक कथा, जुन्या काळाचं उत्तम चित्रण अशा अनेक वैशिष्टांमुळे तो चित्रपट आजही घराघरात पाहिला जातो.

चित्रपट येण्यापुर्वी काहींना हा विषय माहित असला तरीही बहुतेकांना या चित्रपटामागची रक्तरंजित सत्यकथा ज्ञात नाही.

 

==

हे ही वाचा – रजनीकांत ते अक्षय कुमार : बॉलीवूड स्टार्सची खरी नावं तुम्हाला माहित आहेत का?

==

अनेकांना पुसटशी कल्पना आहे, पण त्या घटनेचे अनेक धागे परिचित नाहीत. चला तर मग जाणून घेऊया चित्रपटाला साजेश्या अश्या या थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण हत्याकांडाबद्दल.

 

 

आता आपण हे जाणतोच की ‘रुस्तम’ बेतलाय के. एम. नानावटी नामक एका नौदल अधिकाऱ्याच्या आयुष्यावर.

देशासाठी सदैव तत्पर असलेला, एक कणखर, कर्तबगार अधिकारी…

ही एक अशी घटना आहे जिच्यात भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना देखील रुची निर्माण झाली होती.

के. के. नानावटी हे नौदल अधिकारी देशरक्षणासाठी नेहमी घरापासून दूर असायचे. साहजिकच त्यामुळे कित्येक काळाने परतणाऱ्या नानावटींच्या मनात आपल्या पत्नीला आणि तीन मुलांना भेटायची तीव्र इच्छा असायची. त्यांची पत्नी सिल्वीया नानावटी ही विदेशी वंशाची होती आणि मुंबईमध्ये राहून आपल्या मुलांचा सांभाळ करायची.

नानावटीचा एक जिवलग मित्र होता ज्याचे नाव ‘प्रेम अहुजा’. नानावटी इथे नसताना तो त्यांच्या घरी येऊन जाऊन असायचा.

नवऱ्याची मिळणारी अल्पकाळ सोबत सिल्वीयाचे चारित्र्य कलंकित करण्यास कारणीभूत ठरली. तिचे ‘प्रेम अहुजा’शी सुत जुळले.

 

 

एके दिवशी अचानक मुंबईत आलेल्या नानावटींना तिचे प्रेमसंबंध पुराव्यासकट समजले.

सिल्वीयाने आपली चूक कबूल करीत नानावटींची माफी मागितली. नानावटी तडक प्रेम अहुजाच्या घरी गेले आणि त्यांनी त्याला या अनैतिक संबंधांचा जाब विचारला.

नानावटींनी अहुजाला विचारले की, तू माझ्या पत्नीची आणि मुलांची काळजी घेशील का? तर त्याने या गोष्टीला नकार दिला. तेव्हा चिडलेल्या नानावटींनी आपल्या सर्व्हिस रिव्होल्व्हर मधून अहुजावर गोळ्या झाडल्या. अहुजाची हत्या केल्यानंतर नानावटी स्वत: पोलीसांना शरण गेले.

स्वतंत्र भारतातील हा असा पहिला खटला होता ज्याची मिडियामध्ये, गल्लीबोळात, चहाच्या टपऱ्यांवर चर्चा रंगू लागली.

==

हे ही वाचा – अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक असूनही, त्याचा आयकर भारतात भरण्यामागचं खरं कारण “हे” आहे

==

 

 

हा खटला ‘ज्युरी ट्रायल मेथड’ नुसार चालवण्यात आला.

‘ज्युरी ट्रायल मेथड’ म्हणजे – आरोपीला न्यायाधीश आणि काही महत्वाच्या लोकांसमोर उभ करण्यात येतं आणि आरोप प्रत्यारोप झाल्यावर हे निवडक लोक स्व:ताचा निर्णय देतात.

चित्रपटातील ही बाब भारतीय प्रेक्षकांसाठी अत्यंत उत्सुकतेचा विषय ठरली होती.

आजही अमेरिका आणि इतर अनेक पाश्चात्य देशात ज्युरी सिस्टीम आहे. भारतात मात्र ज्युरी सिस्टीमने चालवल्या गेलेला हा शेवटचा खटला ठरला.

ह्या संपूर्ण खटल्यादरम्यान एक महत्वपूर्ण प्रश्न निर्माण झाला – तो म्हणजे नानावटींनी त्यावेळेस केलेलं कृत्य रागाच्या भरातलं होतं की ह्यामागे त्यांचा काही डाव होता?!!!

हा प्रश्न, नानावटींनी मोठ्या खुबीने आपली “देशभक्त सैनिक” अशी उभी केलेली (आणि वापरलेली!) प्रतिमा, मिडीयाचा उथळपणा – ह्या सर्वाचं उत्तेजक रसायन म्हणजे नानावटी केस!

ह्या प्रकरणातून सहीसलामत सुटून बाहेर आलेले नानावटी त्यानंतर पत्नी आणि मुलांसमवेत कॅनडा देशात स्थायिक झाले.

 

 

ह्या प्रकरणावर प्रदर्शित होणारा रुस्तम हा काही पहिला चित्रपट नव्हता.

यापूर्वी १९६३ मध्ये आलेला ‘ये रास्ते है प्यार के’ या सुनील दत्त यांच्या अभिनयाने नटलेल्या चित्रपटाची कथा देखील या सत्यघटनेशी मिळती जुळती होती.

तर १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अचानक’ या विनोद खन्नांच्या चित्रपटाची कथा देखील याच हत्याकांडाने प्रभावित होती.

===

हे ही वाचा – झगमगत्या चंदेरी दुनियेत स्वतःचं वेगळेपण जपणारा खिलाडी अक्षय कुमारवर आक्षेप घेणाऱ्यांनी हे वाचाच

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version