Site icon InMarathi

इमानदारी आणि शुरतेचे प्रतिक ‘गोरखा रेजिमेंट’बद्दल खास गोष्टी!

gorkha inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

कधी काळी भारताचे लष्कर प्रमुख असलेले सैम मानेकशॉ म्हणाले होते की,

जर कोणी व्यक्ती असं म्हणतोय की त्याला मृत्यूचे भय नाही तर एकतर तो खोटं बोलतोय नाहीतर तो गोरखा आहे.

गोरखा रेजिमेंट एक अशी सेना ज्याच्या भरवश्यावर इंग्रजांनी हिटलरशी युद्ध केले. या रेजिमेंटची हिम्मत बघून हिटलर एवढा प्रभावित झाला की, त्यांना आपल्या सैन्यात घेऊन संपूर्ण दुनियेवर ताबा मिळवायची त्याची इच्छा होती.

 

dailyo.in

भारताचा शेजारी म्हणजेच नेपाळ या देशात गोरखा नावाचा एक जिल्हा आहे. जो हिमालयाच्या तलहटी परिसरात येतो. हा परिसर तिथल्या शूर गोरखा योद्धांसाठी प्रसिद्ध आहे.

गोरखा किंवा गोरखाली नेपाळच्या लोकांना म्हंटल जात, ८ व्या शतकातील हिंदू योद्धा संत श्री गुरु गोरखनाथ यांच्या नावावरून त्यांनी हे नाव मिळवलं.

गोरखा ही जात नाही, गोरखा सैनिकांना तिथल्या पहाडी परिसरात राहणाऱ्या सुनवार, गुरुंग, राय, मागर आणि लिंबु या जातींमधून त्यांची भरती करण्यात येते.

जेव्हा येथे बाळ जन्माला येत तेव्हा “आयो गुरखाली” म्हणत पूर्ण गाव त्याच स्वागत करतात. जन्मापासूनच इथल्या मुलांना “कायरता से मरना अच्छा” म्हणजेच घाबरण्यापेक्षा मृत्यू बरा हे शिकवलं जात.

 

archive.is

गोरखा रेजिमेंट जगातील सर्वात शूर रेजिमेंटपैकी एक आहे. १८१५ साली ही रेजिमेंट भारतीय सेनेत समाविष्ट करण्यात आली.

१८१४-१६ च्या अँग्लो-नेपाळ युद्धात गोरखा सेनेची युद्धनीती आणि शूरता बघून ब्रिटिश एवढे भारावून गेले की त्यांनी गोरखा सैनिकांना भारतीय सैन्यात समाविष्ट करवून घेतलं.

सध्या हे गोरखा लोक नेपाळ आणि  भारतीय सेनेच्या गोरखा रेजिमेंट तसेच ब्रिटिश सेनेच्या गोरखा ब्रिगेड मध्ये कार्यरत आहेत.

आपल्या बहादुरीच्या जोरावर गोरखा रेजिमेंटने अनेक युद्ध जिंकली आहेत. जसे १९४७-४८ मध्ये उरी सेक्टर, १९६२ मध्ये लडा, १९६५ आणि १९७१ साली जम्मू-काश्मीर.

एवढेच नाही तर श्रीलंकेला पाठविण्यात आलेल्या शांती फोर्समध्ये देखील गोरखा रेजिमेंट होती. सध्या भारतीय लष्करात ७ रेजिमेंटच्या ४२ वेगवेगळ्या बटालियनमध्ये ४० हजारपेक्षा जास्त गोरखा सैनिक आहेत.

 

topyaps.com

गोरखा रेजिमेंटची सर्वात प्रसिध्द पलटन म्हणजे  १/११ गोरखा रायफल्स.!

आतापर्यंत १/११ गोरखा रायफल्सला त्यांच्या शूरतेसाठी ११ वीर चक्र, २ महा वीर चक्र, ३ अशोक चक्र आणि  १ परम वीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आर्मी चीफ-जनरल दलबीर सिंग सुहाग हे देखील गोरखा रायफल्स मधूनच होते.

भारतासाठी गोरखा जवानांनी पाकिस्तान आणि चीन विरुद्ध झालेल्या सर्वच लढायांमध्ये आपल्या शूरतेचा नमुना दाखवला, म्हणूनच गोरखा रेजिमेंटला राष्ट्रीय पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

गोरखा रेजिमेंट साठी अधिकाऱ्यांना गोरखा भाषा शिकणं महत्वाचं असत. ज्यामुळे ते गोरखा रेजिमेंटमधील सैनिकांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधू शकतील. हे ब्रिटिश आणि भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांसाठी महत्वाचं आहे.

गोरखा रेजिमेंटच्या नियमांनुसार दसऱ्याला वळूचा बळी देण्याची परंपरा आहे, गोरखा रेजिमेंट युनिटच्या सर्वात तरुण सैनिकाला ही संधी मिळते.

 

archaicnepal.com

गोरखा सैनिक त्यांच्या टोपीची पट्टी गळ्याभवती नाही तर ओठांच्या खाली घालतात. ही देखील गोरखा लोकांची एक ओळख आहे. तसेच त्यांची आणखीन एक ओळख म्हणजे कुकरी, कुकरी हे गोरखा लोंकांच शस्त्र आहे.

हा एक १२-इंच लांब वक्र चाकू असतो आणि तो प्रत्येक गोरखा रायफलंच्या सैनिकाजवळ असतो. एवढेच नाही तर कुकरी ही त्यांची शान आहे म्हणूनच हिला ते आपल्या बॅचवर साकारतात, तसेच वर्दीवर देखील साक्षांकित करतात. 

असे हे गोरखा रेजिमेंट आपल्या इमानदारी आणि शूरतेसाठी आज जगविख्यात आहेत…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version