आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
“वाजत गाजत आले, माझे गणपती बाप्पा आले” असे सूर आता सगळीकडे ऐकू येतोय, कारण सगळ्यांचा लाडका बाप्पा आपल्याकडे १० दिवस पाहुणचारासाठी आलाय. ज्या क्षणाची आणि ज्या सणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आणि सण सध्या धुमधडाक्यात साजरा होतीय.
ज्या प्रकारे घराघरात बाप्पाच्या आगमनाची लगबग असेल, त्याचप्रकारे ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडळांमध्ये सुद्धा आज एका सेकंदाचीही उसंत नसेल.
तुम्हाला तर माहीतच आहे की भव्य दिव्य गणेशमूर्तींसाठी मुंबईतली मंडळे तर जगप्रसिद्ध आहेत.
गणेशोत्सव काळात अगदी देशभरातून आणि जगभरातून पर्यटक खास उंचच उंच आणि भव्य गणेशमूर्ती पाहायला येतात.
बाप्पाच्या भक्तीत न्हाऊन निघणाऱ्या या मुंबईमध्ये असा एक भाग जेथे सलग ओळीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये एक एक बाप्पा विराजमान होतो आणि मुख्य आकर्षण हे की या प्रत्येक गल्लीतला बाप्पा अतिशय भव्य आणि वेगळा असतो.
दक्षिण मुंबईतला हा भाग म्हणजे खेतवाडीचा भाग होय.
येथे जवळपास १४ गल्ल्या आहेत. ज्यांना खेतवाडी १ ली गल्ली ते खेतवाडी १३ वी गल्ली या नावाने ओळखले जाते.
दाटीवाटीच्या आणि नेहमीच गजबजलेल्या या भागामध्ये मोठ्या गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा करणे हे काही सोपे काम नव्हे, परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून प्रत्येक गल्लीतली प्रत्येक मंडळे बाप्पाच्याच कृपेने प्रत्येक गणेशोत्सव थाटात साजरा करतात. आज आपण याच प्रत्येक गल्लीतील २०१६ सालच्या बाप्पाच्या गणेशमुर्तीचे दर्शन घेऊ.
१) खेतवाडी १ ली आणि २ री गल्ली
२) खेतवाडी ३ री गल्ली
३) खेतवाडी ४ थी गल्ली
४) खेतवाडी ५ वी गल्ली
५) खेतवाडी ६ वी गल्ली
६) खेतवाडी ७ वी गल्ली
७) खेतवाडी ८ वी गल्ली
८) खेतवाडी ९ वी गल्ली
९) खेतवाडी १० वी गल्ली
१०) खेतवाडी ११ वी गल्ली
११) खेतवाडी १२ वी गल्ली
१२) खेतवाडी १३ वी गल्ली
तर यंदा या गणेशोत्सवात वेळात वेळ काढा, पण खेतवाडीच्या या बाप्पांचे दर्शन घ्यायला विसरू नका!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.