अश्रू खारट का असतात ? जाणून घ्या तुम्हाला माहित नसलेलं कारण!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तुम्ही खूप हसलात, दुखी झालात, काही लागलं, आनंद झाला की डोळ्यांमधून येतात ते अश्रू, खूप वेळा आपल्याला आनंद झाल्यानंतर अश्रू अनावर होतात. तेव्हा आपले अश्रू हे आपल्याला झालेला आनंद दर्शवत असतात. ज्यावेळी आपल्याला मनापासून आनंद होतो, त्यावेळी हे अश्रू अलगद डोळ्यांमधून बाहेर पडतात. आपण स्वत:ला आणि इतरांना अभिमान वाटावा अश्याप्रकारचे काही कृत्य केल्यास त्या क्षणी हे अश्रू आपल्या मनातील भावना व्यक्त करत असतात. अश्रूंचा आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळा रोल आहे. एखाद्या विशिष्ट क्षणावर बाहेर पडलेले अश्रू त्या क्षणाचे महत्त्व सर्वांना पटवून देत असतात. दुःखाचा क्षण सुद्धा त्यामधीलच एक असतो.
असे म्हणतात की, रडल्याने दुःख कमी होते. तसे खरेच आहे, कारण मनुष्य आपले दुःख हे अश्रूंमार्फत व्यक्त करत असतो. कधी-कधी अश्रू येण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज भासत नाही, कारण ते अश्रू फक्त तुमचे डोळे साफ करण्यासाठी आलेले असतात. जसे कांदा कापताना आलेले अश्रू हे काहीही व्यक्त करत नाहीत. नकळत कधीतरी हे अश्रू तुमच्या डोळ्यांमधून निघून ओठांवर नक्कीच आले असतील. तुम्ही जीवनात एकदातरी त्या अश्रूंची चव नक्कीच घेतली असेल आणि तुम्हाला ते खारट असल्याचे जाणवले असतील. पण तुम्हाला कधी आश्चर्य वाटले नाही का? की आपले अश्रू हे खारट का असतात…? आज तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात..
एखाद्या प्रौढ माणसाच्या शरीरामध्ये सुमारे १ कप एवढे मीठ असते. आपल्या शरीराच्या प्रत्येक स्त्रावांमध्ये मिठाचा अंश असतो. आपल्याला येणाऱ्या घामामध्ये, आपल्या मूत्रामध्ये, तसेच आपल्या अश्रूंमध्ये सुद्धा मिठाचा अंश आढळतो.
आपले डोळे सतत कोरडे राहिले तर आपली दृष्टी गमवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. अश्रू खारट असतात यामागे सुद्धा शारीरिक, उत्क्रांतीवादी आणि रोगप्रतिकारक कारणे आहेत. घाम, लाळ, मुत्र आणि अश्रू यांमध्ये मीठ असते, कारण मीठ हे पेशींमध्ये असते आणि द्रवाभिसरणाच्या माध्यमातून पाणी खेचून घेते. रडण्यामुळे आणि इतर स्त्रावामुळे निघणाऱ्या मिठामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही.
अश्रूंमध्ये सोडियम आणि पोटॅशियमच्या क्षारांचे अस्तित्व असल्यामुळे अश्रू हे खारट असतात. पण अश्रूंमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. जैविक संरचनेकडे वाटचाल करणाऱ्या अश्रूंमध्ये सेंद्रिय आणि अजैविक रसायने असतात. जसे लिपीड, लाइसोझिम, म्युसिन, लॅक्टोफेरीन आणि इतर एन्झाईम्स.
आता कळलं ना आपल्या जीवनामध्ये आपल्या सुख-दुःखाचे सोबती असणारे हे अश्रू खारट का असतात ते…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.