Site icon InMarathi

आजवर कोणालाही सोडवता न आलेली ७ रहस्यमय कोडी! वाचा

mystery inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

रहस्य म्हंटल कि आपल्या डोक्यात येतात दा विंची कोड किंवा शेरलॉक होल्म्स अशी काही नावं, पण याहीपकडे रहस्य किंवा एखाद गूढ म्हणजे नक्की काय असतं?

रहस्य… म्हणजे मानवाला बुचकळ्यात टाकणाऱ्या अश्या गोष्टी ज्या अजूनही उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. भले भले विद्वान, निष्णात तज्ञ देखील या गोष्टींच्या मागे नेमकं आहे तरी काय याचा छडा लावू शकलेले नाहीत.

 

 

अश्याच रहस्यांपैकी काही रहस्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

जगभरातील विद्वानांना चक्रावून टाकणारी ‘कोडी’..! ही कोडी सोडवण्याच्या नादात कित्येकांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं, कित्येकांनी आकाश पाताळ एक केलं, पण अगदीच नगण्य निष्कर्षाशिवाय त्यांच्या हाती काहीही लागू शकलं नाही.

त्यापैकी काही कोडी म्हणजे – फेईस्टोस डिस्कची कथा, DOUOSVAVVM कोड, चार संदेश ज्यात दडलेले आहेत अशी एन्क्रिप्टेड मूर्तिकला, व्हर्जिनियाच्या सीआयए  हेडक्वॉर्टरच्या बाहेर असलेलं क्रिप्टोज!

असं म्हणतात की ही कोडी सोडवणे मानवाला शक्य नाही. चला जाणून घेऊया काय आहेत ही कोडी आणि काय विशेष आहे त्यांच्यामध्ये!

 

फेईस्टोस डिस्क

 

 

फेईस्टोस डिस्कचे रहस्य हॉलीवूड चित्रपट इंडियाना जोन्सप्रमाणे आहे. इटालियन पुरातत्त्वज्ञ लुडगी पर्नियरने १९०८ मध्येव याचा शोध लावला होता.

ही डिस्क पक्क्या मातीची असून तिच्यावर अनेक रहस्यमयी चिन्ह आहेत. ती चिन्ह हेरोग्लिफ‍िक्स (चित्रलिपीशी संबंधित) ची आहेत असे म्हटले जाते.

इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात फेईस्टोस डिस्क बनवण्यात आली असावी असा तर्क आहे. प्राचीन काळी अशा प्रकारची भाषा वापरली जात असे. त्यामुळे जर या भाषेचा उलगडा करता आला तर आपल्या हाती प्राचीन काळातील मौल्यवान गोष्ट लागू शकते असा पुरातत्त्वज्ञांना विश्वास आहे.

हे ही वाचा –

===

 

शगबोरोव्ह इन्स्क्रिप्शन

 

 

स्टेफॉर्डशायर येथील 18 व्या शतकातील स्मारक दूरून पाह‍िल्यास निकोलस पौसिनची चर्चित पेंटिंग ‘आर्केडियन शेफर्डस’ सारखी दिसते. पण ती जवळून पाहिल्यास त्यावर DOUOSVAVVM हा कुतूहूल वाढवणारा शब्द दिसतो.

DOUOSVAVVM हा एक कोडं असून, त्याला २५० पेक्षा अधिक वर्षे होऊन गेली आहे. पण अद्यापही तो कोड डिकोड करण्यात यश आलेले नाही. मुख्य म्हणजे चार्ल्स डिकेन्स आणि चार्ल्स डार्विनसारख्या विद्वानांना देखील यात अपयश आले आहे.

 

वाऊ Wow ! सिग्नल

 

हे ही वाचा –

===

 

१९७७  च्या उन्हाळ्यात सर्च फॉर एक्सट्राटेरेस्ट्रियल इंटेलिजेंसच्या व्हॉलेंटियर जेरी एहमन यांना परग्रहातील रहिवाशाचा एक संदेश मिळाला होता.

एहमन हे त्यावेळी अंतराळातून येणारे रेड‍िओ सिग्नल्स स्कॅन करित होते. त्याना ७२ सेकंदापर्यंत हे सिग्नल मिळत होते. जेरी यांनी जेव्हा मेझरमेंट स्पाइक पाहिला, तेव्हा त्यांना वाटले एलियनने हा संदेश पाठवला असावा.

चौकशी केल्यानंतर असे न‍िदर्शनास आले अंतराळातून आलेला सिग्नल हा ताऊ सॅगिटेरि नामक ताऱ्यामधून येत होता. एहमन यांनी सिग्नलच्या प्रिंट आऊटवर WOW असे लिहिले, तेव्हापासून त्या सिग्नलला वाऊ सिग्नल म्हटले जाऊ लागले.

 

वॉयनिक मॅन्युस्क्रिप्ट 

 

 

पोलिश वंशाचे अमेरिकन पुरातत्त्व पुस्तक विक्रेता, विल्फ्रिड एम वॉयनिकने १९१२ मध्ये वॉयनिक मॅन्युस्क्रिप्टचे संपादन केले होते.

मॅन्युस्क्रिप्ट हे २४० पानांचे एक पुस्तक आहे. त्याची भाषा सर्वसामान्यांना समजू शकत नाही. पूर्ण पुस्तक रंग-बेरंगी कलाकृतीने आणि चित्र-विचित्र रेषांनी भरलेले आहे.

पानांमध्येे दाखवण्यात आलेली झाडे पृथ्वीेवर अस्तित्वात नाही. पुस्तकाचा लेखक कोण आहे हे आतापर्यंत स्पष्ट झालेले नाही. कार्बन डेटिंगनुसार पुस्तक १४०४-१४३८ दरम्यान लिहिण्यात आले आहे.

जगातील सर्वात रहस्यमयी हस्तलिखित ग्रंथ म्हणून या पुस्तकाची ओळख आहे.

 

तमम शड केस

 

 

ऑस्ट्रेलियातीलच नाही तर जगभरातील सर्वात गूढ रहस्यमयी केस ठरली – ‘तमम शड’ केस!

१९४८  मध्ये एडिलेडमधील सोमर्टन समुद्र किना-यावर सापडलेल्या मृत व्यक्तीशी ही केस संबंधित आहे. एडिलेड पोलिसांना त्या मृत्य व्यक्तीच्या खिशात कागदाचा तुकडा मिळाला होता.

त्यात तमम शड असा शब्द होता. या शब्दाचा अर्थ होतो अंत. त्याचा वापर कवी उमर खय्याम यांनी आपली कविता ‘रूबाइयत’ मध्ये केला आहे.

खय्याम यांच्या एका पुस्तकात अजून एक लिहिलेला कोड मिळाल्याने याबद्द्लचे रहस्य आणखी गडद झाले. असा तर्क लढवला जातो की, कीमारताना त्याच व्यक्तीने कागदीची ती तुकडे पुस्तकात ठेवली असणार.

 

क्रिप्टोज

 

 

क्रिप्टोजचा अर्थ होतोय रहस्यमयी ग्रा‍फ‍िया. अमेरिकन कलाकार जीम सनबोर्नने एक रहस्यमयी एन्क्रिप्टेड मूर्तिकला विकसित केली आहे.

ती आपल्याला व्हर्जिनियाच्या लँग्लेवामध्ये सीआयएच्या मुख्यालया बाहेर पाहायला मिळते. हे रहस्य उलगडण्यासाठी अनेकजण आपलं डोकं लढवत आहेत.

क्रिप्टोजच्या चार संदेशांपैकी तीन संदेश डिकोड करण्यात आले आहेत, मात्र चौथा मेसेज काय आहे हे आजवर कोणालाही शोधता आलेले नाही.

काय म्हणता…? तुम्ही देखील प्रयत्न करून बघणार का? 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version