Site icon InMarathi

भारतीय बनावटीच्या “तेजस” विमानांबद्दल ५ महत्वाच्या facts

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

भारतीय बनावटीच्या Light Combat Aircraft (LCA) ची पहिली तुकडी भारतीय हवाई दलात सामील झाली आहे.

३३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर “तेजस”ची पहिली तुकडी भारतीय सेवेत रुजू झाली आहे.

तेजसबद्दल ५ महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊ या.

 

स्त्रोत

१) “स्टील्थ” फायटर जेट !

इतर फायटर जेट्सपेक्षा ‘तेजस’ खूपच लहान आहे. शिवाय त्याच्या बांधणीमधे कार्बन कम्पोजिट्सचा वापर केला गेला आहे. ज्यामुळे रडारवर तेजस दिसण्याची शक्यता – इतर जेट्सच्या तुलनेत – खूप कमी आहे.

म्हणजेच हे जेट स्टील्थ मोडमधे (लपून छपून) हल्ला करण्यास अधिक उपयुक्त आहे.

 

२) विशेष काचेचं कॉकपिट

पायलट बसण्याची जागा – कॉकपिट – काचेची बनलेली आहे. ह्याची विशेष खुबी ही आहे, की ह्यात पायलटसाठी रियल टाईम माहिती दाखवली जाईल. जेटमधे सोफ्टवेअर ओपन वापरलेलं आहे, ज्यामुळे DRDO वाटेल त्यानुसार त्यात बदल करता येतील.

 

स्त्रोत

३) सीमेजवळील कार्यवाहीस उपयुक्त

तेजसचा रीच कमी आहे – साधारण ४०० किलोमीटर. म्हणजेच, सीमेच्या जवळ त्वरित कार्यवाही करण्यासच तेजस उपयुक्त आहे.

शत्रूच्या घरात (देशात! 😉 ) घुसून काही करायचं असेल तर रशियन Sukhoi-30MKI किंवा Rafale हेच जेट्स वापरावे लागतील.

 

४) बाळाचं नाव कुणी ठेवलंय?!!! 🙂

“तेजस” हे नाव आपले सर्वांचे लाडके माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी ह्यांनी ठरवलं आहे.

स्त्रोत

५) इतर जेट्सशी तुलना केली तर ‘तेजस’ किती चांगलं/वाईट आहे?

तेजसची तुलना प्रामुख्याने MIG-21 आणि पाक-चीन ने संयुक्तरित्या बनवलेल्या JF 17 शी केली जाते.

तेजस, MIG-21 पेक्षा निश्चितच सरस आहे. एकतर तेजस आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेलं आहे. शिवाय कार्बन कंपोजिट्समुळेअधिक हलकं आणि मजबूत आहे.

आणि – आपलं तेजस – पाक-चीनच्या JF 17 पेक्षा सुद्धा अधिक सरस आहे. 😀

“तेजस” मुळे भारतीय वायू सेना अधिक मजबूत होईल ह्यात शंका नाही !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Exit mobile version