ह्या ७ गोष्टी सिद्ध करतात की कपिल शर्मा हा काही निव्वळ नशीबाने यशस्वी झालेला नाही!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
तुमच्यापैकी बहुतेक लोकांना कपिल शर्माचा कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो आवडत असेलच. तुम्हाला वाटत असेल की, हा कपिल शर्मा आधी कोणीच नव्हता आणि या एका शो ने तो लगेच मोठा स्टार झाला. पण मंडळी असं मुळीच नाहीये, त्याला हे यश लगेच मिळालेले नाही. त्याला यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट करावे लागले होते, तो त्याच्या स्वतः च्या मेहनतीने आणि कलेने पुढे आला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, त्याला रातोरात असे यश प्रदान झाले आहे, तर हा तुमचा गैरसमज आज आम्ही या ७ गोष्टींवरून दूर करू इच्छित आहोत…
१. सुरुवात…
२००४ मध्ये कपिल शर्माच्या वडिलांचे निधन झाले होते. ते पंजाब पोलीस खात्यामध्ये हेड कॉन्स्टेबल होते. ते गेल्यानंतर कपिल शर्मावर घरातील सर्व जबाबदारी पडली. त्याचबरोबर त्याची एक बहिण सुद्धा होती, जिच्या लग्नाची जबाबदारी देखील त्याच्यावर होती.
२. थिएटरसाठी त्याचे प्रेम…
थिएटरसाठी त्याचे प्रेम पूर्वीपासून होते. कपिल शर्माने आपला अभिनय आणि आपली विनोदी वृत्ती या दोन प्रतीभांच्या माध्यमातूनचआपले करियर बनवण्याचे ठरवले. कपिल शर्माने अमृतसरमध्ये थिएटर जॉईन केले आणि त्यानंतर तो दिल्लीला आला आणि काही शो करून नाव कमावण्यास सुरुवात केली.
३. विनोद करण्याची सुरुवात…
दिल्लीमध्ये आल्यानंतर एका पंजाबी चॅनलसाठी त्याने कॉमेडी शो केला. शोचे नाव होते ‘हसते-हसाते रहो’. कपिल शर्माचे म्हणणे आहे की, कॉमेडी करणे ओघाओघाने आले आणि हाच माझ्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला.
४. सर्वात मोठी संधी…
कपिल शर्माला सर्वात मोठी संधी मिळाली ती ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोमध्ये. २००७ मध्ये कपिल शर्माने ह्या शोमधील स्पर्धा जिंकली आणि त्याला १० लाख रूपये बक्षीस म्हणून मिळाले.
५. यशाकडे वाटचाल…
द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज स्पर्धेमधील त्याची कॉमेडी सर्वांना खूपच पसंत आली. त्याच्यानंतर लगेचच त्याला कॉमेडी सर्कसमध्ये संधी मिळाली. जिथे त्याने या शोचे सर्व सीझन जिंकून आपल्या कॉमेडीने देशभरातील सर्वांची मने जिंकली.
६. कॉमेडी नाईट्स विथ कपिल…
कॉमेडी सर्कसनंतर कपिल शर्माला आपला स्वतःचा शो मिळाला. कॉमेडी नाईट्स विथ कपिल छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा हिट कॉमेडी शो बनला. या शोमध्ये मोठमोठे कलाकार आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी येतात.
७. छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर…
कॉमेडी नाईट्स विथ कपिलच्या अपार यशानंतर कपिलला बॉलीवूड मधून ऑफर येऊ लागल्या. कपिल शर्माने या ऑफर देखील स्वीकारल्या आणि ‘किस किस को प्यार करू’ या कॉमेडी मसाला चित्रपटाने आपल्या बॉलीवूड करिअरची सुरुवात केली.
कपिल शर्माला आज सध्याच्या काळातील भारतीय हास्य जगतातील सर्वात मोठा कलाकार म्हणून ओळखले जाते. कपिल शर्माने आलेल्या अडी-अडचणींचा धैर्याने सामना केला आणि आज त्याने यशाचे खूप उंच शिखर गाठले आहे.
कपिल शर्मा त्या लोकांसाठी एक आदर्श आहे, जे गरीब परिस्थिती असून सुद्धा जीवनात यशस्वी होण्याचे ध्येय बाळगतात.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page