Site icon InMarathi

जेव्हा बछड्यांसाठी ‘माया’ वाघिणीने तोडला होता निसर्ग नियम…

maya-tigress-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – सुरज उदगीरकर 

===

वाघांची दुनिया तशी बऱ्यापैकी सरळसोट असते. परस्परांच्या इलाख्यात दखल न देणारे वाघ एका ठराविक मोसमात मात्र मिलनाकरता एकत्र येतात. मिलना नंतर वाघ काही दिवस वाघिणीसोबत घालवून आपल्या इलाख्यात निघून जातो.

होणाऱ्या अपत्यांचे संगोपन सहसा वाघीण एकटीच करते. आपल्या पिल्लांच्या सुरक्षिततेबाबत वाघीण प्रचंड काळजी घेते. पिल्लं 17-24 महिन्याची होई पर्यंत आईच्या संरक्षणात राहून शिकार करायला शिकतात.

दुसऱ्या नरांच्या अपत्यांना वाघ संभाव्य धोका किंवा स्पर्धक या नजरेने पाहतात आणि अशा अपत्यांना मारून टाकतात. म्हणून अपत्य असणारी वाघीण नर वाघांपासून शक्यतो लांब राहते आणि त्यांना जवळपास फिरकू देत नाही!

 

 

पण वन्य जीव अभ्यासकांना चक्रावून सोडणाऱ्या काही घटना ताडोबा अभयारण्यात घडल्या आहेत. अभयारण्याच्या पांढरपाणी विभागातली वाघीण “माया” आणि तिची एक वर्षाची 3 पिल्लं, दोन नर आणि एक मादा, पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होते.

अचानक एक दिवस मायासोबत दिसणारी तिची पिल्लं दिसेनाशी झाली. शिवाय पिल्ले असणारी माया ‘मटकासुर’ नावाच्या नरासोबत मिलन करताना आढळून आली.

काही अफवांच्या अनुसार ‘मटकासुर’ मायाच्या पाठलागावर होता. पांढरपाणीमध्ये दाखल होताच त्याने मायाच्या एका नर असणाऱ्या पिल्लावर हल्ला चढवला. ह्या हल्ल्यात पिल्लू सुखरूप असलं तरी मायाने तिन्ही पिल्लाना एकाकी सोडून मटकासुराशी जवळीक साधली. एका बछडे असणाऱ्या वाघिणीसाठी हे वागणे नेहमीचे नाही.

 

 

काही दिवसांनी ‘गब्बर’ नावाच्या दुसऱ्या तरण्याबांड नरासोबत झालेल्या लढतीत मटकासुरने पराभव पत्करून पांढरपाणीचा इलाखा सोडून दिला. नंतर माया गब्बरसोबत मिलन करत होती. मायाचे हे वागणे अभ्यासकांना आश्चर्यचकित करून टाकणारे होते.

मायाची तिन्ही पिल्लं जिवंत आणि सुखरूप असून आपापल्या वाटेवर होती. गेल्या काही दिवसात त्यांनी चितळ, माकड आणि एका भेकराची शिकार केल्याच्या बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या. पर्यटकांच्या चमूला तिन्ही बछड्यांचे दर्शन घडून आले. एक नर एकटा, तर दुसरा नर आणि मादी एकत्र जंगलात वावरत असल्याचे पहिले गेले.

 

 

वन्यजीव अभ्यासकांच्या आकलनानुसार मायाचं आधी मटकासुर आणि नंतर गब्बरशी जवळीक साधणं नैसर्गिक नसून पिल्लांच्या सुरक्षिततेच्या हमीकरता उचललेलं पाऊल आहे…! मायाचा इलाखा इतर नर वाघांच्या इलाख्याशी जोडलेला असल्याने पिल्लांची सुरक्षा हवी असेल तर तिला नर वाघांशी जुळवून घेणं भाग होतं.

अन्यथा तिन्ही पिल्लांचा आणि तिचा स्वतःचा जीव धोक्यात असण्याची शक्यता होती. म्हणून स्वतः नर वाघांना गुंतवून ती पिल्लाना त्यांच्यापासून दूर ठेवत होती!

वन्य प्राण्यांच्या काटेकोर निसर्ग नियमनाची माहिती असणाऱ्यांसाठी हे सगळंच प्रकरण अत्यंत रंजक आहे.

तरी एक गोष्ट निश्चित लक्षात येते : मनुष्य असोत कि वन्यप्रजाती असोत, आई शेवटी आईच असते.

मुलांच्या संरक्षणार्थ ती कुठल्याही गोष्टीला तोंड देऊ शकते…!

माहिती आणि छायाचित्र स्रोत : टाईम्स ऑफ इंडिया

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version