भारताबद्दल त्या ‘१०’ धादांत खोट्या गोष्टी, ज्या आपण आजवर खऱ्या मानत आलो!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
काही गोष्टी आपण ऐकतो आणि त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवतो.
त्या खरचं घडल्या आहेत का? याबद्दल आपण खात्री करून घेत नाही.
अशाच काही गोष्टी आपल्या देशाशी सुद्धा निगडीत आहेत, ज्या आपल्याला सांगितल्या जातात पण त्यामागील सत्य काही वेगळेच असते. ज्या गोष्टी आपण एवढ्या आदराने मानतो त्या खरोखर सत्य आहेत की खोट्या आहेत, हेच आपण आज जाणून घेऊ या.
अश्या काही गोष्टी ज्या तुम्ही खऱ्या मानत आला आहात, त्या तुम्हाला पुन्हा विचार करण्यास भाग पाडतील.
चला तर मग जाणून घेऊया आपल्याला सांगण्यात आलेल्या या गोष्टी किती सत्य आहेत…!
१. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे.
२०१२ मध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या एका लेखामध्ये असे लिहिलेले होते की, हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ नाही आहे आणि हे सुद्धा थेट केंद्रीय मंत्रिमंडळामधून सूचित करण्यात आले होते.
आपल्या देशाचा कोणताही राष्ट्रीय खेळ नाही आहे. हॉकी आणि इतर कोणत्याच खेळाला कधीही राष्ट्रीय खेळ म्हणून सूचित केले गेले नाही आहे.
२. हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा आहे.
संविधानानुसार, हिंदीला भारताची राष्ट्रीय भाषा नव्हे, तर अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आले होते.
हिंदी बरोबरच इंग्रजी सुद्धा भारताची अधिकृत भाषा म्हणून गणली जाते.
३. महात्मा गांधी ब्रिटीश महिलेसोबत नाचले होते.
महात्मा गांधी हे ब्रिटीश महिलेसोबत नाचले होते, हे अत्यंत चुकीचे आहे.
वरील छायाचित्र खोटे आहे. वरील छायाचित्रामध्ये असलेला माणूस हा एक ऑस्ट्रेलियन अभिनेता आहे आणि एका पार्टी दरम्यान हे छायाचित्र काढण्यात आले होते.
४. वाराणसी हे जगातील सर्वात जुने शहर आहे.
वाराणसी हे जगातील सर्वात जुने शहर नाही आहे.
हे शहर जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी २० वे जुने शहर आहे.
५. ‘ऍन आय फॉर ऍन आय’ हे वाक्य महात्मा गांधी म्हणाले होते
हा क्वोट महात्मा गांधी बोलले होते, याचा कोणताही पुरावा नाही आहे.
हा क्वोट संवाद म्हणून बायबलच्या अध्यायांतून प्रेरित झालेला अभिनेता बेन किंग्सले याने वापरला आहे.
६. महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता होते.
महात्मा गांधी हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक आहेत. पण ते खरंच देशाचे राष्ट्रपिता आहेत का, असा प्रश्न २०१२ मध्ये ऐश्वर्या पराशरने आरटीआयच्या माध्यमातून उपस्थित केला होता.
तिच्या चौकशीला प्रतिसाद म्हणून अधिकाऱ्यांनी असे सूचित केले होते की, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता हे आदराने बोलले जात असे. त्यांना “राष्ट्रपिता” म्हणून कधीही अधिकृतपणे घोषित केले गेले नव्हते.
७. १९५० मध्ये भारताला फिफा वर्ल्ड कपमध्ये अपात्र ठरवण्यात आले होते.
असे म्हटले जाते की १९५० मध्ये फिफा वर्ल्ड कपमधून भारताने यासाठी माघार घेतली कारण, त्यांना शूज घालणे पसंत नव्हते, पण ही गोष्ट खोटी असल्याचा इंडियन एक्सप्रेसचा दावा आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताच्या खेळाडूंकडे ब्राझीलला जाण्यासाठी पुरेशी रक्कम नसल्याने त्यांनी या स्पर्धेमधून माघार घेतली.
८. लालू प्रसाद यादव यांची मुलगी मिसा हिने हार्वर्डमध्ये व्याख्यान दिले.
लालू प्रसाद यादव यांची मुलगी मिसा हिने हार्वर्डच्या व्यासपीठावर उभे राहून व्याख्यान देणारे छायाचित्र पोस्ट केले होते. तिने दावा केला होता की, तिला हार्वर्डने युवकांची भूमिका या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
पण हार्वर्डच्या प्रवक्त्याने हे स्पष्ट केले की, तिला कोणत्याही भाषणासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते.
९. १९६० च्या शर्यती दरम्यान मिल्खा सिंग मागे बघत होते.
१९६० च्या ऑलिंपिकमध्ये ४०० मीटरच्या शर्यतीमध्ये मिल्खा सिंग शर्यत संपण्यापूर्वी पहिल्या क्रमांकावर असताना सुद्धा मागे बघत होते. हा क्षण खूप प्रसिद्ध झाला होता.
पण हे अर्ध सत्य आहे, ते त्यावेळी पाचव्या क्रमांकावर होते आणि ते चौथ्या क्रमांकावर जाण्याचा प्रयत्न करत होते.
१०. भारतातील गरीब लोकसंख्येसाठी अन्न ही सर्वात मोठी गरज आहे.
भारतातील गरिबातील गरीब लोकांसाठी उपासमारीची मोठी समस्या आहेच.
पण ४० टक्के गरीब लोकसंख्येला अन्नाऐवजी आरोग्याची काळजी, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता यांची जास्त गरज आहे.
अश्या खोट्या गोष्टी, असे अपप्रचार का केले जातात – हे सर्व कोण करतं ह्या मागे विविध तर्क असू शकतात. वेगवेगळे हेतू असू शकतात. तो एक स्वतंत्र विषयच ठरेल!
परंतु आपण शक्य तेवढा सत्याचा प्रचार-प्रसार करावा हे मात्र नक्की!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.