Site icon InMarathi

तुमच्या मुलांसोबत कायमची मानसिक दरी टाळण्यासाठी या ८ चुकांपासून दूर रहा…

Child-abuse InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

लहान मुले आणि त्यांच्या आई-वडिलांमधील नाते ते एकमेकांना कसे समजून घेतात, यावर अवलंबून असते. मुलांना मारून किंवा रागवूनच त्यांच्यावर संस्कार करता येतात, असे नाही.

त्यांना समजावून योग्यप्रकारे एखादी गोष्ट सांगितल्याने सुद्धा आई-वडील आपल्या मुलांना चांगल्या मार्गावर चालण्यास मदत करू शकतात.

दुर्दैवाने या नाजूक जबाबदाऱ्या पार पाडणे खूप लोकांना जमत नाही.

 

 

लोक आपली स्वप्ने आणि विचार लहान मुलांवर लादण्याचा प्रयत्न करतात. शिस्तीच्या नावाखाली मुलांवर खूप बंधने लादण्यात येतात. पण हे सर्व चुकीचे आहे. असे केल्याने त्यांच्यावर चांगले संस्कार होण्याऐवजी ते आपल्याच पालकांपासून दूर होतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

स्वतःच्याच घरामध्ये परक्यासारखी वागणूक मिळाल्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि त्यामधूनच नको ते प्रकार घडण्याची भीती निर्माण होते.

आज आम्ही तुम्हाला अश्या ८ गोष्टी सांगणार आहोत, ज्या पालकांनी केल्यामुळे मुले नेहमी दुखावली जातात.

 

१. कधीही चूक मान्य न करणे…

 

सर्व लहान मुले आपल्या पालकांना स्वतःचा आदर्श मानतात, त्यामुळे नेहमी ते त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करतात. काही पालक असे सुद्धा असतात, जे प्रत्येकवेळी आपल्या मुलांच्याच चुका काढत असतात.

 

 

काही झाले की मुलांना दोष देत राहणार मग ती गोष्ट होण्यामागे स्वत:ची चूक असली तरीही ते मान्य करत नाहीत. त्यांच्यानुसार ते कधीही चुकणे शक्य नाही.

पण असे केल्याने मुलांच्या मनावर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पालकांनी स्वतःकडून चूक झाल्यास ती चूक मान्य करून त्यांना सुद्धा चुका मान्य करण्यास शिकवले पाहिजे.

 

२. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे न देणे…

मुलांना वाढत्या वयानुसार वेगवेगळे प्रश्न पडण्यास सुरुवात होते. असे प्रश्न पडल्यावर पहिल्यांदा मुले आपल्या पालकांकडे त्यांची उत्तरे जाणून घेण्यासाठी येतात, पण पालकांना मुलांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे वाटत नाही.

 

 

त्यांना त्या वायफळ गोष्टी वाटतात आणि ते त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतात. पण हे चुकीचे आहे.

कारण मुले आपल्या पालकांकडून उत्तरे न मिळाल्यास दुसरीकडून त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे ते वाईट मार्गावर जाण्याची शक्यता असते, म्हणून त्यांच्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे देणे गरजेचं आहे.

३. मुलांना त्यांच्या वयानुसार वागणूक द्या…

मुलांना त्यांच्या वयोमानानुसार वागणूक देणे गरजेचे आहे. काही पालक मुले किशोरवयीन झाली तरी त्यांना लहान असल्यासारखीच वागणूक देतात.

 

 

पण असे करणे चुकीचे आहे, कारण असे केल्याने आपण त्यांना स्वतः पासून दूर लोटत असतो. त्यामुळे आई-वडिलांना मुले मोठी झाल्यानंतर मुलांच्या विचारसारणीला लक्षात घेऊन त्यानुसार वागले पाहिजे.

 

४. खूप काळजी करणे…

प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना सर्व वाईट गोष्टींपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतात, तेव्हा मुलांना ते गैरसोयीचे वाटत असते. त्यामुळे मुले प्रत्येकवेळी आई-वडिलांवर खूप अवलंबून असतात.

 

 

पण हे अवलंबून राहणे मुलांना बिघडवायला कारणीभूत ठरू शकते. काही वेळा मुलांवर पालकांनी कडक लक्ष ठेवण्याची गरज असते. परंतु त्यावेळी मुलांना समजावून आणि त्यांच्यामध्ये सामजिक जाणं निर्माण करून त्यांना सक्षम बनवू शकतो.

मुलांना थोडीशी सुट दिल्याने पालक आणि मुलांमधील नातेदेखील मजबूत होते.

 

५. मुलांच्या सर्व गरजा पूर्ण करणे…

जर मुले एखाद्या वस्तूचा हट्ट करत असेल आणि ती वस्तू लगेच त्याचे पालक त्याला देत असतील आणि हे प्रत्येकवेळी होत असेल, तर ही गोष्ट तुमच्या मुलांना बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरू शकेल.

 

 

त्यांच्या प्रत्येक मागण्या ह्या योग्य असतीलच असे नाही म्हणून त्यांना अश्याच गोष्टी घेऊन द्या, ज्याची त्यांना खरच गरज आहे,

नाहीतर तुम्ही पुरवलेल्या प्रत्येक हट्टामुळे मुलांच्या हातून काहीतरी वाईट गोष्ट घडण्याची दाट शक्यता असते, त्यावेळी ते कोणत्या थराला जातील याचा विचार सुद्धा तुम्ही करू शकत नाही.

६. दुसऱ्यांशी तुलना करणे…

दुसऱ्या मुलांशी तुलना करणे, ही गोष्ट आपण नेहमीच आपल्या आजूबाजूला पाहतो. तुमच्या बरोबर सुद्धा कधीकाळी असे झाले असेल. पण दुसऱ्या मुलांशी आपल्या मुलांची तुलना करणे खूपच चुकीचे आहे, कारण प्रत्येक मुलाची बुद्धिमत्ता आणि विचारशक्ती सारखी नसते.

 

 

ही तुलना खूपवेळा अभ्यासाच्या आणि गुणांच्या बाबतीत दिसून येते. पण अश्या गोष्टी आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे आणि आपल्या मुलाच्या कुठे चुका होतात, त्यासाठी त्याने काय प्रयत्न करायला हवेत, हे सुद्धा त्याला सांगणे गरजेचे आहे.

त्याच्यावर रागवून किंवा दुसऱ्या मुलांशी त्याची तुलना करून या समस्या काही सुटणार नाहीत. म्हणून मुलांना योग्य ते मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, नाहीतर त्यांच्या बाल मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

 

७. मुलांनी चुका स्वीकारून सुद्धा त्यांना शिक्षा करणे…

बालपणामध्ये किंवा किशोरवयामध्ये सर्वच गोष्टी समजत नसल्याने मुलांच्या हातून चुका होणे साहजिक आहे. पण त्यावेळी पालक आपल्या मुलांबरोबर कसे वागतात, हे पाहणे देखील तेवढेच गरजेचे आहे.

 

 

काही पालक आपल्या मुलांनी त्यांच्या चुका मान्य केल्यानंतर सुद्धा त्यांना शिक्षा करतात. त्यामागे त्यांचा हेतू आपल्या मुलाने असे परत करू नये असाच असतो, पण असे करणे चुकीचे आहे.

कारण त्यांनी स्वतःच्या चुका मान्य करून देखील आई-वडील त्यांना शिक्षा करत असतील तर अश्यावेळी मुलांच्या मनामध्ये पालकांविषयी राग निर्माण होऊ शकतो आणि ते चुकीच्या वाटेला जाऊ शकतात.

त्यामुळे अश्यावेळी त्यांनी अशी चूक परत करू नये यासाठी त्यांना थोडे आरामात समजवावे.

 

८) मुलांवर कोणत्याही गोष्टीचा दबाव टाकू नका. 

 

 

अनेक पालक आपल्या मुलांवर सतत अभ्यास करण्यासाठी दबाव टाकतात. त्यांना त्यांच्या मनासारखी कोणतीच गोष्ट त्यामुळे करता येत नाही. आईवडील डॉक्टर असतील तर मुलाने सुद्धा डॉक्टरचं व्हावं अशी त्यांची अपेक्षा असते.

पण ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. आजकाल बहुतेक मुले आपल्याला कायम दडपणाखाली दिसतात. जास्त गुण कसे मिळतील आणि चांगल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन कधी मिळेल याचाच विचार ते करतात.

या सगळ्यात पालकांनी आपल्या पाल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यांच्यावर दबाव न टाकता त्यांची इच्छा नक्की काय आहे हे समजून घेणं अपेक्षित आहे.

या आठ गोष्टी पालकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या गोष्टींमध्ये सुधारणा करून तुम्ही आपल्या पाल्याचे भविष्य घडवू शकतात.

 

 पालक म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या प्रमाणे आपल्या पाल्याची काळजी घ्या!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version