Site icon InMarathi

प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पित असाल तर ही चुक पुन्हा करण्यापुर्वी हे नक्की वाचा…

plastic water bottles 4 InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

प्लास्टिक…पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी तसेच ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाठी प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रयत्न जगातील अनेक पर्यावरण प्रेमी संघटना करताहेत. कारण प्लास्टिक हे आपल्या पर्यावरणासाठी घातक आहे. असो…

आपल्यापैकी बहुतेक लोक पाणी पिण्यासाठी प्लास्टिक वॉटर बॉटलचा वापर करतात. मिनरल वॉटरच्या नावावर बाजारात या प्लास्टिक बॉटल मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. कुठल्याही हॉटलमध्ये गेलो की वेटर लगेचचं विचारतो, “सर, साधा पानी चलेगा या बिसलरी लाऊ…?”

 

 

आणि आपणही हाच विचार करतो की माहित नाही इथलं पाणी कसं असेल, कुठून येत असेल, म्हणून आपण मिनरल वॉटरची बाटली मागवतो. पण – हे पाणी मागवताना, आपण डोळे झाकून विश्वास करतो की, बाटलीतलं पाणी सुरक्षितच असणार! तसं लेबल असतं ना त्यावर…!

पण कधी विचार केलाय की या प्लास्टिक वॉटर बॉटलचं पाणी तुमच्यासाठी खरंच सुरक्षित आहे का? आज आम्ही आपल्याला याच प्लास्टिक वॉटर बॉटल मागचे काही असे घातक सत्य सांगणार आहोत जे तुमच्या पासून नेहमी लपविण्यात आलेत.

 

 

१. प्रत्येक बॉटल सारखीच सुरक्षित नसते…!  

प्लास्टिकची बाटली ही आरोग्यास धोकादायक अशी रसायने बाहेर टाकते. त्यासाठी बाटलीच्या तळाशी असलेल्या विशेष चिन्हांकडे लक्ष द्या.

तेथील त्रिकोण हे दर्शवतात की त्या बाटलीला बनविण्यासाठी कुठल्या प्रकारचं प्लास्टिक वापरले गेले आणि ती बाटली किती वेळा रीयूज करता येऊ शकते.

 

 

1 लेबल असलेली बाटली (पीईटी किंवा पीईटीई) फक्त एका वापरासाठी सुरक्षित असते. सूर्य, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात येताच अशा बाटलीतुन पाण्यामध्ये विषारी द्रव्य सोडली जातात.

 

 

3 किंवा 7 (पीव्हीसी आणि पीसी) लेबल असणाऱ्या बाटल्या घेणं शक्यतोवर टाळा. कारण त्यातून काही विषारी रसायने बाहेर टाकली जातात आणि ती तुमच्या पेयात समाविष्ट होतात. तसेच या बॉटल जास्त काळ सूर्यप्रकाशात राहिल्यास त्या पाण्यातून अथवा पेयातून आपल्याला गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

 

doctordaliah.wordpress.com

पॉलीथिलीन (2 आणि 4) आणि पॉलीप्रॉपिलीनने (5 आणि पीपी) बनलेल्या बाटल्या अनेक वापरांसाठी उपयुक्त आहेत. पण जर त्यात नेहमी थंड पाणी साठवून ठेवलं आणि त्यांना नियमितपणे निर्जंतुक करत राहिलं  तरच त्या सुरक्षित असतात.

२. मिनरल वॉटर बॉटलमधील पाणी नेमकं कुठनं येतं…?

आधी हे जाणून घ्या की, हे मिनरल वॉटर म्हणजे नक्की काय. तर मिनरल वॉटर म्हणजेच खनिज पाणी, ज्या पाण्यात काही उपयोगी खनिजे मिळविल्या जाते असं पाणी म्हणजे मिनरल वॉटर.

खनिजांच्या उपस्थितीमुळे पाण्याची चव बदलतेच, तसेच त्याचे औषधीय महत्व देखील आहे. मिनरल वॉटर हे एखाद्या नैसर्गिक खनिजयुक्त झरा किंवा पिण्याच्या पाण्याच्या इतर स्रोतांद्वारे मिळवितात. खनिजयुक्त पाण्यात सल्फर आणि इतर साल्ट्स असतात.

 


मिनरल वॉटर विकणाऱ्या अनेक कंपन्या आपल्या पॅकेजिंगवर एखादा नयनरम्य झरा किंवा तलाव दाखवून ते पाणी तिथून येत असल्याचा भास तयार करतात. पण खरं तर त्या बाटलीतलं पाणी हे आपल्या घरच्या पिण्याच्या पाण्यासारखंच असतं.

तुम्ही बाटलीवर स्वतः बघू शकता, सर्वसाधारणपणे एका छोट्याशा मजकुरात ते पाणी कुठ्न आलं हे लिहिलेलं असतं. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्येक कंपनी ही पाणी स्त्रोत किंवा मुख्य पाणी पुरवठा पॅकेजिंगवर स्पष्ट करण्यास बांधील असते.

३. दुसऱ्या कोणी वापरलेल्या बाटलीने कधीच पाणी पिऊ नये.

bikramsouthside.com

दुसऱ्याने वापरलेल्या बाटलीने पाणी म्हणजे एखादी अस्वच्छ वस्तू चाटण्या सारखेच किंवा ते त्याहीपेक्षा वाईट असू शकते. कारण पृथ्वीवर जेवढी संख्या माणसांची आहे त्यापेक्षा जास्त जिवाणू एका माणसाच्या तोंडात असतात.

त्यामुळे दुसऱ्याने वापरलेल्या बाटलीतून पाणी पिण्यास टाळावे. तसेच बाटली नेहमी कोमट पाणी, विनेगर किंवा अँटीबॅक्टेरिअल माऊथवॉशने स्वच्छ करावी. बाटली स्वच्छ करतो पण बाटलीचं तोंड आणि झाकण नीट स्वच्छ करत नाही, पण तुम्हाला माहितीये का, अर्ध्याहून जास्त जिवाणू हे त्या बाटलीच्या तोंडावरच असतात त्यामुळे यापुढे बाटली स्वच्छ करताना काळजी घ्या.

 

 

४. बाजारात मिळणाऱ्या बाटलीतलं पाणी आरोग्यदायी असतं हा समज चुकीचा…

हे मिनरल वॉटर बनविणाऱ्या कंपन्या लोकांना तसेच युवा पिढीला आपल्या प्रोडक्टकडे आकर्षित करण्यासाठी त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट त्यात ऍड करून त्यांची जाहिरात करतात आणि ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे असा दावा देखील करतात. पण, खरं बघता यात एवढी साखर मिसळविली जाते जेवढी सोड्यात असते, त्यामुळे नुसतं जाहीरांतींवर विश्वास ठेऊ नका, लेबल वाचूनच ते विकत घ्या.

वरील चारी गोष्टी नेहेमी लक्षात ठेवा…इतरांनाही सांगा…

‘पाणी हे जीवन आहे’…पण – पाणी पिताना सावधानता बाळगणेही तेवढेच महत्वाचे…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version