Site icon InMarathi

जेंव्हा वासनांध सैन्याने ८० हजार स्त्रीयांच्या अब्रूला हात घातला

china war featured inmarathi

youtube.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मानवी इतिहासात अनेक भयानक आणि क्रूर लढाया आजवर होऊन गेल्या आहेत.

मानवता, नैतिकता, बंधुभाव या गोष्टी धाब्यावर बसवून शत्रूशी लढताना अतोनात अत्याचार करणारी अनेक सैन्ये मानावजातीने पाहिली आणि अनुभवली आहेत.

“युद्धस्य कथा रम्यः” असं म्हटलं जातं. पण काही युद्धे अशी असतात की त्याचे परिणाम आणि त्यात झालेली अपरिमित हानी पाहता ती रम्य नाही तर भीषण आणि क्रूर वाटू लागतात.

भारतात तर मुघल सत्तेच्या अत्याचारापासून जालियनवाला बाग पर्यंत कित्येक उदाहरणे देता येतील. आजही त्या स्मृती डोळ्यासमोरून तरळल्या तर भारतीयांच्या अंगावर काटा उभा राहतो.

 

indianexpress.com

 

आपल्या देशबांधवांनी जे भोगलं त्याची नुसती कल्पनाही केली तरी त्यांना ते भोगायला लावणाऱ्या जुलमी राजवटीच्या विरोधात आपण पेटून उठतो.

पण एक युध्द असं होऊन गेलं ज्याचा वृत्तांत ऐकला तर मानवतेवरचा विश्वास उडेल. ही कहाणी एका अश्या आक्रमणाची ज्यात माणसाच्या माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

ज्यात “सैन्य” क्रूरतेची किती परिसीमा गाठू शकतं ह्याची प्रचिती आली होती. ही कहाणी आहे चीनवरील आक्रमणाची…

जपानने केलेल्या…जपानने चीनवर ज्यावेळी आक्रमण केले होते, त्यावेळी त्यांनी चीनी लोकांवर खूप अत्याचार केले होते.

जपानच्या सैनिकांनी दिलेले हे कबूलनामे चीनच्या आर्काइव अॅथॉरीटीने दुसऱ्या महायुद्धाला ७० वर्ष झाल्यानंतर एक-एक करून प्रसिद्ध केले होते.

 

japandailypress.com

 

स्टेट आर्काइव अॅडमिनीस्ट्रेशन कडूनही काही काळापूर्वी काही कागदपत्रे जारी करण्यात आली होती.

ज्यामध्ये असा सुद्धा दावा करण्यात आला होता की, युद्धाच्या दरम्यान जपानी सैनिकांनी चीनी नागरिकांचे मांस सुद्धा भाजून खाल्ले होते.

१९ जून १९३८ मध्ये जपानी सैनिकांनी एक हजार चीनी नागरिकांना जोंगमऊ शहरातून बाहेर काढले आणि येलो नदीमध्ये बुडवून मारले होते.

सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊ या..

जपानी सेनेने दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान केलेल्या या क्रूरतेला दुसरे जपान–चीन युद्ध देखील म्हटले जाते. या युद्धाला २० व्या शतकातील सर्वात मोठे आशियाई युद्ध म्हणून ओळखले जाते.

 

 

हे युद्ध १९३७ ते १९४५ च्या दरम्यान लढण्यात आले होते. यावेळी नानजिंग चीनची राजधानी होती. १९३७ मधेच दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापटी सुरू झाल्या होत्या.

१९ जून १९३८ मध्ये जपानी सैनिकांनी एक हजार चीनी नागरिकांना जोंगमऊ शहरातून बाहेर काढले आणि येलो नदीमध्ये बुडवून मारले होते.

जपानी सैन्याने याच वर्षी जुलैमध्ये बीजिंगवर कब्जा केला होता. त्यानंतर जपानने चहर आणि सुईयुनानवर आपला अधिकार प्राप्त केला होता.

तरीही शान्शीमध्ये चीनी सैनिकांनी जपानच्या सैनिकांचा खूप जोमाने विरोध केला होता. त्याच्यानंतर जपानच्या सैन्याने शंघाई काबीज केले आणि १३ डिसेंबरला चीनची राजधानी असलेल्या नानजिंगवरती हल्ला केला.

 

pinimg.com

 

ही युद्धाची खरी सुरुवात होती,

जेव्हा जपानच्या सैन्याने नानजिंग शहरामध्ये फक्त ६ आठवड्यांमध्ये ३ लाख लोकांचा जीव घेतला होता आणि त्याच शहरामधील जवळपास ८० हजार महिलांवर बलात्कार करण्यात आले होते.

जपानी सैन्याने संपूर्ण शहर उध्वस्त केले होते. एवढे करून सुद्धा जपान येथेच थांबला नाही. जपानने उत्तर, पूर्व आणि दक्षिण चीनवर सुद्धा आपले आधिपत्य प्रस्थापित केले.

परंतु चीनचा पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भाग जपान काबीज करू शकला नाही.

एका नंतर एक मिळणाऱ्या विजयामुळे जपानने १९४१ मध्ये पर्ल हार्बरवर हल्ला केला, ज्यानंतर अमेरिकेने जपानच्या विरोधात युद्धाची घोषणा केली.

तिथेच सोव्हिएत संघाने जपानने काबीज केलेल्या मंचुरियावर हल्ला केला. त्याच्यानंतर अमेरिका चीनला जपान विरुद्ध चालू असलेल्या युद्धासाठी मदत पोहचवू लागला.

 

historysshadow.files.wordpress.com

 

चीन आणि जपानमध्ये चालू असलेले युद्ध आता दुसऱ्या महायुद्धाचा एक भाग झाले होते आणि जपान आता कमकुवत पडायला सुरुवात झाली होती.

हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर जपानने १९४५ मध्ये पराभव मान्य केला आणि शरणागती पत्करली.

चीनचा दावा आहे की, या युद्धा दरम्यान चीनचे नागरिक आणि सैन्य मिळून एकूण साडेतीन कोटी लोक मारले गेले होते.

तर जपानच्या डिफेन्स मिनिस्ट्रीनुसार जपानचे जवळपास २ लाख सैनिक या युद्धात मारले गेले होते.\

 

the strategy bridge

 

जगाला लाजवणारे नरसंहाराचे कृत्य जपानने केले होते. संपूर्ण स्त्री जातीच्या आणि मानवतेच्या अस्तित्वाला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे जपानच्या चारित्र्यावरही कधी न पुसला जाणारा कलंक लागला.

जपानी अत्याचाराच्या या कथा आजही सर्वसामान्य चीनी नागरिकाने आठवणीत जपून ठेवल्या आहेत. आपल्या बांधवांवर झालेले अनन्वीत अत्याचार त्यांना व्यथित करतात.

वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या हव्यासापोटी माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो याचे सर्वात हृदयद्रावक उदाहरण म्हणून हे युध्द ओळखले जाईल.

===

हे पण वाचा:

ही चालू असलेले शीतयुध्द तिसऱ्या महायुद्धात बदलण्याची नांदी तर नाही ना ?

भारत विरुद्ध पाक + चीन युद्ध घडल्यास काय होईल? एका अभ्यासकाने मांडलेलं भयावह चित्र

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनची ताकद आणि धास्तावलेलं जग

आपल्यासमोर ५ लाख लोक मारले गेलेत, पण आपण तिकडे बघायला तयार नाही

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version